शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही (जमल्यास) प्रेमानं वागू!

By admin | Updated: February 12, 2015 16:45 IST

आपल्याला तू खूप आवडतेस, येत्या व्हॅलेण्टाईन्स डेला तू म्हणशील ते करीन, तुङयासाठी कायपण! मात्र परवापासून (परवा काय आहे? असं विचारूसुद्धा नकोस,

डीअर ¬gf
 
आपल्याला तू खूप आवडतेस, येत्या व्हॅलेण्टाईन्स डेला तू म्हणशील ते करीन, तुङयासाठी कायपण!
मात्र परवापासून (परवा काय आहे? असं विचारूसुद्धा नकोस, विचारल्यास मी ब्रेकप करीन रागाच्या भरात, ओके?) मात्र पुढचा किमान दीड महिना, सुरक्षित अंतर ठेवून रहायचं! कसलेही सेण्टी मारायचे नाहीत. माझा काही इम्पॉर्टन्सच नाही तुङया आयुष्यात, मी काही तुझी प्रायॉरीटी नाही, असले पुराने डायलॉग चिपकवायचे नाहीत, मला काहीही फरक पडणार नाही.
मी तुङो फोन घेईनच असं नाही. घेतले तरी काहीतरी फालतू सांगत रहायचं नाही. माझा मूड पाहून बोलायचं. एखादी मॅच गेली असेल तर मी ‘गम’मधे असेन, अशावेळी किंवा नको त्यावेळी रोमॅण्टिक व्हायचं नाही. या दीड महिन्यात आपल्या लाइफविषयी ‘महत्त्वाचे’ कुठलेही निर्णय घेतले जाणार नाहीत, त्यामुळे उगीच कसलाही लकडा लावू नये.
आणखी एक अतिमहत्त्वाचं, ‘सचिन आऊट झाला का? आता सचिन नाही तर मला काही इंटरेस्टच नाही.’ असले अत्यंत सुमार इमोशनल डायलॉग मारू नयेत.
वारंवार या अशा घटना घडल्यास होणा:या परिणामांची जबाबदारी माझी नाही. नसेल!
 
डीअर bf
आपलं एकमेकांवर प्रेमबिम आहे, आपण एकदम मेड फॉर इच ऑदर आहोत, याविषयी मला काहीच शंका नाही. 
पण दोन गोष्टी आपण आपल्यात आत्ताच क्लिअर करून घेऊ.
नियम एक, तुला फार क्रिकेट कळतं आणि मला कळत नाही, असा फील देण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही.
नियम दोन, मॅच पाहत असताना पोरी काय फक्त क्रिकेटिअर्सवर मरतात, बाकी त्यांना स्पोर्टशी काही देणंघेणं नसतं, असले ‘लूक’ द्यायचे नाहीत.
कारण मला उत्तम क्रिकेट कळतं. तुङयाइतकंच माझं पॅशनही मोठं आहे.
त्यामुळे उगीच नको ती कॉमेण्ट्री, आपले ज्ञानप्रदर्शन कार्यक्रम करू नयेत. आपल्या मित्रंमधे ज्या काही डिंग्या हाकायच्या त्या हाकाव्यात, मात्र मी जर एखादा बॉल वाईड आहे किंवा नो बॉलच पडलाय असं ठामपणो सांगितलं तर अग्यरु करायचं नाही, पहायचं अम्पायर काय बोलतात ते!
सगळ्यात महत्त्वाचं, आपलं नातं वेगळं, माङो क्रिकेटमधले फेवरिट्स वेगळे. त्यामुळे तुला कोहलीच माङयापेक्षा जास्त हॅण्डसम वाटतो ना, असले टुकार सेण्टी टाकायचे नाही.
मी ‘हो’ म्हणोन आणि तुझी पंचाईत होईन.!!
तेव्हा जरा जपून.
 
मौसम तो प्यार का है ही.
उसपर मौका भी है, मौसम भी है. और दस्तूर भी.
त्यामुळे आपल्या नात्यात 
पुढे जाऊन काही घोळ नकोत म्हणून, 
येत्या महिना- दीड महिन्यात प्रेमात पडलेल्या 
क्रिकेटवेडय़ांशी बाकीच्यांनी कसं वागावं
याची ही एक आचारसंहिताच जारी करण्यात येत आहे.
त्याप्रमाणं न वागल्यास होणा:या 
किंवा न होणा:या परिणामांना
संबंधित व्यक्तीच जबाबदार असतील 
याची कृपया नोंद घ्यावी.
(किंवा न घ्यावी, आपल्याला काय?
आपण पुढचे काही दिवस, 
आपल्याच मनाप्रमाणं जगणार असल्यामुळं, 
इतरांना फक्त एक इशारा देत आहोत,
 बाकी काय करायचं ते करून घ्या.
जा, बिल फाड मेरे नाम के, नहीं डरता किसी के बापसे.
असाच आपला अॅटिटय़ूड राहणार आहे.!)
- काही पागलप्रेमी
क्रिकेटवेडे आणि क्रिकेटवेडय़ाही
कळावे,
 
डीअर  दोस्तलोग
 
दोस्तांना काय सांगायचं, आपण एकदम एकदिल-एकजान आहोतच.
मात्र तरीही दोन-तीन गोष्टी क्लिअर केलेल्या ब:या.
मागच्या वर्ल्डकपच्या वेळेस हे व्हॉट्स अॅप नावाचं प्रकरण काही आपल्या आयुष्यात घुसलेलं नव्हतं.
ना तिथले ग्रुप होते, ना त्या ग्रुपवर पडीक राहण्याची सक्ती.
त्यामुळेच हे स्पेशल मेन्शन की, मॅच चालू असतील त्या काळात मी व्हॉट्स अॅप वापरीनच असं नाही. वापरलं तरी माङया सोयीनं वापरेन.
मला वाटलं तर क्रिकेटविषयी बोलेन, नाही वाटलं तर नाही बोलणार!
पण म्हणून कुणी भल्या पहाटे उठून ग्रुपवर स्कोअर टाकण्याचं काम करू नये.
ज्याला गरज तो उठेल आणि पाहील मॅच, उगीच कुणी कष्ट करून आपण कसे पॅशनेट फॅन आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू नये. शिवीगाळ करत आपला राग किंवा आनंद व्यक्त करत आपली प्रेडिक्शन पाडू नयेत!
चर्चा करायचीच झाली तर आपण प्रत्यक्ष भेटून करू. उगीच टुकटूक -टुकटूक करण्यात काही गंमत नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचं,
आपण सगळ्यांनी मिळून केलाच समजा एखादा क्रिकेट लव्हर्स व्हॉट्सअॅप ग्रुप, तर त्यात फक्त क्रिकेट कळणा:या मुलींनाच एण्ट्री द्यावी.
बाकीच्यांना नो एण्ट्री!
(यात कुठल्याही मुलीचा अपमान करण्याचा हेतू नाही, मुलींना क्रिकेट कळतं हे मान्य; पण सगळ्याच मुलींना कळतं, असं नाही. ज्यांना कळतं, त्यांनी कमेण्ट आपल्यावर ओढूनताणून मारू नये. धन्स!)
 
डीअर बॉस
 
डीअर असं म्हटलंय त्यातच सारं आलं, सो हॅपी व्हॅलेण्टाईन्स डे!
एक विनंती होती म्हणून ही बारकीशी नोट.
प्लीज बॉस, प्लीज.. एक गोष्ट लक्षात ठेवा, येते काही दिवस मी रोज पहाटे उठणार आहे, अर्थात मॅच पहायला. सकाळी उठण्याशीच माझं किती वैर आहे, हे जास्त सांगत नाही. तरी मी उठणार आहे. त्यात मॅच जिंकलो तर मी आनंदानं पागल झालेलो असेल, हरलो तर दु:खानं.
त्यामुळे प्लीज ट्राय टू कोपअप, उगीच नस्त्या आणि जास्तीच्या कामाच्या अपेक्षा ठेवू नयेत. (तसेही दिवस अॅपरायझलचेच आहेत!)
आल्याआल्या बारक्या चुकीवरून झापू नये, जरा मूड पाहून बोलावे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आज कुणाची मॅच होती, असं चारचौघात विचारू नये, फार वाईट दिसेल तुमचं अज्ञान. त्यामुळे थोडं अपडेट रहावं. मूड पाहून बोलाल तर तुम्ही म्हणाल ते काम जास्त ताकदीनं होईल. मॅच जिंकल्याच्या आनंदात मी चार कामं जास्तीची करीन, डोण्ट वरी!
मात्र मॅच गेलेली असली, तर तू कशाला चेहरा पाडून बसलास, ते तिकडे पैसे कमावतात, आपला काय संबंध? असे उपेदशडोस देऊ नयेत.
मी मानसिक धक्का बसला म्हणून ऐनवेळेस चार दिवसाचं मेडिकल सर्टिफिकेट पाठवून देईन!!
तेव्हा प्लीज, येते काही दिवस जीओ और जीने दो तत्त्वावर आपण काम करू शकलो तर बरं होईन!
बाकी मला नोकरीची गरज आहे, त्यामुळे कृपया गैरसमज नसावा.
बाकी, हॅपीवाला व्हॅलेण्टाईन्स पुन्हा एकदा.
विथ लव्ह.!!