शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
2
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

दीड जीबी नक्की कशासाठी वापरताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 6:30 AM

जे तंत्रज्ञान आपण आज वापरतोय, ते उद्या बदलतं, आपल्या हातातलं आजचं स्किल उद्या शिळं होतं, ते शिळं झालं की, आपण जॉब मार्केटमधून आउट !

ठळक मुद्देजॉब मार्केटमधून आउट व्हायचं नसेल तर स्वतर्‍ला अपडेट करा !

- विनायक पाचलग

आजचं जग फास्ट आहे हे तर आता सगळ्यांनाच माहीत आहे. इथे कालची गोष्ट आज शिळी होते तर आजची उद्या. साहजिकच या बदलाच्या गतीने बर्‍याचदा भांबावायला होतं. काळाप्रमाणे आपण स्वतर्‍ला अपडेट नाही केलं तर आपण शरीराने तरुण; पण विचाराने म्हातारे होऊन जातो. आजूबाजूचे लोक अचानक आपल्या पुढं निघून गेले की काय असं वाटायला लागतं. आमच्याच कंपनीतला किस्सा पुरेसा बोलका आहे, तीन वर्षापूर्वी आम्ही काम चालू केलं तेव्हा आम्ही ‘फुल स्टॅक’ नावाच्या तंत्नज्ञानात काम करायचो, दीड वर्षापूर्वी आम्ही ‘मीन स्टॅक’मध्ये जायचा निर्णय घेतला आणि आता आम्ही सगळं काम ‘पायथॉन’मध्येच करायचं ठरवत आहोत. म्हणजे काय तर मला आणि माझ्यासोबत काम करणार्‍या डेव्हलपरला 3 वर्षात 3 पूर्ण नव्या गोष्टी शिकून त्यावर काम करायला लागलं. साधारण, असंच काहीसं प्रत्येक क्षेत्नात घडत आहे. तंत्नज्ञानामुळे रोज काहीतरी बदल होतो अणि त्यासाठी स्वतर्‍ला अपडेट ठेवावं लागतं.पण मग प्रश्न असा पडतो की या बदलत्या काळात  स्वतर्‍ला रिलेव्हन्ट ठेवायचं कसं? कारण कॉलेजचा अभ्यासक्रम तर 5-10 वर्षाने बदलतो. आणि त्यांनी एवढय़ा फास्ट बदलणं अपेक्षितपण नाही. कॉलेज तुम्हाला कोडिंग कसं करायचं ते शिकवेल, त्याची भाषा बदलली तर ती आपल्याला स्वतर्‍लाच शिकावी लागेल. कॉलेज आपल्याला बॅलन्सशिट कशी असते ते शिकवेल; पण त्यात जीएसटी आल्यावर काय बदल करायचा हे आपल्याला शिकावं लागेल. आणि ते शिकणंही आता तुलनेनं पूर्वीपेक्षा सोपं आहे. सुदैवानं टेक्नॉलॉजीच  आपल्याला अपडेट व्हायची संधी देतेय, त्यासाठी मदतीला आहेच आपल्या हातातला मोबाइल.‘टेड’ नावाचं एक अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर फक्त 18 मिनिटांची भाषण असतात, आणि जगात नवीन काही येत असेल तर बहुतांश वेळेला त्याचा करता करवता आधी ‘टेड’ टॉकमध्ये त्याविषयी बोलतो. आनंदाची बाब म्हणजे यातली बहुतांशी भाषणं आता मराठी सबटायटल्ससकट आली आहेत. त्यामुळे, तुम्ही जर का आर्किटेक्ट असाल किंवा कलाकार असाल, तर नवीन काय उंबरठय़ावर येऊ घातलं आहे हे इथून पटकन समजतं. आपल्याला हवं ते क्षेत्न सांगितलं तर त्यातले उत्तम व्हिडीओ ते स्वतर्‍च शोधून देतात. त्यामुळे, वक्त्याचे, विषयाचे नाव माहीत नसले तरी काही आडत नाही. अर्थात इथून नवीन काही समजून घेऊन मित्नपरिवारात ते सांगून शायनिंग मारता येते हा अधिकचा बेनिफिट आहेच!ट्विटरचा पण यासाठी खूप चांगला वापर करता येतो. ट्विटर हे काही राजकारणी, मीडिया किंवा स्पर्धा परीक्षावाल्यांनीच वापरावं असं नाही. कोणत्या  ट्विटवरून काय वाद झाला हे चघळण्यापुरतंही ते नाही.  सर्वसामान्य तरु ण जर का ट्विटरवर फक्त वाचक राहिला आणि त्याच्या क्षेत्नातील लोकांना त्यानं फॉलो केलं तरी जगभरची माहिती, चर्चा, ट्रेंड त्याला दिवसाला फक्त 2-3 मिनिट वेळ देऊन मिळू लागतात. कला, क्रीडा, साहित्य, तंत्नज्ञान या सगळ्या क्षेत्नातले ‘हुज हू’ या माध्यमावर असतात. सतत वेगवेगळ्या गोष्टी अपडेट करत असतात. काय करायला हवे, काय नको, पुढच्या पाच वर्षात गोष्टी कोणत्या दिशेला जाणार आहेत हे सगळं इथं फुकट समजतं, त्यासाठी भरमसाठ पैसे देऊन एखादी कॉन्फरन्स अटेंड करायची गरज नसते. ट्विटर हे असं एकमेव माध्यम आहे की जिथे तुम्ही थेट ‘इलॉन मस्क’ला ‘हायपरलूप’ तंत्नज्ञान काय आहे हे विचारू शकता. आणि तो उत्तर देतो.आता मुद्दा असा की, हे सारं करायला हवं हे समजलं, कळलं; पण मग वळवायचं कसं? करायचं कसं?वर मी माझ्या स्टार्टअपमध्ये झालेल्या बदलाचा उल्लेख केला, तेव्हा आम्ही नवीन तंत्नज्ञान कस शिकलं? काम करता करता मोठा चेंज कसा केला? तर तेव्हा आमच्या मदतीला आलं ते ‘कोर्सेरा’ अ‍ॅँप. आमच्या सगळ्या टीमने या अ‍ॅपवरती नवीन तंत्नज्ञानाशी रिलेटेड प्रत्येकी एक कोर्स लावला. आपापल्या गतीने, कामातून वेळ मिळाला की ते हा कोर्स पूर्ण करत राहिले. याच्यामुळे हातातले काम करत करताच त्यांचे स्किल्स अपडेट झाले. कोर्सेरावर बहुतांशी कोर्स फुकट आहेत तर काहींना अगदी काहीशे रुपये इतकीच फी आहे. असे अनेक वेगवेगळे प्लॅटफॉर्म जगभरातल्या टॉप युनिव्हर्सिटीनी आणलेले आहेत. त्यामुळे कॉलेजला परत न जायला लागता आपलं शिक्षण होतं. सो ज्यांना जॉबमध्ये असं वाटतंय की आपण मागे पडत आहोत, त्या प्रत्येकानं अस एखादं ‘मूक’ (मिसव्ह ओपन ऑनलाइन लर्निग’) अ‍ॅॅप आत्ताच्या आता इन्स्टॉल करायला हवं.या खर तर बेसिक स्टेप झाल्या की ज्यानं आपण आजचे , अपडेटेड राहू शकतो. बाकी मग मीडिअम, कोरासारखी अ‍ॅप, वेगवेगळे ब्लॉग आीण कम्युनिटीज, इंजिनिअर असल्यास गीटलॅब सारखं टूल अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्याने आपण सतत शिकत राहतो. आपल्या बॉसला हवेहवेसे वाटतो. फक्त त्यासाठी आपल्याला रोज मिळणर्‍या दीड जीबी डेटाचा स्मार्ट आणि पुरेपूर वापर करायला हवा इतकंच..

(विनायक मुळात इंजिनिअर असून, आता एक स्टार्टअप कंपनी चालवतो)