शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेक-अप

By admin | Updated: May 4, 2017 07:09 IST

शिट्ट! आठ वाजले. पुन्हा उठायला उशीर झालाय. हे काम काल रात्रीच संपवायला हवं होतं. कधी बरं झोपलो रात्री? दीड वाजला

शिट्ट! आठ वाजले. पुन्हा उठायला उशीर झालाय. हे काम काल रात्रीच संपवायला हवं होतं. कधी बरं झोपलो रात्री? दीड वाजला होता वाटतं. आणि हे असं खुर्चीतच झोपलो? लाइट्स चालू, पंखा चालू, लॅपटॉप चालू. तरी बरा चार्जिंगवर आहे. काय काय सेव्ह झालंय पाहायला हवं. आठवत नाहीये. मान दुखतेय. थंडी वाजतेय.यार हे असं एकटं राहण्यात हाच मोठ्ठा प्रॉब्लेम आहे. काळजी घ्यायला कुणीच नाही. घरी असतो तर रात्रीच आजोबांनी गादीवर झोपवलं असतं. मानेपासून पायापर्यंत पांघरूण घातलं असतं. सकाळी आई आली असती. रात्री मी सांगितलेल्या वेळी उठवायला. घरी असणं सुख आहे.पण नाही.आपलं आपल्याला जमायला हवं सगळं. हो, म्हणून तर ना हा सगळा आटापिटा. आणि जमतं पण की कधी कधी. स्वत:ला कधी काय हवं नको ते कळणं, स्वत:ची नीट काळजी घेणं. ही झोप मात्र सगळा हिरमोड करते. कितीही टक्क जागं राहायचं ठरवलं, कितीही चहा कॉफी ढोसली तरी डोळे आपोआप मिटू लागतात. डोक्यात आवाज येऊ लागतात. पुरे झालं. दमलोय. झोपू आत्ता. सकाळी लवकर उठून काम करू. फ्रेश असू तर फटाफट होईल. नस्ते लाड स्वत:चे! कशाला लागते इतकी झोप? मुळात काम असताना झोप येतेच कशी बरं? असं कोणतं काम असेल जे करताना झोप विसरून जायला होईल? ते म्हणतात तसं जगणंच स्वप्न होईल आणि मग झोप येणारच नाही वगैरे वगैरे. सब बकवास.हवं तेव्हा हवं तेवढं जागता यायला हवं आणि हवं तेव्हा हवी तेवढी झोप. कशी बरं करावी प्रॅक्टिस? विचार करायला हवा. पण आत्ता नको. आत्ता सगळ्यात आधी लेट्स वेक-अप. काम खत्म किया जाय.हो जाय एक कप चाय! - प्रसाद सांडभोर -