शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

कायदा काय सांगतो?

By admin | Updated: January 11, 2017 14:48 IST

सहज गंमत म्हणून केलेली गोष्ट गंभीर गुन्हा ठरू शकते. आणि त्यापायी शिक्षाही भोगावी लागू शकते. पोलीस दप्तरी नोंद झाली, तर पासपोर्ट काढण्यापासून परदेशगमनासाठी व्हिसा, नव्या नोकरीतला प्रवेश अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर अडथळे येऊ शकतात! त्याबद्दल

एवढं काही नाही त्यात, पाठवली एखादी अश्लील लिंक आॅनलाइन तर काही मोठा गुन्हा नाही. कोणी लगेच फासावर चढवणार नाही, असं मित्र सांगतात, ते अनेकांना खरं वाटतं.चावट, अश्लील एसएमएस, लिंक्स पाठवल्या तर कुणाला कळणार आहे, कोण काय वाकडं करणार लगेच आपलं, असा अनेकांचा ठाम गैरसमज असतो.पण हा गैरसमज तुम्हाला गोत्यात आणू शकतो.विशेषत: तरुणांना. अनेक तरुण मुलं सहज गंमत म्हणून आपलं डेअरिंग सिद्ध करण्यासाठी म्हणून आॅनलाइन छेडछाड करतात. आणि त्याचे परिणाम काय होतील किंंवा काय होऊ शकतात, याची मात्र त्यांना पुरेशी कल्पना नसते.एक चूक आपल्यावर ‘गुन्हेगार’ असल्याचा शिक्का कायमचा मारू शकते. पोलीस दप्तरी आपल्या नावाची नोंद होऊ शकते. गुन्हे केल्याचं आपलं रेकॉर्ड तयार असतं आणि ते आपली पाठ कधीही सोडत नाही, याची अनेकांना कल्पना नसते. आणि त्यामुळे त्याचं गांभीर्यही वाटत नाही.मात्र आॅनलाइन टाइमपास वाटत असला आणि गंमत म्हणून केलेला असला तरी गुन्हा तो गुन्हाच.कुणालाही (विशेषत: मुलींना) अश्लील क्लिप्स, फोटो, जोक्स, मेसेज पाठवले आणि त्या संबंधित व्यक्तीनं त्यावर आक्षेप घेत जर पोलिसांत तक्रार केली तर पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. अशी तक्रार मुलीनं केली तर सायबर कायद्याप्रमाणेच नव्हे तर थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि त्यानुसार न्यायालयात होणारी शिक्षा ही गंभीर असते.यापुढचा टप्पा अधिक कठोर शिक्षांचा असतो. एकदा का गुन्हेगारी रेकॉर्ड निर्माण झालं तर साधा पासपोर्ट काढून परदेशी, शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणंही अशक्य व्हावं. कारण असं गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्यांस पासपोर्ट मिळणंही अवघड असतं.याशिवाय शाळा-कॉलेजात बदनामी तर होतेच, पण पुढे नोकरी मिळणंही अवघड होऊ शकतं. कारण आपल्यापर्यंतची माहिती संबंधित कंपनीत आधीच पोहचलेली असू शकते. त्यामुळेच गंमत म्हणूनसुद्धा अशा ‘चुका’ आपल्या हातून होऊ नयेत म्हणून तरुण मुलांनी अत्यंत सावध राहायला हवं! तरुण मुलांनीहे विसरू नये१) सोशल मीडिया ही अत्यंत गांभीर्यानं वापरण्याची गोष्ट आहे. तिथं आपल्या व्यक्तिगत आयुष्यातले संदर्भ, फोटो, व्हिडीओ शेअर करताना काळजी घ्यावी. आपल्या पोस्ट ‘पब्लिक’ असू नयेत.२) गंमत म्हणून, सहज म्हणून कधीही कुणाही अनोळखी मुलीस नको ते मेसेज, लिंक्स पाठवू नये.३) ओळखीच्या मुलींना, मैत्रिणींनाही अश्लील वाटेल असे मेसेज, फोटो पाठवू नयेत. त्यांनी तक्रार केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.४) मित्रमैत्रिणींचा कॉमन ग्रुप असला आणि सगळे ‘चलता है’ म्हणत असले, त्यांना चालत असलं तरी आपण कुणाचेही खासगी फोटो काढणे, ते शेअर करणे, व्हायरल करणे असे उद्योग करू नयेत. त्यासंदर्भातही शिक्षा होऊ शकते.५) विनयभंग, ब्लॅकमेलिंग, फसवणूक असे गुन्हे दाखल होऊन कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.तरुण मुलींनी हे विसरू नये१) कुणीही, अगदी जवळच्या वाटणाऱ्या मित्रांनीही आॅनलाइन काहीही अश्लील, वाह्यात मेसेज, फोटो पाठवले तरी त्याला प्रथम कडक शब्दांत ताकीद द्यावी. निषेध नोंदवावा. आणि नाहीच ऐकलं तर घरच्यांना सांगावं.२) आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्येही उगीचच कुणी आपल्याला त्रास देतं आहे, आपले फोटो इकडून तिकडे पाठवतं आहे असं वाटल्यास त्या ग्रुपशी, व्यक्तीशी संपर्क कमी करावा.३) आभासी ओळखीला प्रत्यक्षातली ओळख समजून त्यावर विश्वास ठेवू नये.४) प्रत्यक्षात उत्तम ओळख, मैत्री असेल तरीही अवास्तव मागण्या, इमोशनल ब्लॅकमेल, ग्रुपमधून काढून टाकण्याची धमकी देत केलेल्या मागण्या मान्य करू नये. धोका वेळीच ओळखावा.५) घरच्यांना आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल माहिती देत राहावी. त्यांच्यापासून गोष्टी लपवू नयेत.कायदा काय म्हणतो?शिक्षेचं स्वरूप काय?विनयभंग कलम ३५४- विनयभंग - शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न (१ ते ५ वर्षाची शिक्षा).कलम ३५४ (बी) - विनयभंग करण्यासाठी हल्ला करणं (३ ते ४ वर्षे शिक्षा).कलम ३५४ (सी) - महिलांना कपडे बदलताना अथवा संभोग करताना पाहणं (३ ते ४ वर्षे शिक्षा).कलम ३५४ डी - पाठलाग करणं (हे कृत्य एकदा केल्यास, पहिल्यांदा ३ वर्षे, तर दुसऱ्यांदा केल्यास ५ वर्षे शिक्षा होऊ शकते.)कलम ३५४ अ - शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं (या बळजबरीसाठी तीन वर्षे शिक्षा होऊ शकते.)..........................बलात्कारकलम ३७६ - बलात्कार - सात वर्षे ते जन्मठेप इतकी शिक्षा होऊ शकते. कलम ३७६ (डी) - सामूहिक बलात्कार (जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)कलम ३७६, ३०२ - बलात्कार करून हत्या - (यासाठीही जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)कलम ३७७ - अनैसर्गिक अत्याचार (जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)***पॉस्को कायदाबाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायदा असं या पॉस्को कायद्याला म्हणतात. अल्पवयीन मुले अथवा मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात या कायद्याच्या तरतुदीअंतर्गत कारवाई होते. हा कायदा अतीव कडक असून, दोषी व्यक्तीस कठोर शिक्षेची तरतूद आहे.फसवणूक, धमकीकलम ३०७, ३०२ - अ‍ॅसिड हल्ला करणं, तसा प्रयत्न करणाऱ्यास मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.कलम ४२० - फसवणूक, खोट्या भूलथापा देणं यासाठी १ ते ५ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.कलम ५०९ - धमकावणं, धमक्या देऊन दडपण आणणं यासाठी तीन वर्षे शिक्षा होऊ शकते. कलम ३८४, ८५ - खंडणीसाठी धमकावणं, पैसे मागणं यासाठी तीन वर्षे शिक्षा होऊ शकते.- अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर ख्यातनाम वकील