शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

न वापरातल्या वस्तूचं तुम्ही काय करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:52 IST

गरजेपोटी आपण काही वस्तू घेतो. सायकल किंवा पुस्तकं. ते वापरून झाल्यावर आपण काय करतो? त्या पडून राहतात. त्यापेक्षा त्या वस्तू कुणाला वापरायला दिल्या आणि त्यांनी त्या पुन्हा गरजूंना देऊन टाकल्या तर एक मदतीचं चक्र सुरू होऊ शकेल!

ठळक मुद्देअनेकदा वस्तू आपल्याजवळ धूळ खात पडून असतात. असा वस्तूंचा वापर प्रवास सुरू करता येईल का?

- मुकेश जाधव

मोटारसायकल रस्त्यावरून धावण्यापूर्वी ‘सायकल’ला चारचाकीचा सन्मान होता. ज्यांच्याकडे सायकल असायची त्यांची गणना मध्यमवर्गीय/श्रीमंत गटात व्हायची. म्हणजेच ‘अंगणात सायकल’ हापण परिस्थिती बरी असल्याचा निकष असायचा. आज लोक टू व्हीलर, फोर व्हीलरची जी काळजी घेतात तीच काळजी त्यावेळेस सायकलची घ्यायचे. घरातून बाहेर पडताना सायकल पुसून चकाचक व्हायची. सायकलच्या टायरमधील हवा तसेच सायकलचे ब्रेक तपासले जायचे. आठवडय़ातून एकदा तरी ऑयलिंग आणि सायकलवर पाणी पडायचं. काही छंदींच्या सायकलला तर आरसा अन् रेडियमच्या प्लेट्सची सजावटपण असायची. सायंकाळी रस्त्यावरून अनेक सायकली धावताना दिसायच्या. सायकलीचा एक वेगळाच मिजास होता. पुण्याची तर ‘सायकली’चे शहर अशीही एक ओळख होती. त्याच पुण्यातील एका सायकलीच्या प्रवासाची ही गोष्ट..पुणे विद्यापीठ म्हणजे हुशार, गरीब, होतकरू विद्याथ्र्याचा गोतावळा. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हे विद्यार्थी कुणाच्या तरी मदतीने आणि  कुणाकडून तरी ऐकिव माहिती घेत शिक्षणाची भूक भागविण्यासाठी, ध्येयप्राप्तीचं स्वप्न घेऊन विद्यापीठात ढेरेदाखल होतात. अशा विद्याथ्र्याना आजही ‘सायकल’ हे वेळ व पैशाची बचत करणारं आनंदाचं एक साधन वाटतं म्हणून अनेक विद्यार्थी विद्यापीठात व कामानिमित्त पुणे शहरात सायकलवरून फिरताना दिसतात.दीपक जाधव हा मूळचा सोलापूरचा. सोलापूरच्या ‘वालचंद कॉलेज’चा विद्यार्थी. घरची परिस्थिती बेताचीच म्हणजे गरिबीची व्याख्या शिकण्याची कधी त्याला गरज पडली नाही,आतार्पयत तो ती अनुभवत आला होता. बी.ए.ला असतानाच प्रा. नीलासरांनी पुणे विद्यापीठाबद्दल बरंच काही सांगितलं होतं. म्हणूनच एम.ए. करायचं ते पुणे विद्यापीठातूनच हे त्याचं त्यानंच ठरवलं. त्यानुसार पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्र विभागात एम.ए.ला त्यानं प्रवेशही घेतला.राज्यशास्त्र विभाग विद्यापीठातील एक नावाजलेला विभाग. विद्वान प्राध्यापक आणि चळवळा विद्यार्थी यामुळे राज्यशास्र  विभागाचं एक वेगळंच वलय विद्यापीठात आहे. सुरुवातीला सारं काही नवीन वाटतं; परंतु लवकरच कमवा-शिका, विभाग, लेक्चर, जयकर लायब्ररी, तात्त्विक चर्चा, अनिकेत, ओपन, आदर्श कॅन्टीन, ऐलीस गार्डन हे पुणे विद्यापीठातील विद्याथ्र्याच अंगात भिनत जातं.विद्यापीठात त्यावेळी वेगवेगळ्या कारणांसाठी विद्यार्थी आंदोलन करत, उपोषणाला बसत. कधी एम.फील - पीएच.डी.च्या विद्यावेतनाबाबत, कधी होस्टेलबाबत, कधी रिफेटरी, कॅन्टीनच्या भाववाढीबाबत तर कधी नेट-सेटच्या प्रश्नाबाबत काहीना काही सुरूच. त्याच्या सोबतीला सिनेटमधील चर्चा, विभागातील विविध विषयांवरील चर्चासत्रं, विद्यापीठात साजर्‍या होणार्‍या जयंती आणि पुण्यतिथी या सर्व घटनांना पत्रकारांच्या माध्यमातून वर्तमानपत्रात, माध्यमात प्रसिद्धी मिळायची. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया, माध्यम, पत्रकारिता, पत्रकार हे शब्द खूप वजनदार वाटायला लागले. या सर्वाचा परिणाम म्हणजे मीडिया हे एक बदलाचं ‘वलयांकित’ माध्यम आहे याची प्रथमच प्रकर्षाने जाणीव झाली, त्या जणिवेतून दीपकसारखे अनेक मित्र पत्रकारितेकडे वळले.पुणे विद्यापीठाच जर्नालिझम डिपार्टमेंट थेट विद्यापीठाच्या बाहेर एफ.सी.रोडवर, रानडे इन्स्टिटय़ूट. साहजिकच पीएमटीने पुणे विद्यापीठ ते म्हसोबा गेट जायचं आणि  म्हसोबा गेटपासून पायी ‘रूपाली’, ‘वैशाली’ करत करत रानडेला पोहचायचं. पण  पैशांची, म्हणूनच दीपक व त्याच्या मित्रांनी सायकलची व्यवस्था केली. पुणे विद्यापीठ ते रानडे हा नित्य नवीन अनुभव देणारा रोजचाच प्रवास त्यातून सुरू झाला. या मित्रांना जाताना फारसं काही वाटायचं नाही कारण जाताना उताराचा मार्ग; परंतु येताना मात्र त्यांची चांगलीच दमछाक व्हायची. त्यामुळे ते कधी कधी ज्ञानेश्वर पादुका चौकातून वरच्या मार्गाने सेनापती बापट रस्त्याला किंवा सिम्बॉयसिस, गव्हर्नमेंट पोलिटेक्निककडून विद्यापीठ गाठायचे. या प्रवासातून अन् त्यांनी घेतलेल्या कष्टातून त्यांच्या पदरात पत्रकारितेची पदविका पडली. त्या आधारावर ते ‘पत्रकार’ म्हणून कार्यरत झाले.दीपकनं ठरवलं आपली सायकल आपल्यासारख्याच गरीब व होतकरू विद्याथ्र्याला  वापरायला द्यायची; पण ती एका अटीवर, ती म्हणजे त्या विद्याथ्र्यानंसुद्धा सायकलचा वापर झाल्यानंतर दुसर्‍या विद्याथ्र्याला ती वापरायला द्यायची. अशा प्रकारे दीपकच्या सायकलचा प्रवास एका हातून दुसर्‍या हाती सुरू झाला. परंतु दुर्दैवाने जो मित्र ही सायकल वापरत होता त्यानं ‘पत्रकार भवना’जवळ ही  सायकल ठेवली असताना तेथून ती चोरीला गेली. परंतु ही झाली अपवादात्मक गोष्ट. आपल्याजवळसुद्धा  पुस्तकं, रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक साधनं, कपडे, पादत्राणं, फर्निचर, टेबल लॅम्प, सायकल, बॅग यासारख्या अनेक वस्तू असतात की ज्या आपली गरज संपल्यावर दुसर्‍याच्या उपयोगी येणार्‍या असतात. परंतु अनेकदा या वस्तू आपल्याजवळ धूळ खात पडून असतात. असा वस्तूंचा वापर प्रवास सुरू करता येईल का? ही वापराची सायकल अनेकाना मदतीचा हात बनू शकेल, काय वाटतं?

 

(नबीरा महाविद्यालय, काटोल, जिल्हा नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)