शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

इम्युनिटी वाढवण्यासाठी  तुम्ही  नक्की  काय  करताय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 16:37 IST

इम्युनिटी हा शब्द सध्या स्टार आहे. सिक्स पॅक, फिगर यासा:यांना मात देत इम्युनिटीचे चर्चे आहेत. पण ती वाढणार कशी?

ठळक मुद्देप्रोटीन पावडरी न खाता साधं जेवूनही आपण तब्येत उत्तम राखूच शकतो. 

- नीला देवस्थळी.

कोरोनाकाळाने आपल्याला सगळ्यात मोठा धडा कोणता दिला असेल तर तो म्हणजे जान है तो जहॉँ है. एकदमच इम्युनिटी हा शब्द आपल्या आयुष्यात शिरला. सिक्स पॅक, फिगर या सगळ्या शब्दांची क्रेझच संपवून एकदम इम्युनिटी ही स्टार झाली.जो तो आपली इम्युनिटी वाढवायच्या मागे लागला आणि त्यासाठी मग काढे, व्हिटॅमिन सी-डी, सलाड, पौष्टिक गोष्टी, गरम पाणी, बाहेरचं खाण्याला बंदी हे सारे सोहळे सुरू झाले.अर्थात त्यातून आपल्या तब्येतीविषयी जागरूकता वाढली आणि आपली प्रतिकार शक्ती उत्तम करता आली तर चांगलंच आहे.वजन आणि आकडय़ांच्या पलीकडे जाऊन आपण आता आपल्या तब्येतीचा विचार करायला हवा हे उत्तम.पण प्रतिकारशक्ती ही काही जादूची कांडी नाही, आज औषध घेतलं आणि उद्या वाढली.त्यासाठी भरपूर मेहनतच नाही तर लाइफस्टाइल म्हणून ते स्वीकारायला हवं.त्यासाठी काही गोष्टी नियमित करता येतील. थोडे दिवस नाही तर हे आयुष्यभर करायचं आहे. 

1) व्यायाम आणि योगाभ्यास

बाजारातून आणली औषधं आणि घेतली तरी ती पचली पाहिजे. सप्लिमेण्ट खाऊन आणि मसल्स कमवूनही प्रतिकारशक्ती वाढेलच असं काही नाही. शरीर लवचिकही हवं आणि काटकही. त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे योगाभ्यास. आता तर आपण योगदिनही साजरा करतो. अनेक सेलिब्रिटीही जिमपेक्षा योग उत्तम असं आता म्हणू लागले आहेत.त्यामुळे योगची क्रेझही वाढली आहे. पण म्हणून न करता आपलं शरीर काटक होणार नाही, योगाभ्यास रोज करायला हवा, तो शिकूनही घ्यायला हवा.

2) रोज किती सूर्यनमस्कार घालणार?करिना कपूर म्हणो दिवसाला शंभर सूर्यनमस्कार घालते, शिल्पा शेट्टीही आणि मौनी रॉयही.सूर्यनमस्कार हे सर्वाग सूंदर व्यायाम आहेत. शिवाय करायला सोपे, आणि स्टॅमिनाची परीक्षा पाहणारे. लॉकडाऊनच्या काळात सूर्यनमस्कार घालत राहणं हा मनासाठीही उत्तम व्यायाम आहेच. शरीरासाठी तर आहेच आहे.

3) सायकल कुठं चालवणार?सायकल चालवायला आता लॉकडाऊनमध्ये परवानगी आहे. सुरक्षित अंतर ठेवून, कुणाच्या फार जवळ न जाता, गप्पा मारत न बसता सायकलचा एक राउण्ड मारणं सहज शक्य आहे.अगदी पावसाळा असला तरी. रेस लावू नये; पण एकटय़ानं एक रपेट मारायला हरकत नाही.

4) ऑनलाइन मोफत व्यायामवॉक अॅट होमसारखे अनेक व्हिडिओ मोफत ऑनलाइन पाहता येतात. ऑनलाइन व्यायामही शिकता येतो. करता येतो.फक्त करायला हवा.

5) या सगळ्यासह उत्तम पोषक, साधं, घरचं, लोकल, गरम अन्न हा प्राधान्यक्रम. प्रोटीन पावडरी न खाता साधं जेवूनही आपण तब्येत उत्तम राखूच शकतो. 

(लेखिका डायटिशियन आहेत.)