शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डोर्सीच्या ‘सटकू’ लाइफस्टाइलची एवढी चर्चा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 07:30 IST

तो ट्विटरचा सहसंस्थापक, मल्टिमिलिअन डॉलर्सचा मालक. मात्र दिवसातून एकदाच जेवतो. साधंच. घरचंच. रोज आठ किलोमीटर चालतच ऑफिसला जातो. वाहन वापरत नाही. आणि ऑफिसमध्येही बसून काम न करता, उभ्यानंच काम करतो. रोज योग-ध्यानधारणा नियमित करतो आणि म्हणतो, साधंसोपं करून पाहू जरा जगणं! त्या जॅक डोर्सीची ही गोष्ट.

ठळक मुद्देजॅक डोर्सीच्या लाइफ स्टाइलची सध्या जगभर चर्चा आहे.

- प्राची पाठक

घरोघरी तरुण पिढीला ऐकू येणारे टिपिकल सल्ले कोणते असतात? -अरे, काय त्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलाय?- ऊठ गं जरा. ते हेडफोन काढ आधी कानातले. कान खराब होतील आणि जरा कामं करा. किमान स्वतर्‍चं तरी वेळच्या वेळी आवरत चला. - करिअर करायचे दिवस आहेत तुमचे. ही काय नसती थेरं? कपडे बघा यांचे. फाटक्या जीन्स दुप्पट पैसे देऊन विकत घेतात. दोनदा वापरतात, टाकून देतात. पैशाची काही किंमत उरलेली नाहीये!- दिवस-रात्न कोणाशी बोलत असतात फोनवर तासन्तास काय माहीत?,- जरा दोन पावलं चाला. कष्ट पडू देत त्या शरीराला जरा. जरा कुठे इथून इथे जायचं असेल, तरी यांना गाड्य़ा-घोडय़ा पाहिजेत. नाहीतर, बटण दाबलं की ऑनलाइन बोलवायची गाडी. दीडकी कमवायची अक्कल नाही; पण सुखं पाहिजेत महाराज- महाराण्यांसारखी.- घरचं गिळवत नाही का, सतत बाहेरचं खायला चटावलेत.***ही अशी डायलॉगबाजी होत नाही असं घर सापडणार नाही. घरोघरी तरुणांच्या अंगावर  भिरकावली जातात ही वाक्यं. पुन्हा पालूपद असतंच, तो अमुक बघा, कसा पुढे चाललाय  आयुष्यात आणि तुम्ही बघा कुठे रुतून पडलाय! आता घरच्यांना जे आदर्श वाटतात, ते तरुणांना अजिबात ‘कूल’ किंवा ‘आयडॉल टाइप्स’ वाटत नाही, अमुकतमुकला फॉलो करतो म्हणणं तर त्याहून अवघड. कारण तरुणांना ज्या व्यक्ती रोल मॉडेल्स वाटत असतात, त्या घरच्यांना माहितीच नसतात. आणि माहिती असल्या तरी घरातल्या मोठय़ांना काही त्या तितक्याशा भारी वाटत नसतात.या सार्‍या दंगलीत तरुण मुलांच्या जगात अलीकडे एक नवीनच नाव चर्चेत आहे, आणि त्याला फॉलो करू नका रे बाबांनो, म्हणत काही आईवडीलही काळजीनं व्याकूळ झालेले आहेत.आपल्याकडे नाही, अमेरिकेत. मात्र चर्चा तशी जगभर आहे.तर त्याचं झालं असं की, ‘ट्विटर’चा सहसंस्थापक आणि सीईओ, आणि ‘स्क्वेअर’ या मोबाइल पेमेंट कंपनीचा संस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी. त्याच्या हटके लाइफ स्टाइलमागे अनेक तरुण-तरुणीही वेडे झालेत. अलीकडेच एका पॉडकास्ट मुलाखतीत 43 वर्षीय जॅकनं त्याच्या आगळ्यावेगळ्या जीवनशैलीची तपशीलवार माहिती दिली. आणि त्याची ती लाइफ स्टाइल पाहून अनेकांना वाटलं की, हे ‘ट्राय’ करून पाहिलं पाहिजे.

कशी आहे जॅक डोर्सीची जीवनशैली?

बिलिअन डॉलर कंपन्यांचा हा संस्थापक, सीईओ आठवडय़ातून दोन दिवस तर घरूनच काम करतो. उरलेल्या दिवशी चालत ऑफिसला जातो. किती लांब? जवळपास आठ किलोमीटर अंतर चालतच तो ऑफिसला जातो. ब्रिस्क वॉक करत करत जातो, आणि साधारण 75 मिनिटांत तो ऑफिसला पोहोचतो. वाहन वापरत नाही. हे कमीच म्हणून तो रोज गार पाण्यानं अंघोळ करतो. रोज सकाळी लवकर उठायचं, पहाटे पाच-सहाच्या दरम्यान- थंड बर्फाळ पाण्यानं अंघोळ करायची आणि चालत जाण्याचा वेळ हाताशी ठेवून ऑफिसला जायला निघायचं. चालताना जीवनविषयक मंत्नबिंत्न सांगणारं तत्त्वज्ञान ऐकत चालायचं. जॅक म्हणतो की, या चालत जाण्यातून त्याच्या मनाला तजेला मिळतो. वेगवेगळे पॉडकास्ट्स ऐकता येतात. स्वतर्‍चा विचार करता येतो. दिवसाला अठरा अठरा तास काम करतो तो. चालायचा व्यायाम कमी की काय, दिवसातून दोन- तीन वेळेस सात मिनिटांचे जलदगती व्यायाम करतो. ऑफिसमध्ये अनेकदा स्टँडिंग डेस्कवर म्हणजे उभं राहूनच काम करतो. चालून, जलद व्यायाम करून, उभ्यानं काम करूनच बहुदा त्याचं पोट भरून जात असावं. म्हणून तर तो दिवसातून फक्त एकदा जेवतो. एकदाच जेवतो. तेही संध्याकाळी साडेसहा ते नऊ वाजेच्या दरम्यान. नंतर काहीही खात नाही. हे झालं फक्त पाच दिवस. आठवडय़ाच्या शेवटी तर तो काहीच खात नाही. 

कधी कधी विकेण्डला तो तब्बल 72 तासांचा उपवास करतो. पाणी पिऊन राहातो. त्याची ही ‘वन मिल अ डे’ नावाची लाइफ स्टाइल आहे. आणि त्याचीच नाही तर जगात अनेक लोक असं एकदा खाऊन 23 तास उपवास करतात. आणि ते शरीराला अपायकारक की पोषक यावरून अनेक आहारतज्ज्ञ, फिटनेस एक्स्पर्टस, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञ, अमेरिकेत सध्या तुफान चर्चा करत आहेत. काहींनी तर जॅकला खाण्याशी संबंधित काही विकृती असावी, असंही निदान करून टाकलं आहे. जॅक मात्र त्याची लाइफ स्टाइल भक्तिभावानं जगतो आहे. तो दिवसातून जवळपास दोन ते अडीच तास मेडिटेशन करतो, ते वेगळंच. विपश्यनादेखील शिकला आहे. सुरुवातीच्या काळात जॅकने मॉडेल म्हणून काम केलंय. काही सॉफ्टवेअर्स डेव्हलप केलेत. याही काळात तो योग आणि मेडिटेशनच्या मागे सतत असायचा. इतकं की हळूहळू त्यानं दिवसातून एकदाच खाणं, दोन तास मेडिटेशन, चालत ऑफिसला जाणं अशा सगळ्या चित्नविचित्न सवयी आपल्या जगण्याचा एक भागच करून टाकल्या. त्यातील काही सवयींचे अनुकरण करून बघायचा प्रयत्न अमेरिकेतले तरु ण मोठय़ा प्रमाणावर करताना दिसत आहेत. जॅक सांगतो की, आपण दिवसभर फक्त खाण्याचाच विचार करतो, नास्त्याला काय, जेवायला काय, त्यात किती एनर्जी जाते. डोक्यात तोच विचार. शांतपणे जगावं. सोपं-साधं करावं जगणं हे मला महत्त्वाचं वाटलं, ते मी माझ्यापुरतं केलं आहे.-हे असं जगणं साधंसोपं खरंच करता येईल का? येतं का? एकदा जेवणं आणि पायी चालणं हे प्रतिकात्मक की त्यापलीकडे जाते ही जीवनशैली हे सारे प्रश्नच आहेत.मात्र सध्यातरी अनेक तरुणांना जॅकचे विचार महत्त्वाचे वाटत असल्याने त्याचे ‘फॉलोअर्स’ही एकदम वाढलेत.जगण्याचे प्रयोग असे सुरूच राहतात.जॅकच्या जीवनशैलीत आणि विचारांत आपल्याला झेपेल, जमेल, घेण्यासारखं आहे असं वाटेल ते घ्यावं. पटलं तर!

****************

 कशाला हा अघोरी खटाटोप?

घरात/दारात सगळी सुखं असताना, हातातल्या मोबाइलमध्ये चटकन दोन -चार बटणं दाबून हवी ती डिश मागवायची आणि हवी तेव्हा हवी ती गाडी बोलवायची सोय असतानाही जॅक डोर्सी हे असं का वागत असेल?हे असं मैलोन्मैल चालत जाणं, बर्फाळ पाण्यात डुबकी मारून दिवस सुरू  करणं, एकदाच जेवणं, तेही ठरलेल्या वेळी हे सारं अंगीकारणं सोपं कसं असेल?दिवसातून कितीदा आणि काय काय आपल्या आवडीचं चबरचबर खायची एक सवय आपल्याला सुखासुखी लागलेली असते. तिच्यावर काम करून एकदम कमी खाणं तर अवघडच. खाण्यापिण्याचा एखादा विचार आत्मसात करून आपली जीवनशैली बनवून टाकणं तर आणखीनच कठीण. आपल्याच्यानं साधं सकाळी लवकर उठणं होत नाही! मग या डोर्सीला हे सारं का करून पाहावंसं वाटत असेल अशी चर्चा जगभर आहे. चंगळवादाकडून पुन्हा उलट दिशेनं जाणारी ही चाकं आहेत का, असंही काहीजण तपासून पाहत आहेत. काहींना तो त्याचा वैयक्तिक चॉइस असेल किंवा असेल काही ‘बायो हॅक’ तंत्न अथवा फॅडही असेल असंही वाटतं.तसंही सिलिकॉन व्हॅलीत असे अनेक बिलियन डॉलरतज्ज्ञ आहेत, जे अशा ‘सटकू’ वागण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जसं की अ‍ॅपल कंपनीचे स्टीव्ह जॉब्स. आठवडा आठवडा ते एकाच प्रकारचा आहार घ्यायचे. एकावेळी फळं तर फळंच खाईन असं काही. फेसबुकचा संस्थापक मार्कझुकरबर्गदेखील त्याच्या बायो हॅकिंगबद्दल प्रसिद्ध आहे.अर्थात, ज्यांना लोक यशस्वी म्हणतात, त्या लोकांनी असे काही फॅड्स अंगिकारले तर ते शरीराला नेमकं फायद्याचं असतं की नाही की ते केवळ फॅडच आहे, हे नीटसं समजून न घेता अनेक लोकं त्यांना फॉलो करून लागतात.  मात्र दुसर्‍यानं अंगीकारलेली जीवनशैली स्वीकारताना ती आपल्याला झेपेल, जमेल का? याचाही विचार केलेला बरा!

***********

फार गडबड झाली, फिरा मागे!

आजकाल सर्वत्न आहार सजगता वाढताना दिसत आहे. लोकांना व्यायामाचं महत्त्व पटत आहे. अद्ययावत जिम सर्वत्न सुरू होत आहेत. ज्या पिढीला पिझा, बर्गर खाणारी पिढी असं लेबल चिकटलं आहे, त्याच पिढीत एकीकडे महागडय़ा जिमला जाण्याचं प्रमाणदेखील वाढताना दिसतंय. आणि तरीही ओव्हरवेट तरुणाईची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. मोबाइलमुळे तळहातावर सगळं मनोरंजन येऊन ठेपले आहे. आजूबाजूला विविध आकर्षणं आहेत, हाय पॅकेजेसच्या नोकर्‍यांची आस आहे. अशावेळी आयुष्यात काहीतरी संपादन केलेला कोणी एखादा या नोकरीच्या स्पर्धेत तगून राहत असतानाच ‘बॅक टू बेसिक’ जाऊन स्वतर्‍च्या जीवनशैलीत काही साधेसोपे बदल आणत असेल, तर तो चर्चेचा विषय होतोच होतो.