शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य बदलून टाकणारा एक मंगळवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 15:54 IST

‘टय़ुसडेज विथ मोरी’ तारुण्यात पडणार्‍या प्रत्येक प्रश्नाचीच नाही तर जगण्याची उकल करणारं एक पुस्तक.

-प्रज्ञा शिदोरे

शाळा, कॉलेजात असताना काही शिक्षक आपल्याला फार आवडतात. आपलं नशीब चांगलं असेल तर त्या वयात काही अशी माणसं भेटतात जी आपलं आयुष्यच बदलून टाकतात. त्यांचं बोलणं, वागणं, विचार करण्याची पद्धत, जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सारंच हवंहवंसं वाटतं, आपल्याला घडवतंही. अनेकदा तर आपली आजी, एखादा मोठा मित्र, शिक्षक किंवा अगदी आपल्या बरोबरीनं काम करणारा आपला सहकारी. ही माणसंही आपल्या प्रश्नांची उत्तरं बनून येतात. अनेकदा तर काही न बोलता  फक्त आपलं बोलणं ऐकून घेतात. ते काहीच बोलले नाही, पण फक्त ऐकून घेतलं तरीही आपल्याला फार सुख वाटतं. अशीच ही एक गोष्ट. ही गोष्ट, हे पुस्तक प्रत्येक तरुणानं वाचावं असं आहे. एक इटुकलं पुस्तक पण त्यात आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं सहज सापडतात. त्या पुस्तकाचं नाव टय़ुसडेज विथ मॉरी. ही गोष्ट खरं तर मीच अल्बमची आहे. तो आपल्यासारखाच विद्यार्थी. अमेरिकेतल्या ब्रॅँडिस युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना त्याचे एक प्रोफेसर होते मॉरी श्वाट्स. ते त्याला समाजशास्त्र शिकवायचे.  मीच पदवी शिक्षण घेऊन बाहेर पडला. नोकरीला लागला आणि पत्रकार म्हणून काम करताना आयुष्याच्या रगाडय़ात त्यांना विसरूनही गेला. एकदा एका वाहिनीवर कुठलातरी कार्यक्रम बघताना त्याला प्रोफेसर दिसले. सार्‍या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. 

विद्यापीठातून बाहेर पडून त्याला आता वीस वर्षे झाली आहेत. तो एका वृत्तपत्रात स्पोर्ट्स कॉलमीस्ट आहे. माहिती मिळवल्यावर त्याला कळतं की त्याचे हे प्रोफेसर एका दुर्धर आजाराने पीडित आहे. दर मंगळवारी त्यांना भेटायचं असं मीच ठरवतो. प्रत्येक आठवडय़ात मिशिगन ते मॅसाच्युसेट्स, हा 1400 किलोमीटरचा प्रवास करून त्यांना भेटतो. त्यांचं गुरु- शिष्याचं नातं पुन्हा जुळत. दर मंगळवारी मग गप्पा होता. जगण्याबद्दल, मरणाबद्दल, नातेसंबंध, समाज, लग्न संस्था याबद्दल मॉरी बरंच काही सांगतात. मीच रुढार्थानं यशस्वी असला तरी त्याच्या आयुष्यात त्याला अनेक प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उकल दर मंगळवारी होते. मुख्य म्हणजे मरणाच्या दिशेनं रोज प्रवास करणारे मॉरी मीचला जगण्याचं श्रेयस/प्रेयस सांगतात. आवजरून वाचावं असं हे पुस्तक आहे. या पुस्तकावर आधारलेला एक चित्रपटही आलेला आहे. तोही नक्की पाहा. यू टय़ूबवर ‘टय़ुसडेज विथ मॉरी’ असं सर्च करा आणि नक्की पाहा.