शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही डे साजरा केला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 15:11 IST

टीव्हीच्या प्रचारासाठी जागतिक टेलिव्हिजन दिन साजरा होतो; पण मग तरी टीव्ही पाहणं बंद करा, असा प्रचारही सुरूच असतो. ते का?

ठळक मुद्देअनेक अभ्यासक सांगतात की, 7 गोष्टी आहेत, ज्यासाठी तुम्ही टीव्ही कमी पहावा किंवा खरं तर अजिबात पाहू नये.

- अनन्या भारद्वाज

टीव्हीच्या प्रचारासाठी एकेकाळी जगभर जागतिक टेलिव्हिजन डे साजरा करणं सुरू झालं, यावर आज आपण विश्वास ठेवू का?पण तो एकेकाळही काही फार लांब नाही. 1996 साली संयुक्त राष्ट्र संघानं जागतिक टेलिव्हिजन दिवस साजरा करण्याचं ठरवलं. सुरुवातीला 21 आणि 22 नोव्हेंबर अशा दोन दिवसांत तो विभागून साजरा व्हायचा, आता 21 नोव्हेंबर रोजी साजरा होतो. त्याकाळी माहिती, मनोरंजन, लोकशिक्षण, सरकारी योजनांचा प्रचार यासह लोकसंवाद आणि जनजागृतीसाठी टीव्ही वापरला जावा, अशी जगभर अपेक्षा होती. त्यातून हा दिवस आकारास आला.आता काळ इतका बदलला की, टीव्ही केवळ मनोरंजनापुरता उरला आणि एकेकाळी टीव्ही पहा असा प्रचार होत होता आता टीव्ही कमी पहा, त्यातून अनेक आजार बळावतात. तासन्तास टीव्ही पाहिल्यानं कोच पोटॅटो अर्थात वजन वाढून बटाटे झालेले गोळे आणि डोळ्यांना चष्मे आलेली माणसं वाढली तेव्हा टीव्ही कमी पहा, बाहेर पडा असा प्रचार होऊ लागला. काळ किती झपाटय़ानं बदलला याचं हे उदाहरण..आपल्याकडेही एकेकाळी रामायण महाभारत टीव्हीवर सुरू होतं त्याकाळात रस्ते ओस पडत. पुढं अनेक चॅनल आले आणि आताही टीव्ही सिरीअल्सचा रतीब घरोघर सुरूच आहे. तरुण मुलं आताशा कमी टीव्ही पाहू लागली आहेत, अशी जगभर चर्चा आहे. मात्र तो वेळ सोशल मीडिया आणि यू टय़ूबवर जाऊ लागला याचीही चिंता आहेत.जगभरातले टेलिव्हिजन वर्तनाचे म्हणजेच टीव्हीमुळं झालेल्या माणसांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक सांगतात की, 7 गोष्टी आहेत, ज्यासाठी तुम्ही टीव्ही कमी पहावा किंवा खरं तर अजिबात पाहू नये.त्या या 7 गोष्टी.1. वेळ वाया जातो, काय सकस पाहिलं टीव्हीवर याचं उत्तर जगभरात आज कुणाकडेही नाही.2. टीव्हीवरचे कार्यक्रम, बातम्या, चर्चा यातून सकारात्मकता लाभण्यापेक्षा नकारात्मकता वाढीस लागते, असाही एक आक्षेप आहेच.3. आपली विचारपद्धती, धारणा आणि चांगुलपणावरची श्रद्धाही टीव्हीवरच्या सतत नकारात्मकतेमुळे बदलते.4. आपल्या जगण्याकडून, समाजाकडून आणि स्वतर्‍कडूनही अवास्तव अपेक्षा वाढीस लागतात.5. जाहिरातींच्या मार्‍यानं आपण अकारण गरजा निर्माण करतो, त्या वाढवतो.6. शिस्त आणि स्वतर्‍वरचं नियंत्रण या गोष्टी सुटतात, पाहण्याचं व्यसन लागतं.7. रिलॅक्स होत नाहीच. मेंदू शांत होत नाही. त्यामुळे त्या वेळातून आपल्याला विश्रांतीही मिळत नाही.