शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
3
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
4
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
5
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
6
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
9
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
10
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
11
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
12
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
13
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
14
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
15
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
16
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
17
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
18
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
19
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
20
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे

वुई लूक ग्रेट! - हा क्रायटेरिया आहे का जोडी छान दिसण्याचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:00 IST

चल माणूस होऊया, पुढचं डिप्रेशन येण्याआधी अ‍ॅडव्हान्स्ड काळजी घेऊया...

- श्रुती मधुदीप

‘‘दीपिका काय सुंदर दिसते ना! व्हेरी अ‍ॅट्रॅक्टिव्ह! या इंटरव्ह्यूमध्येसुद्धा कसली दिसतेय! चेहर्‍यावर गोड हासू घेऊन गोड आवाजात बोलते.’’ - तो म्हणाला.‘‘हं’’ म्हणून तरीही तिने इंटरव्ह्यूूमधून आपलं लक्ष बाजूला केलं नाही. तिलाही दीपिका खूप आवडत होती. त्याला दीपिका आवडत असल्याने तर तिला आणखीनच आपण दीपिकासारखं असावं, व्हावं, तिच्यासारखं दिसावं, तिच्यासारखे कपडे घालावेत, असं वाटू लागलं.‘‘रणवीर सिंग मात्र त्याच्या अ‍ॅक्टिंगला एका लिमिटच्या पुढे नेत नाही असं वाटतं, हो ना?’’ ती त्या व्हिडीओवरची नजर न हलवता म्हणाली.‘‘हो, पण छान दिसतात दोघं सोबत! परवा इन्टाग्रामला त्यांनी अपलोड केलेला फोटो कसला सुंदर आहे!  माय गॉड! दे लूक ब्यूटिफुल विथ इच ऑदर’’ - तो म्हणाला.‘‘हं.. खरंच !’’ आणि ते मुलाखत पाहण्यात गढून गेले.मुलाखतकार - दीपिका, द इंटरव्ह्यू कॅन नॉन कम्प्लिट विदाउट टॉकिंग ऑन यूअर फिल्म ‘तमाशा’, यू डीड ग्रेट वर्क इन इट! दीपिका - (हसून) थॅँक्स.मुलाखतकार - बट रणवीर, आय वॉण्ट टू आस्क यू दॅट, कौनसी जोडी हीट है.. रणबीर-दीपिका या आप दोनो?रणवीर - ऑफकोर्स मी अ‍ॅण्ड दीपिका! रणवीर और दीपिकाने ‘तमाशा’ और ‘यह जवानी है दिवानी’ में काम किया है. दोनो फिल्म्स बहुत क्युट है, उसमे रोमान्स है. उसमे फ्रेण्डशिपवाला फीलिंग है. लेकीन आपने अगर ‘रामलीला’ देखी तो उसमे जो ड्रायव्हिंग फोर्स है यू कॅन नॉट कम्पेअर! वो जो इंटेसिटी है, ‘रामलीला’ इज व्हेरी सेन्शुअस. इट हॅज अ लॉट ऑफ पॅशन. सो! याह! आय मीन, वी बोथ लूक ग्रेट विथ इच ऑदर.(दीपिकाचं हसू)तिने एकदम इंटरव्ह्यूकडे लागलेली तिची नजर खाली घेतली. आतून थरारून आल्यासारखं वाटलं तिला. तिने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहर्‍यावर हसू उमटलं होतं. तिने पुन्हा इंटरव्ह्यू पहायला सुरुवात केली. पण आता तिचं लक्ष लागेना. काही क्षण ती अस्वस्थ झाली आणि तिने अचानक त्याला न विचारता व्हिडीओ बंद केला. त्याला एकदम काय झालं कळेना. एक क्षण चीडच आली त्याला.‘‘काय झालं? थोडाच बाकी होता. असा अचानक बंद का केला?’’ - तो तिच्यावर ओरडलाच.‘‘मला बोअर झालं म्हणून’’ असं म्हणेर्पयत तिने लॅपटॉप शटडाउन केला. आणि बॅगमध्ये ठेवायला सुरुवात केली.‘‘अगं.. बोअर काय ! मी बघत होतो नापण? माझ्याविषयी काही आहे की नाही?’’ - तो.‘‘तुला त्या व्हिडीओमध्ये काहीच त्रासदायक वाटलं नाही?’’ - तिने विचारलं.‘‘काय त्रासदायक होतं त्यात? सेलिब्रिटींच्या मुलाखतीतून मजा घ्यायची असते. तसंही आपल्यालाही जाणून घ्यायची इच्छा असतेच की तेवढंच त्यांचं पर्सनल आयुष्य. बसल्या बसल्या आपल्यालाही प्रश्न पडत असतातच यार दीपिकाचा स्वभाव कसा आहे, रणवीर आणि दीपिकाची स्टोरी काय आहे. तिला मधे डीप्रेशन का आलं होतं, तिने त्याच्याशी कसं डील केलं..’’ - तो.‘‘हं..’’ ती काहीच बोलली नाही.‘‘हं काय?’’ आता त्याला चीडच आली.‘‘मग तुला असं वाटलं नाही का की ती आता दुसर्‍या डिप्रेशनमधे जाऊ पहातेय?’’ - तिने विचारलं.‘‘म्हणजे?’’ तो न कळल्यासारखा उभा राह्यला.‘‘म्हणजे त्या मुलाखतीत तुला काहीच ऑब्जेक्शन घ्यावं असं वाटलं नाही?’’‘‘नाही. काय आहे ऑब्जेक्शन घ्यावं असं?’’‘‘रणवीर म्हणाला की, मी आणि दीपिकाने सेन्शुअस फिल्म्स केल्या आहेत, पॅशनेट. त्यामुळे मी तिच्यासोबत कसा ग्रेट दिसतो असं बोललाय तो! हे काय कारण असू शकतं आम्ही दोघं कसे चांगले दिसतो सोबत हे सांगण्याचं? रणबीर कपूर आणि दीपिकाच्या फिल्म्समध्ये क्युटनेस, फ्रेण्डशिप आणि रोमान्स! पण आम्हा दोघांच्या फिल्ममध्ये हॉटनेस! पॅशन! इंटेसिटी! यू नो सेन्शुअस सीन्स! सो वी लूक ग्रेट? हा क्रायटेरिया आहे का जोडी छान दिसण्याचा? आणि यावर दीपिकाला हसू येतं? तिला तिची किंमत कमी होतेय हे कळत नाही? कसल्या डिप्रेशनच्या बाता करते ती. पुन्हा डीप्रेशनमध्ये जाईल ती या माणसासोबत राहून, ज्याला त्या दोघांचं भारी असणं त्यांच्या हॉट सीन्समध्ये दिसतं! आणि तुला ह्यात काहीही चुकीचं वाटत नाही. इन फॅक्ट तुझ्या चेहर्‍यावर गोड हसू फुललं होतं. हे सगळं ऐकताना..’’ तिला राग प्रचंड अनावर झाला होता. भडाभडा बोलून टाकलं तिनं. तो तिच्याकडे पहातच राह्यला.काय बोलावं त्याला सुचेना. थिजून गेला.काही क्षण कुणी काहीच बोललं नाही. तो गॅलरीत जाऊन उभा राह्यला. ती संतापून सोफ्यावर बसली हळूहळू शांत होऊ लागली. त्याला नक्की काय झालं हे तिला कळलं नाही. ती गॅलरीत गेली.  तो पाठमोरा उभा होता. किंचित हळुवार वारा वाहत होता. ती समोर गेली. तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्या तिच्या खांद्यावरच्या हाताचा स्पर्श जाणवून त्यानं त्या हातावर हात ठेवला. आणि तो तिच्याकडे वळून तिला म्हणाला..‘‘आय एम सॉरी.’’त्याच्या डोळ्यात तिला ओल जाणवली.‘‘खरं सांगू..’’ अजूनही त्याने तिच्या डोळ्यात पहायची हिम्मत केली नव्हती.‘‘माझीही नजर स्त्री म्हणजे माझ्यासोबत जी सेक्स करू शकेल इतकीच मर्यादित आहे गं. मला माफ कर. यातून मी माझ्या लाइफ पार्टनरची किंमत कमी करतो हे मला कळतच नव्हतं. माझ्यातल्या या पुरुषाला माफ कर. मला तुला सगळ्या नात्यात भेटायचं गं. तुला समजून घ्यायचंय, तुझ्या स्त्री असण्यापल्याड जायचंय. तुझ्या ह्या शरीरपल्याड जायचंय..’’तिने त्याच्या हातावर हात ठेवले.‘‘चल माणूस होऊया, पुढचं डिप्रेशन येण्याआधी अ‍ॅडव्हान्स्ड काळजी घेऊया.’’आता मात्र त्याने हिम्मत करून तिच्या डोळ्यात पाह्यलं. त्याच्या डोळ्यात काहीतरी नवीन चमक होती.