शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

वारी

By admin | Updated: July 14, 2016 23:44 IST

वारीचं स्वरूप, इतिहास, संत परंपरा, शिकवण हे सारंच आपल्याला एकदम कळेल असं नाही. पण वारी हा आपल्याला विविधतेचं दर्शन देणारा एक अनुभव असतो, हे नक्की!

- हलीमाबी कुरेशी
 
वारीत भेटणारं तारुण्य
कुठलं असतं?
राज्यातलं, देशातलं तर असतंच;
पण विदेशातूनही अनेक तरुण वारीचा
अभ्यास करायला येतात.
काही वारक:यांसाठी मनोभावे
सेवा द्यायला हजर होतात.
त्यांच्या नजरेतून वारी पाहणं
हा आपल्याच समाजाचा
एक वेगळा अनुभव असतो.
 
बूम हातात घेऊन वारी ‘कव्हर’ करताना 
भेटत गेलेल्या तारुण्याविषयीचा
एक खास रिपोर्ट..
 
वारी..
अनेक अर्थानी समृद्ध.
मानवी जीवन संपन्न करणारी. 
अर्थातच, तुम्हाला ती नीट समजून घ्यावी लागते. 
वारीचं स्वरूप, इतिहास, संत परंपरा, शिकवण हे सारंच आपल्याला एकदम कळेल असं नाही. पण वारी हा आपल्याला विविधतेचं दर्शन देणारा एक अनुभव असतो, हे नक्की!
 अशी ही वारी मी जवळजवळ चार र्वष शब्दश: अनुभवली.
संत तुकाराम मार्गावरचं केडगाव चौफुला हे माझं गाव. भक्ती संप्रदाय, सामाजिक एकोपा हे या गावाचं  वैशिष्टय़. शेतकरीपट्टा मोठा. शुक्रवारी इजतेमाला (इस्लामिक धार्मिक प्रवचन) जसं जायचं, तसंच हायस्कूलजवळच्या विठ्ठल मंदिरातलं काल्याचं कीर्तन ऐकायचं आणि ािश्चन असलेल्या बाईंकडे नाताळ फादरचं प्रवचनही. केडगावमध्ये  सर्वच  संप्रदाय जवळून अनुभवता आले. 
मी बी.एस्सी. करत असताना एनएसएसमधून विद्यापीठाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या दिंडीतूनही वारीत सहभागी झाले होते. पायी वारीचा तो पहिलावहिला अनुभव समृद्ध करणारा होता. वारीत सहभागी झालेली काही मंडळी पूर्णपणो संप्रदायातली. काहीजण वक्ते, तर काहीजण फक्त वारी समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी खास आलेले. वारक:यांना मदत करणं, स्वच्छतेविषयी जनजागृती करणं असं खरंतर या वारीतलं आमचं मर्यादित काम होतं. बाकीचा वेळ वारक:यांशी गप्पा मारता यायच्या. तेव्हा जाणवलं की, खरंतर सगळा महाराष्ट्रच अनुभवण्याचा एक दुवा म्हणजे ही वारी आहे. मराठवाडा, कोकण, खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या सा:या भूभागातले श्रीमंत-गरीब-आदिवासी- मजूर सारेच वर्ग या वारीत सहभागी होतात. 
 वारीमध्ये जसा भक्ती संप्रदायातील माणूस सहभागी होऊ शकतो तसाच नास्तिकदेखील. हे वाचताना विरोधाभासी वाटेलही पण ते खरं आहे. संत जनाबाई, संत कान्होपात्ना, चोखामेळा हे माङो आवडते संत. आणि अर्थातच संत तुकारामांच्या अभंगातले पुरोगामी संदेश ऐकणं हे सारं वारीसोबत चालतानाही वेड लावणारं आहे. या सा:याचा हात धरून जितकं खोल जावं तितकी वारी अधिक खोलवर कळत जाते, उलगडत जाते. आणि आपला अनुभवही त्यातून समृद्ध होत जातो. 
आयबीएन लोकमत चॅनलसाठी वारीचं वार्ताकन करताना वारीत सहभागी होणारा तरुण वर्ग भेटत गेला. महाराष्ट्राच्या कानाकोप:यातून आलेला हा युवा वर्ग वेगवेगळ्या कारणांसाठी सहभागी होत आहे असं त्यांच्याशी बोलताना जाणवतं. ही मुलं वारीत सहभागी होतात आणि आपल्या हातातलं आधुनिक तंत्नज्ञान आणि इंटरनेटचाही वापर करत वारी लोकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड करतात. अनेकांचे हे हौशी उपक्रमही सच्च्या कळकळीनं सुरू असलेले दिसतात. त्यातही फेसबुक, व्हॉट्सअॅप याद्वारे वारी सगळ्यांर्पयत पोहोचवण्यात पुण्यातील युवा मंडळी तशी आघाडीवरच!
वारीत चालताना राज्यातूनच नाही तर देशभरातून, जगभरातून आलेल्या तरुण मुलामुलींशी बोलताना वारीकडे पाहण्याची प्रत्येकाची एक वेगळी नजरही आपल्याला दिसत जाते.
वारीत समता, बंधुता कशी दिसते याची उदाहरणं  शोधत, त्यांचं डॉक्युमेंटेशन करत असलेला अस्लम सय्यद सारखा तरुण फोटोग्राफर इथं भेटतो. याशिवाय अनगढशहा बाबा, श्रीगोंद्याचे शेख मोहमद महाराज, जैतुनबी दिंडी इथं जेव्हा भेटते तेव्हा धर्माच्या पलीकडे माणुसकी जोडणारी ही वारी परंपरेतली उदाहरणं आपल्याला दिसतात. हे सारं अस्लम सय्यद आपल्या फोटोग्राफीतून मांडत आहे.  
अशीच एक पंचविशीची विद्यार्थिनी, वर्धा पाठक. ती पीएचडी करतेय. ती वारीत नेमानं सहभागी होणा:या वारक:यांचा सामाजिक-राजकीय दृष्टिकोन  याचा अभ्यास करते आहे.
देशातूनच कशाला, विदेशातूनही वारीचा अभ्यास करायला तरुण येतात. लंडनच्या विद्यापीठात शिकणारी आणि वारीवर पीएचडी करणारी जॅकलिनही याच वारीत भेटली. तिनं अगोदर भारतीय संस्कृती समजावून घेतली. धर्म समजावून घेतला. आणि मग वारकरी संप्रदायातील ‘महिला संत’ या विषयावर अभ्यास करत तिनं पीएचडीही पूर्ण केली. 
इथल्या महिलांचं जगणं तिनं समजून घेण्याचा अतोनात प्रय} केला. दोन र्वष ध्यास घेतल्यागत तिनं आपल्या मातीतल्या महिला संत समजावून घेतल्या. वारीविषयी तिला विलक्षण कुतूहल होतं. तीदेखील वारीच्या वेगळ्या खुणा शोधत होती.
काही असे अभ्यास करणारे, तर काही तरुण विविध सामाजिक उपक्रमातून या वारीत सहभागी होतात. वैद्यकीय  विद्यार्थी वारीत हमखास भेटतात. वारक:यांच्या दुखल्याखुपल्याची औषधपाणी देत काळजी वाहतात.  युवा महिला डॉक्टरांशी बोलले तेव्हा अनेकींनी सांगितलं की वारक:यांच्या शारीरिक व्याधीवर उपचार करून समाधान मिळतं. म्हणून तर अनेकजण समाजोपयोगी सेवा पुरवत मनोभावे वारक:यांच्या सेवेत हजर होतात दिसतात. 
 ग्रामीण भागात वारी हा मोठा सोहळा आहे. वारी करून दिंडय़ा गावोगाव परततात तेव्हाही त्यांच्या स्वागतासाठी गावातील युवावर्ग वेशीवर हजर असतो. संत साहित्याचा अभ्यास करणारे युवकही वारीत मनोभावे सहभागी होतात. 
या सा:यांना भेटलं की वाटतं वारी अनेकांसाठी भक्तिमार्ग असला, तरी या वारीत सामाजिक, आर्थिक, राजकीय असे अनेक विषय दडलेले आहेत. 
एक विद्यार्थिनी आणि पत्रकार म्हणूनही मी वारी अनेक अर्थानी अनुभवली. मोठय़ा मायेनं आणि आग्रहानं देऊ केलेली दिंडीतली पिठलं-भाकरी खाल्ली आहे. आणि रमजान ईददेखील वारीत अनुभवली आहे.
एक मात्र नक्की, काही हौशी मंडळींना ही वारीही आताशा एक इव्हेण्ट वाटू लागली आहे. पण वारी इव्हेण्ट नाही हे लक्षात घ्यायला हवं.
 वारी हा एक ध्यास आहे..
तो ध्यास काय, हे समजून घेणं हेदेखील वारी चालणं आहे.
 
वारीत भक्ती संप्रदाय समजून घेण्यासाठी येणारे युवक असतात. पण वारीचा, संतपरंपरेचा अभ्यास करणारे युवक आताशा कमी असतात.  परंपरेने जे वारी करतात त्यात युवा कीर्तनकार, वारकरी आहेत. मात्र ज्यांना वारीची फक्त क्रेझ वाटते, वारी हा एक इव्हेण्ट आहे असं वाटून वारी चालणारेही अनेक तरुणतरुणी सर्रास दिसतात.  वारी इव्हेण्ट म्हणून एन्जॉय करणं, फोटो काढणं,   सेल्फी स्टिकने सेल्फी घेत ते फेसबुकवर अपलोड करणं याचाचा अनेकांना सोस आहे. मित्न-मंडळींना गोळा करून सहलीप्रमाणो वारीतही धुडगूस घालणारे काही नग दिसतात. 
मानाच्या दिंडय़ांमधील वारकरी त्यामुळे अनेकदा नाराजही होतात. म्हणूनच चोपदार फाउंडेशनचे राजाभाऊ वारीत सहभागी युवकांना वारी समजून घेण्याचं आवाहन करतात. अनेक युवक-युवती त्यांच्याकडून वारी सामाजिक अंगाने समजून घेत आहेत.
 
(लेखिका आयबीएन-लोकमत चॅनलच्या पुणो प्रतिनिधी आहेत.)