शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

टोबॅको KILLS

By admin | Updated: April 10, 2015 13:38 IST

तंबाखूने कॅन्सर होतो, जीव जातो हे माहिती असूनही तंबाखू सोडता येत नाही?

तंबाखू आणि तिचे वाईट परिणाम समजले; पण प्रश्न होता या गुलामीतून मुक्ती मिळवायची तरी कशी? या माहितीसाठी मी मानवेंद्र जोगदेव यांना भेटलो. ते स्वत: मानसशास्त्र विषयात एम.ए. झाले आहेत. आणि त्यांचा एकूणच व्यसनमुक्ती क्षेत्रतील विविध अंगांचा सातत्याने अभ्यास चालू असतो.
त्यांनी मला जे वाचायला दिलं आणि म्हणाले, 
‘‘मुक्तांगणमध्ये येणा:या गर्द पिणा:या रुग्णमित्रंची संख्या काही वर्षापूर्वी वीस ते पंचवीस टक्के इतकी होती. पण कायद्याची अंमलबजावणी, मुक्तांगणसारख्या संस्थांनी राबवलेल्या जनजागरण मोहिमा यातून गर्दच्या व्यसनांची संख्या कमी झाली आहे. आणि त्याऐवजी क्रिस्टल मिथ, एक्स्टसी, झोपेच्या गोळ्या अशी नवीन व्यसनं तरुण करू लागले आहेत. गर्दच्या रु ग्ण-मित्रंचा तंबाखूचा वापर प्रामुख्याने सिगरेट किंवा विडी या माध्यमातून होत असतो. त्यामुळे हळूहळू विडी-सिगरेट व्यसनांची गुलामी झालेले रुग्ण-मित्र येणं कमी झालं.
अनेकदा विडी/सिगरेट सार्वजनिक ठिकाणी पिण्यास बंदी यामुळेही या व्यसनांचे प्रमाण कमी होताना दिसते. पण तंबाखूचे गुलाम खूप हुशार असतात. लगेच पर्याय शोधतात. गुटखा आणि तंबाखू ही त्यांची प्राथमिक व्यसने होतात.
सिगरेट ओढण्याच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी अनेक सोपे उपाय आहेत. त्यात प्रामुख्याने औषधोपचार प्रभावी ठरल्याचे दिसून येते. सामान्यपणो सिगरेट ओढणा:यांच्या वेळा ठरलेल्या असतात. त्यामुळे प्रमाण हळूहळू कमी करत बंद करणो हा सगळ्यात सोपा उपाय असतो. त्याला औषधांची आणि समुपदेशनाची जोड मिळाली तर अनेक जण विडी+सिगरेटमुक्त जीवन जगू शकतात.
ही व्यसने सोडण्यासाठी निकोटीन पॅच- ज्याला निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात, च्युईंगम, चोखण्याच्या गोळ्या, इनहेलर अशा औषधांचा प्रभावी उपयोग होतो असं सिद्ध झालं आहे.
गुटखा किंवा मळून खाण्याची तंबाखू याचे व्यसन असलेल्या मित्रंना मात्र या उपायांचा फारसा उपयोग होत नाही आणि झालाच तरी जास्त प्रभावी ठरत नाही. त्यातला मुख्य अडसर म्हणजे तोंडात सतत काहीतरी असण्याची सवय. आणि दुसरं म्हणजे तंबाखू बंद केल्याने तोंड येणं, हिरडय़ा दुखणो असे त्रस. या त्रसावर मात करण्यासाठी माणूस पुन्हा पुन्हा व्यसनाकडे वळतो.’’
पण मग हे व्यसन सुटतं तरी कसं?
मानव सरांनी मला जे साहित्य दिलं होतं त्यात मला उत्तर सापडलं.
त्यासाठी स्वत:ला विचारायचे काही महत्त्वाचे प्रश्न-
1) मी नक्की तंबाखू बंद करण्याचा का विचार करतोय?
माझी तब्येत सुधारेल? का मला कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता कमी होईल म्हणून? मला मोकळा श्वास घेता येईल आणि मला दीर्घायुष्य मिळेल का मला पदार्थाची चव समजू लागेल म्हणून? माङया कपडय़ांवर भोकं किंवा डाग नसतील! मला स्वत:बद्दल चांगलं वाटेल आणि पैसेही वाचतील म्हणून?
आणखी हेही सांगायचं स्वत:ला आणि पटत असलं तर मान्य करायचं की मला नपुंसक होण्याची भीती नसेल. चारचौघात मिसळताना तोंडाचा आंबूस वासाने मला लोक टाळणं बंद करतील. माझं व्यसन मुलांपासून लपवून करण्याची गरज संपेल. माङया मुलांसमोर एक निव्र्यसनी माणूस म्हणून रोल मॉडेल ठरेन. माङया पत्नीला/पतीला आणि मुलाबाळांना श्वसनाचे विकार होणार नाहीत.
 
2) व्यसन सोडण्याची तयारी करायची कशी?
पहिली गोष्ट म्हणजे एखादा संस्मरणीय दिवस निवडायचा. उदाहरणार्थ कोणाचा वाढदिवस, एखादा सण, लग्नाचा वाढदिवस. तंबाखू सोडण्याच्या तयारीला स्वत:ला सवड द्यायला हवी. आणि हा कालावधी फार लांबचा नको, नाहीतर आपला निश्चय विसरायला होतो.
आपण जर विचार तंबाखू मुक्तीकरता काही औषध घेण्याचा विचार करत असाल तर आपल्या मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. आधीपासूनच तंबाखूचे प्रमाण कमी करायला सुरु वात करून पाहू. अगदी तीव्र तल्लफ आली तर स्वत:ला बजावायचं, असं- ‘‘आत्ता नको, तासाभरानं.’’ जिथे आणि जेव्हा केव्हा आपण तंबाखू खात असू त्या ठिकाणी किंवा त्यावेळी तिथे जाणं टाळायचं. आपण नेहमी ज्या दुकानातून, पान ठेल्यावरून तंबाखू/सिगरेट घेतो त्या बाजूला जायचेच नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंबाखू खात राहण्याची आपली आठवतील तेवढी कारणं लिहून काढायची.
 
सोबत हवीच.
 
ही तुमची पूर्वतयारी झाल्यावर निश्चित केलेला दिवस अगदी जवळ आलेला आहे. दिवस अगदी थोडे राहिले आहेत. हीच वेळ आहे व्यसनमुक्त होण्यासाठी.  विश्वासातल्या माणसांचं एक सुरक्षा कवच उभारायचं. व्यसन न करणारी घरातली मोठी माणसं, फोनवर उपलब्ध असलेले दोन- चार निव्र्यसनी मित्र यांना विश्वासात घ्यायचं. तलफ आलीच तर त्यांच्याशी बोलायचं. त्रस थोडा कमी होईल.
 
विड्रॉअल.
ज्या दिवशी तंबाखूजन्य बंद केले जातील तेव्हापासून दोन दिवस कमी जास्त प्रमाणात वियोग लक्षणो (विड्रॉवल सिमटम्स) दिसू शकतात. ती लक्षणो सहन केली आणि माफक औषधांचा उपयोग केला तर व्यसनाकडे मागे वळून पाहण्याची आवश्यकताच भासणार नाही. 
थोडक्यात, तंबाखूजन्य पदार्थ अचानक बंद केल्याने जास्तीत जास्त काय होऊ शकतं? नेहमीची  कामे लक्षपूर्वक होत नाहीत, झोप नीट लागत नाही, परत व्यसन करावे अशी तीव्र ओढ वाटते, कुठून या फंदात पडलो असे विचार येतात, मन तणावपूर्ण राहतं, काही जणांना शौचास साफ होत नाही, तहान भूक वाढते.
पण हे सारे फक्त दोन तीन दिवसच सहन करायचं  आहे. तेवढं केलं तर आपलं शारीरिक अवलंबित्व संपतं.
काही महिने गेले की मेंदूतील रसायने व्यवस्थित कार्यरत होतात.
आणि जोर्पयत आपण स्वत:हून पुन्हा व्यसनाच्या आहारी जात नाही, तोर्पयत आपण सुखीच राहतो!
 
- आनंद पटवर्धन
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांच्या सहकार्याने
 
 
सुनीताची अखरेची विनंती
 
टीव्हीवर तुम्ही तोंडाच्या कॅन्सरच्या जाहिराती पाहिल्या आहेतच. त्याचा चेहरा असलेली, स्वत: कॅन्सरशी झुंजणारी सुनीता तोमर, तिनं अलीकडेच शेवटचा श्वास घेतला. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ती म्हणते की, तंबाखू आयुष्य उद्ध्वस्त करते. ती मिळूच नये अशी व्यवस्था करा!
ते होईल तेव्हा होईल, पण आयुष्य बेचिराख करणारं हे विष रोज आपण आपल्या शरीरात ढकलतो आहोत, हे तरी मान्य करा!
सरकाधने आता अधिक मोठय़ा अक्षरात धोक्याचे इशारे देत, तंबाखूचा धोका टाळण्याचे प्रय} सुरू केले आहेत!
पण ज्यांना दिसूनही दिसत नाही, वाचूनही कळत नाही अशा तरुण मित्रंनी विचारावं स्वत:ला की, आपल्या जिवापेक्षा, सुंदर आयुष्यापेक्षा ही तंबाखू, सिगरेट, गुटखा जास्त मोलाचा आहे का?
 
आपण तंबाखू का खातो?
कधी खातो?
- ठेवा लिहून!
 
1) मी तंबाखू केव्हा आणि किती खातो?
2) मी किती सिगरेट पितो? गुटख्याच्या पुडय़ा/तंबाखूचे बार  दिवसातून किती वेळा फस्त करतो?3) कोणत्या वेळेस मला हमखास तल्लफ येते? 
उदा. सकाळी, चहानंतर, जेवणानंतर, टेन्शन असल्यावर.
4) खूप थकल्यावर तंबाखू खावीशी वाटले का?
5) माङयाकडे रिकामा वेळ असतो, काहीच काम नसते.
6) दारू पिताना आणि नंतर गुटखा हवाच, असं काही माझं होतं का?
7) हे सारं लिहा, पाच दिवस, दहा दिवस, पंधरा दिवस.
तुमची उत्तरं तुम्हालाच नक्की मिळतील!