शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

ट्रोलिंग सहन करू नका, तसंच आपण कुणाला ट्रोल करत नाही ना ? -लक्ष द्या. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:06 IST

सोशल मीडियात कुणी छळत असेल तर ते सहन करूनका, आणि आपण कुणाला छळत नाही ना, हेही पहा.

आवेझ काझी

डेटा  पॅक मारला की कनेक्टिव्हिटी हातात येते. अल्पदरामध्ये आता मोबाइल इंटरनेट डेटा मिळतो. आणि आता कोरोनाकाळात अनेकजण घरीच आहेत. हात रिकामे आहेत.  त्यातून मग काहीजण ऑनलाइन नको त्या गोष्टी करतात. त्यात काहीजण नकळतही (आणि काहीजण जाणूनबुजून) सायबर बदनामी, सायबर बुलिंग करतात. ट्रोल करण्याचे प्रकार तर सर्रास होतात. ऑनलाइन ट्रोल करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर केलेली आक्षेपार्ह चुकीची भाषा वापरून केलेली टीका. हीन दर्जाचा विनोद करणं, सायबर धमकी किंवा तथ्यहीन अर्थहीन कमेंट करणं हेही ट्रोलिंगच.जर तुम्हाला सोशल मीडियावर कोणी धमकावत, शिवीगाळ करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्याची रितसर तक्रार नोंदवली पाहिजेच. मात्र आपणही असं वागत नाही ना, ऑनलाइन कुणाला छळत नाही ना हेही तपासून पाहिलं पाहिजे. एकतर सोशल मीडियात कुणी आपल्याशी अश्लील भाषेत बोलत असेल, आक्षेपार्ह कमेंट करत असेल तर ती पोस्ट डिलीट करणं किंवा त्या व्यक्तीला ब्लॉक करणं ही पहिली पायरी. वाह्यात कमेण्टला ‘प्रतिसाद’ न देणं हा ज्याचा त्याचा प्राथमिकतेचा भाग. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष न करता, वेळीच ताकीद देणं ते तक्रार करणं या गोष्टी आपण करूशकतो.  सोशल मीडियावर उगाच वाद निर्माण करणा:यांचा एकच उद्देश असतो. तो म्हणजे तुम्हाला नाहक त्रस देणं. म्हणजे ते ऊठसूट अविवेकी काहीही कमेंट करणार आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देण्यामध्ये किंवा त्याचा अर्थ लावण्यात वेळ वाया घालवणार यावर चांगला उपाय म्हणजे तुमचा फोन किंवा कम्प्युटर काही काळापुरता बंद ठेवा. दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला वेळ असेल तेव्हा आणि तुमचं डोकं शांत झाल्यावर त्यांचेविरोधात ‘कायदेशीर फिर्याद’ देऊन गुन्हा दाखल करून चोख प्रत्युत्तर द्या. 

 एखादी व्यक्ती विकृत मानसिकतेतून अशी कृती करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या कमेंटवर प्रतिक्रि या देणं, व्यक्त होणं कटाक्षाने टाळा. सोशल मीडियाच्या  आभासी जगातल्या वादविवादात पडून तुमचं मानसिक स्वास्थ्य बिगडू शकतं. त्यामुळे  सोशल मीडियावर व्यक्त होताना विचार करा.  सगळ्यात महत्त्वाचं इतरांचं ट्रोलिंग सहन करूनका, तसंच आपणही कुणाला ट्रोल करत नाही ना याकडे लक्ष द्या. 

(लेखक पोलीस उपनिरीक्षक आणि सायबर गुन्हे अभ्यासक आहेत.)