शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बघ्यांचं व्यसन नात्याचा बळी

By admin | Updated: October 1, 2015 17:46 IST

‘तसलं काही’ सतत पाहण्याचं बळावलं की, फक्त ‘पाहण्यात’ रस उरतो बाकी कुठल्याही प्रकारच्या कृतीला नकार मिळतो.

‘तसलं काही’ सतत पाहण्याचं बळावलं की,
फक्त ‘पाहण्यात’ रस उरतो
बाकी कुठल्याही प्रकारच्या कृतीला नकार मिळतो.
त्यातून काहीजण स्वत:च्या
व्यक्तिगत संबंधातलं सुख
आणि निकोप संवादही हरवून बसतात.
 
आशिष आणि माधुरीचा नुकताच डिव्होर्स झाला. खरंतर त्यांचा सुखी संसार. दोघंही उत्तम नोकरी करणारे. चांगला पगार. एक मुलगा. राजाराणीचा संसार. अगदी दृष्ट लागावी असा. पण मग थेट डिवोर्सपर्यंत पोचण्याचं कारण काय?
तर पोर्नोग्राफी साईटस.
आशिषला पोर्नोग्राफी साईटस बघण्याचा शौक होता. सुरुवातीला ‘तसलं काही’ कधीतरी बघणारा आशिष नंतर नंतर रोज रात्री पोर्नोग्राफी साईटस बघू लागला. तसलं काही बघितल्याशिवाय त्याला झोप येईनाशी झाली. पुढे पुढे तर झोपच येईनाशी झाली. रात्नभर पोर्नोग्राफी साईटस बघत बसायचं आणि पहाटे कधीतरी थोडावेळ झोपायचं असं सगळं सुरु  झालं.
आपला नवरा रात्र रात्र जागून करतो काय हे शोधण्याचा माधुरीने खूप प्रयत्न केला पण दर वेळी काहीतरी कामाचं निमित्त तो काढायचा. पुढे पुढे ‘रूटीन सायकल’ विस्कळीत झाली आहे त्यामुळे झोप येत नाही. तू झोप असं सांगून माधुरी झोपली की आशिष पोर्नोग्राफी साईटस बघायला बसायचा. आपण कधी या सगळ्याच्या आहारी जातो आहोत हेच त्याला समजलं नाही. माधुरीला हळूहळू शंका यायला लागली. कारण एरवी तिच्यासाठी अतूर असलेला आशिष आता तिला टाळायला लागला होता. पोर्न साईट्स पाहण्यातच प्रचंड गुंतण्यातून बायकोच्या शरीराप्रती आणि मनाप्रती आपल्या काही जबाबदा:या आहेत याचंही भान हळूहळू संपून गेलं. 
आपला नवरा रात्र रात्र नेमकं करतो काय हे शोधायला जेव्हा माधुरीनं सुरु वात केली तेव्हा तिला धक्काच बसला. नव:याशी बोलण्याचा, त्याला पोर्नोग्राफी साईटस डिअॅडिकशन सेंटरमध्ये पाठवण्याचा प्रयत्न पण तिने केला पण या कशालाच आशिष आणि त्याच्या घरच्यांनी दाद दिली नाही. हळूहळू आशिषचं कामावरचं लक्ष कमी व्हायला लागलं. तो इतर व्यसनांच्या आहारी गेला. आणि शेवटी  तिनं आशिषसमोर घटस्फोटाचा पर्याय ठेवला.
***
फॅमिली कोर्टात गेलं तर पोर्नसाईट्स पाहण्यापासून इंटरनेट अॅडिक्शन आणि सोशल नेटवर्किंगमधून झालेला घोळ अशी कितीतरी कारणं घटस्फोटामागे हल्ली दिसतात.
हातातल्या मोबाईवर इंटरनेट आल्यापासून तर या वेळ मिळेल तेव्हा, गुपचुप, कुठेही, कधीही बघण्याची सोय झाली आहे. पण या सोयीचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम हा कुटुंबांवर आणि  स्त्री-पुरु षांच्या लैंगिक जीवनावर होतो आहे. सातत्याने अशा फिल्म्स क्लिप्स आणि व्हिडीओ बघितल्यामुळे अनेकांमधे शरीरसंबंध करण्याइतपत सुद्धा इच्छा शिल्लक राहत नाही. तर काहीजण आपल्या जोडीदाराकडून ‘तसल्या’ अपेक्षा ठेवू लागतात.
त्यातून मग एकमेकांचे मोबाईल पाहणो, त्यावरुन भांडणं, कज्जे, निराशा, राग, संताप अशा भावना बळावतात आणि नात्यात तेढ निर्माण व्हायला सुरु वात होते. हल्ली रात्रीच्या जागरणांचं भारी कौतुक करण्याकडे कल आहे. पण पोर्नोग्राफी साईटस बघता बघता रात्र जागवणं आणि काहीतरी महत्वाच्या कामाने पछाडून रात्र जागवणं यातला फरकच समजेनासा झाला आहे. या जागरणाचा शरीरावर, मनावर ताण येतो. प्रॉडक्टीव्हीटी कमी होत. कामात लक्ष लागत नाही. 
आशिण आणि माधुरीची केस जवळून बघताना लक्षात आलं की त्या दोघांमध्ये विसंवाद होण्याचं अजून एक कारण म्हणजे आशिषचं घरात लक्ष नसणं. रात्रभर जागरण केल्यानंतर सकाळी जाग उशीरा यायची. मग ऑफिसला जाण्याची घाई. ऑफिसला उशीरा पोचल्यामुळे घरी परतायला उशीर. त्यामुळे घरातल्या कामांचा, मुलाच्या संगोपनाचा सगळा ताण माधुरीवर यायला लागला. त्यात माधुरीही नोकरदार त्यामुळे नोकरी करुन घर सांभाळताना  तिची दमछाक व्हायला लागली. ताण वाढत गेले आणि  एक दिवशी तुकडा पडला.
अशी पोर्नोग्राफी साईटस मुळे तुकडा पडलेली किंवा तुकडा पडण्याच्या बेतात असलेली कितीतरी कुटुंब, आशिषसारखे पोर्नोग्राफीच्या मायाजालात हरवून गेलेले पुरु ष आणि त्यांच्या या सवयीने त्रसलेल्या बायका आजूबाजूला सर्रास बघायला मिळतात. 
मुळात ज्यावेळी अशा साईटस बघण्याची इच्छा सातत्याने होते, तीव्रपणो होते तेव्हा आपल्याला या गोष्टीची सवय जडली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि कुठल्याही सवयीचा अतिरेक झाला तर त्याचं व्यसन होतं हेही समजून घेतलं पाहिजे.
मुद्दा इथे पोर्नोग्राफी साईटस बघणं चांगलं की वाईट हा नाहीये.
प्रश्न हा आहे की पोर्नोग्राफी साईटस बघून एखाद्याच्या तब्येतीची हेळसांड होणार असेल, एखाद्याचं कुटुंब मोडून पडणार असेल तर यातली मौज खरचं तेवढी गरजेची आहे का? 
महत्वाची आहे का?