शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

व्ह्यू , अँगल आणि क्लिक

By admin | Updated: February 26, 2015 21:06 IST

नॅशनल जिओग्राफिक चॅनलवरचा एक रिअॅलिटी शो, खास फोटोग्राफरसाठीचा आणि आव्हान होतं,

 नॅशनल जिओग्राफिक चॅनलवरचा एक रिअॅलिटी शो, खास फोटोग्राफरसाठीचा आणि आव्हान होतं, मुंबई नावाचं कुठल्याच कक्षेत न सामावणारं शहर आणि त्यातले क्षण अचूक टिपण्याचा, ते आव्हान टिपणा:या स्पर्धकात एकजण होता, ‘लोकमत’चा  तरुण फोटोग्राफर ओमकार कोचरेकर, कॅमे:याआडच्या जगातल्या रिअॅलिटीची ही एक सफर त्याच्याच शब्दात.

 
 
खरंतर वर्तमानपत्रत काम करणारा फोटोजर्नलिस्ट कायम कॅमे:याच्या मागे असतो. जे घडतं ते टिपायचं अशी साधारण वर्तमानपत्रत काम करणा:या फोटोग्राफरला सवय असते. त्याच्या फोटोत बातमी असते, रिअॅलिटी असते. पण म्हणून एखाद्या दिवशी तो फोटोग्राफरच एखाद्या रिअॅलिटी शो चा भाग होऊ शकतो, यावर मीदेखील विश्वास ठेवला नसता!
पण तसं घडलं खरं! नॅशनल जिओग्राफीक चॅनलवर ‘नॅट जिओ कव्हर शॉट 3 मॅक्सिमम सिटी’ नावाचा एक रिअॅलिटी शो असतो. त्या शोचं हे यंदाचं तिसरे पर्व होतं. फोटाग्राफर्सचा हा रिअॅलिटी शो, त्यांना एक थीम देतात आणि त्या थीमवर त्यांनी जगणं टिपावं अशी साधारण त्याची संकल्पना. या शोविषयी कळल्यावर आपणही त्यात भाग घ्यावा असं मला वाटलं आणि मी एण्ट्री म्हणून माङो फोटो पाठवले.
देशातील हजारो फोटोग्राफरमधून माझी या रिअॅलिटी शोसाठी निवड झाली. मी खरंच हरखून गेलो होतो, पण त्या स्पर्धेत टिकणं आणि आपल्या कॅम:याचीच नव्हे तर नजरेचीही कमाल दाखवणं हे खरंच एक आव्हान होतं. 
एकतर होतं काय की, वृत्तपत्रत काम करताना आम्ही फोटोग्राफर आधी फोटो काढतो आणि मग त्याला कॅप्शन दिली जाते. त्या फोटोत काय आहे हे वाचकांना थोडं उलगडून सांगितलं जातं. 
या शोच्या पहिल्याच फेरीत हे गणित बरोबर उलटं होतं. त्यांनी आधी आम्हाला थीम दिली, आधी फोटोची कॅप्शन सांगितली आणि मग त्या कॅप्शनचं परफेक्ट वर्णन असेल असा फोटो शूट करायला सांगितला.  पहिल्या राऊंडमध्ये माङयासह इतर चार स्पर्धक होते. आमच्या ग्रूपला दिलेल्या टास्कचं नाव होतं, ‘कल्चरल स्पोर्ट्स’. 
आणि कॅप्शन होती, ‘ग्रॅव्हीटी बी गॉन’, विषय होता ‘मल्लखांब’. आणि वेळ तीन तासांची. फोटो कितीही काढले तरी चालणार होते, पण काढलेल्यापैकी फक्त दोनच फोटो सबमिट करता येणार होते. त्यातला एक होता फ्रीज अॅक्शन (स्तब्ध) आणि बॅक स्टेज (पूर्वतयारी). इथंच खरा कस लागणार होता.
सायंकाळी चारच्या सुमारास टास्कला सुरूवात झाली. पावसाळ्य़ाचे दिवस , आकाश करडं, अगदीच उदास-मळभ आलेलं वातावरण. मल्लखांब करणा:या खेळाडूंनी व्यायामाला सुरूवात केली पण मी फोटो ब्लाइंड झालो होतो. त्यात नवीन असं काही दिसतच नव्हतं कारण मी याआधीही खूपवेळा मल्लखांब खेळणा:या खेळाडूंचे फोटो काढले होते. त्यामुळे त्यात मला काहीच नवीन सापडत नव्हतं. दुसरीकडे माझी प्रतिस्पर्धी फोटोग्राफर फ्लॅशचा वापर करून भराभर फोटो काढत होती. 
व्यायाम करणारे खेळाडू तीन ते चार मिनिटं  मल्लखांबावर प्रात्यक्षिक करत. मग काही वेळ आराम करत. पुन्हा प्रात्यक्षिकांना सुरूवात करत. तीन ते चार सेकंद स्तब्ध राहत फोटो काढण्याची संधी देत. मी प्रत्येक अँगलने फोटो काढत होतो. वाईड लेन्सचा वापर करून, मधेच झूम करून त्यांची प्रत्येक पोज फ्रेममध्ये टिपण्याचा प्रयत्न करत होतो. फोटो काढल्यावर तो कसला आलाय हे तपासण्याची तसदीही घेत नव्हतो. पण तरी समाधान होत नव्हतं, मला प्रतिक्षा होती एका युनिक अॅक्शनची. अडीच तास होऊन गेल्यावर शेवटी ढगाळ वातावरणामधून एक सूर्यकिरण आला. आणि त्या किरणावर मला सिल्व्हेट फोटो मिळाला. सिल्व्हेट म्हणजे त्या फोटोत व्यक्तीच्या मागून येणा:या प्रकाशामुळे तिचा चेहरा दिसत नाही. मात्र मागील बॅकग्राऊंड स्पष्टपणो दिसते. या टास्कमध्ये फ्रीज फोटोसाठी मी याच सिल्व्हेट फोटोची निवड केली. आश्चर्याची बाब म्हणजे याच फोटोला ‘फोटो ऑफ द डे’ ने सन्मानित करण्यात आले.
एकाच विषयाचा किती बारकाईनं आणि तरीही किती जलद विचार करता येतो, हे त्या टास्कनं शिकवलं. स्पर्धा होती, पण ती स्वत:शीच जुंपल्यासारखी डोक्यात सुरू झाली होती.
या टास्कनंतर स्पर्धेतल्या अंतिम आठ स्पर्धकांमध्ये मी पोहचलो. 
दुसरा  राऊंड सुरु झाला, कॅप्शन होती, ‘क्लॉक वॉक मुंबई’. अर्थातच घडाळ्य़ाच्या काटय़ावर चालणारी मुंबई. यावेळी तीन फोटो काढायचे होते. पण मुंबईचा चेहरा सांगणारे तीन फोटो नव्हेत. त्या तीन फोटोंमधून एक स्टोरीच पूर्ण सांगायची होती. स्टोरीसाठी विषय मिळाला, मुंबईचा ‘डबेवाला’. 
माङयावर पुन्हा एकदा फोटो ब्लाइंड होण्याची वेळ आली. कारण तेच मी खूपवेळा डबेवाल्यांचे फोटो काढले होते. आता त्यात नवीन काय काढायचं, हा प्रश्न होता. फोटो म्हणून एक पोट्रेट (व्यक्तीचा चेह:यासह फोटो ) फोटो आणि इतर दोन फोटो, जे गोष्ट पूर्ण सांगतील अशी थीम होती. त्या फोटोतही डबेवाल्याचा किमान एक अवयव दिसणं तरी भागच होतं.
सकाळी रिमङिाम पावसातच आयोजकांनी नेमून दिलेल्या डबेवाल्यासोबत निघालो. त्याच्यासोबत गप्पा मारत चालत फोटोही काढत होतो. प्रथमच डबेवाल्यांच्या ऑफीसमध्ये गेलो. थोडा चकाकलो. कारण डबेवाल्यांचेही ऑफीस असते हे मला माहितच नव्हते. मुळात डबेवाल्यांना रस्त्यावरच पाहिलेले, डबेवाला ऑफिसात डबे पोहचवतो हे माहिती होतं, पण त्याचं ऑफिस मी तरी पाहिलेलं नव्हतं. त्याच्या कामाचीही सुरूवात त्याच्या ऑफीसमधून होते हे खूपच कमी लोकांना माहित असेल, असा विचार करून मी स्टोरीची सुरूवात इथूनच करू म्हणत पोट्रेट फोटो तोच काढला. 
मग डबेवाल्याचं लोकलमधे डबे चढवणं. त्याची धावपळ, टेन्शन हे सारं टिपत चाललो होतो. पण तरी समाधान होत नव्हतं. पण तितक्यात खांद्यावर डबा लावून ट्रेनमधून बाहेर डोकावणारा डबेवाला मी टिपला. नंतर माटुंगा रेल्वे स्थानकाबाहेरील एका इमारतीत शिरलो. इमारतीत प्रवेश करताना डबेवाल्याच्या पहिल्या पावलाचा फोटो क्लिक केला. वेळेचे प्रतिक म्हणून पाऊल आणि उदरनिर्वाहाचे प्रतिक म्हणून मी त्याच्याकडच्या डब्यांना टिपलं होतं.
 या टास्कमध्ये एकूण तेराशे फोटो काढले. कारण डबेवाल्याच्या प्रवासातील कोणतीही मूव्हमेंट मला चुकवायची नव्हती. म्हणून फोटो खूप काढले, पण निवड चुकली. आपलं रोजचं जग आपण नव्या नजरेनं पाहू शकत नाही, हा धडा इथं शिकलो. कारण माझा  पोट्रेट फोटो पाहून परिक्षकांनी खूपच नाराजी व्यक्त केली. मला घरचा रस्ताच दाखवला. माङयाबरोबर आणखी तीन स्पर्धक बाहेर पडले.  स्पर्धेतील आपला प्रवास संपला असं वाटले. मात्र बाहेर पडलेल्या सर्व स्पर्धकांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. आणि बाहेर पडलेल्या 13 स्पर्धकांच्या सर्व फोटोंचे परिक्षण करून 4 स्पर्धकांना वाईल्ड कार्ड एंट्री देण्यात आली. त्यात मला संधी मिळाली होती.
तिसरं टास्क पुण्यातील लोहगडावर रंगणार होतं. यावेळी कॅप्शन होती ‘मान्सून ब्लीस’ (पावसाचा आनंद). केवळ दोन फोटोंमधून पावसाचा आनंद व्यक्त करायचा होता. अडचण होती, आयोजकांनी एलसीडी स्क्रीन काळ्य़ा पट्टीने ब्लॉक केली होती. त्यामुळे काढलेला फोटो त्याचक्षणी पाहता येणार नव्हता. या सरप्राइजमुळे सर्वच स्पर्धकांना शॉक बसला. मात्र मी शांत होतो. कारण फोटो जर्नलिस्ट असल्याने काढलेले फोटो लगेच स्क्रीनवर पाहण्याची सवय मला तरी नव्हती. मात्र खरे आव्हान होते, ते नेचर फोटोग्राफीचे. कारण याआधी मी नेचर फोटोग्राफी कधीच केली नव्हती.
गड चढायला सुरूवात होताच मी धडाधड फोटो काढत होतो. गडाचा आवाका खूप मोठा होता. त्यामुळे गडावर चढताना डाव्या बाजूचे फोटो काढायचे की उजव्या? अशा संभ्रमावस्थेत अडकलो. शेवटी मी माङो व्हीजन कमी केले. म्हणजेच प्रथम छोटय़ा गोष्टींचे फोटो काढू लागलो. थोडा आत्मविश्वास दुणावल्यावर व्हीजनही मोठे केले. मात्र स्क्रीन ब्लॉक केल्याने फोटो चांगले आलेत की नाहीत, ते पाहता येत नव्हते. त्यात कमी वेळेत गडावर पोहचायचे होते. अध्र्याहून अधिक गड सर केल्यानंतर एक वाईड व्ह्यू दिसला. त्यात एकाच फ्रेममध्ये डोंगर आणि नदी दिसत होते. हा नजारा मला वेगळा वाटला. गडाच्या मध्य भागावरून खाली वाकून पाहिल्यावर वेगळाच टॉप अँगल दिसला. त्यात गडावर फुटलेली पालवी पाहून जणूकाही गडाने हिरवी चादर पांघरली आहे, असा भास होत होता. थोडय़ा वेळासाठी मी कॅप्शन  विसरून केवळ जी दृष्ये आवडतील ते फोटो काढत होतो.
पण स्पर्धेत माङो फोटो टिकले नाहीत आणि मी बाहेर पडलो. माङयासाठी तो रिअॅलिटी शो संपला.
मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने मी जी फोटोग्राफी शिकलो ती एरव्ही कधीच शिकता आली नसती.  रिअॅलिटी शो म्हटलं की, एक वेगळंच चित्र, एक वेगळीच स्पर्धा आपल्या डोळ्यासमोर येते. पण आपण ज्या विषयात काम करतो, त्या विषयात आपलं कसब पणाला लावायचं हे आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. ते आव्हान पेलायची मानसिकता आणि फोटोसाठींची नजर हीच खरी तर माझी या स्पर्धेतली कमाई!
 
 
( शब्दांकन- चेतन ननावरे)