शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

इंटर्नशिप करायची तर लागतं काय?

By admin | Updated: May 4, 2017 07:27 IST

जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा पदवीधर एखाद्या कंपनीत काही महिन्यांसाठी काम करतो, तिथं काम करताना

इंटर्नशिप म्हणजे काय?जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा पदवीधर एखाद्या कंपनीत काही महिन्यांसाठी काम करतो, तिथं काम करताना काही कौशल्य शिकतो, कामाचा अनुभव मिळवतो आणि त्यापोटी त्याला स्टायपेंड मिळते त्याला म्हणतात इंटर्नशिप. एक उदाहरण सांगते. अमृता गोडबोले. बारावीच्या परीक्षेनंतर वेब बेस पोर्टलच्या आधारे ‘वर्क फ्रॉम होम डिजिटल मार्केटिंग इंटर्नशिप’साठी तिनं अर्ज केला होता. पण तिचा अर्ज फेटाळण्यात आला. पण तिनं ‘एका महिन्यात स्वत:ला सिद्ध करण्याची एक संधी कंपनीनं मला द्यावी’ अशी विनंती कंपनीला केली. तिला इंटर्नशिप मिळाली. ती संपता संपताच गेल्या दोन वर्षांपासून ती ब्लॉग्ज लिहू लागली; शिवाय कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी सोशल मीडियाला धरून काय स्ट्रॅटेजी राबवता येतील हे सुचवण्यात ती स्वत: पुढाकार घेऊ लागली. इंटर्नशिपच्या दरम्यान तिनं लिखाणाचं, रिसर्चचं कौशल्य संपादित केलं. ते वापरून तिनं स्वत:चं एक मजबूत नेटवर्क बनवलं. अशा प्रकारे तिनं यूएसमध्ये मास्टर स्कॉलरशिप मिळवण्यासाठी स्वत:चा पाया भक्कम केला. अमृताच कशाला अनेक मुलं हल्ली असं काम करतात. आणि त्यासाठी इंटर्नशिप त्यांना मदत करते. ही इंटर्नशिप ही तुम्हाला खूप काही शिकवू शकते. आपलं खरं ‘पॅशन’ काय आहे ते कळतं. व्यावहारिक कौशल्य शिकता येतात. तुमच्या आवडत्या क्षेत्रातलं नेटवर्क तयार करता येतं. प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो, जो नोकरी मिळवताना खूप उपयुक्त ठरतो. कंपनीच्या प्रोजेक्ट्सवर काम करता येतं. ते करताना कंपनीच्या ग्राहकांशी, कंपनीतल्या लोकांशी संवाद करण्याची, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते. स्टायपेंडच्या स्वरूपात पहिल्या कमाईचा आनंद घेता येतो. यामुळे एक इंटर्नशिप हा एक ‘लाइफ टाइम एक्सपिरिअन्स’ बनून जातो.पण आपल्याला वाटलं म्हणून कुणी का आपल्याला काम देईल?इंटर्नशिप शोधताना काही गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात.१) इंटर्नशिपची संधी शोधण्याआधी आपली आवड नेमकी काय आहे हे शोधावं. आपल्याला काय आवडतं हा पहिला प्रश्न आपणच आपल्याला विचारावा आणि मग इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. आणि जरा विचारपूर्वक काम शोधावं.* तुमच्याकडे तुमचा एक प्रोफेशनल उत्तम रिझ्यूम हवा. तो तयार करून घ्या. तुम्ही केलेल्या प्रोजेक्टच्या आॅनलाइन लिंक्सही रिझ्यूममध्ये असाव्यात. तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांचा स्पष्ट उल्लेख असावा. भलेही हा रिझ्यूम आयुष्यातल्या अगदीच पहिल्या इंटर्नशिपसाठी असेल पण म्हणून तो गबाळा का असेल? आॅनलाइन अनेक साइट्स उत्तम रिझ्यूम बनवण्याचं मार्गदर्शन करतात, त्या पहा. * इंग्रजी उत्तम हवं, त्यावर काम करा. म्हणजे उत्तम ईमेल्स लिहिता येतील, पत्र, रिपोटर््स तयार करता येतील. विशिष्ट क्षेत्रातील इंटर्नशिप मिळवताना त्या-त्या क्षेत्रातील स्किल्स आधीच शिकून घेतलेल्या हव्या. हे शिकून घेण्याची हजारो साधनं आज आॅनलाइन उपलब्ध आहेत. त्यामुळे घरबसल्या काही गोष्टी शिकणं कोणालाही सहज शक्य आहे. * स्टार्टअप अनेक सुरू झालेत, त्यांना इंटर्नची गरज असते. अनेक कंपन्याही इंटर्नसना प्राधान्य देतात. आपण आपल्या रिझ्यूम आणि स्किलसह त्यांच्यापर्यंत पोहचायला हवं.- सर्वेश अग्रवाल -( लेखक इंटर्नशिपसाठी काम करणाऱ्या पोर्टलचे संस्थापक सीईओ आहेत.)