शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

टाइम टू गो पिंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 07:55 IST

पुरुषांच्या अस्सल कसोटी क्रिकेट डे-नाइट जगात गुलाबी रंग बदल ठरतोय आणि बदल घडवतोय. त्या पिंक बॉलची ही चर्चा.

-अभिजित पानसे

ट्रिपलिंग या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये कुणाल रॉय कपूर राजस्थानमधील एका मोठ्या मालमत्तेचा मालक असतो. एकेकाळी त्याचे पूर्वज छोट्या रियासतचे मालक असताना, तो मात्र आधुनिक काळातही स्वतःला रियासतचा राजा समजत असतो. पूर्णपणे रांगडेपणा, पुरुषी अहंकार त्यात ठासून भरलेला असतो. जाडी मिशी, पायात शाही, शिकारी बूट, कधी पारंपरिक कपडे असा त्याचा पेहराव असतो. शाही स्रीने म्हणजे त्याच्या बायकोने कसे रीतिरिवाज पाळावे वगैरे तो सांगत असतो. असा हा पुरुषी ‘राजा’ एकदा हॉर्स पोलो खेळायला जाताना मात्र गुलाबी शर्ट घालून जातो. बिटविन द लाइन्स बऱ्याच गोष्टी कळतात. आणि हे ही अधोरेखित होतं की गुलाबी रंग हा जेंडर बायस्ड, पक्षपाती किंवा पूर्वग्रह असलेला नाही.

गुलाबी रंग फक्त मुलींचा असं बिंबवलं गेलंय. मुलाने गुलाबी रंगाचा शर्ट वगैरे वापरला तर ते ऑड वाटतं असं अजूनही अनेकांना वाटतं. पिंक रंग आजवर मुलींचीच टेरेटरी होती. तरुणांसाठी ती अलिखित नो एण्ट्री.

पण गोष्टी आता पिंकलिप्सपर्यंतच मर्यादित राहिल्या नाहीत!

ढगाळलेल्या आकाशात संध्यासमयी संधिप्रकाशात एक गुलाबी रंग उमटतो. तो रंग बदलाची नांदी असतो दोन प्रहरांच्या! बेबीपिंक रंग हा फक्त बेबींसाठीच राहिला नाही तर बाबूही वापरत आहेत. आता अनेक मुलं मुद्दाम गुलाबी शर्ट, टी-शर्ट, स्वेटर वापरतात. दे आर ब्रेकिंग द स्टिरिओटाइप्स व्हाय शूड गर्ल्स हॅव ऑल द फन?

तर हे गुलाबीपुराण यासाठीच की हा गुलाबी रंग आता बदलाचा रंग ठरतोय. आणि विशेष म्हणजे हाच गुलाबी रंग आता टेस्ट क्रिकेटमध्येही बदलाची नांदी ठरतोय. २०१६ पासून पारंपरिक रेड कलरला एक योग्य पर्याय म्हणून पिंक बॉलचा वापर सुरू झाला आहे.

आजपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तोही दिवसरात्र कसोटी सामना गुलाबी बॉलने खेळला जात आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी ओव्हरच्या सामन्यांच्या काळात कसोटी क्रिकेट वाचवणं, जतन करणं अत्यंत गरजेचं आहे हे खाऊन खाऊन चोथा झालेलं वाक्य आहे; पण सत्य हेच आहे की कसोटी क्रिकेट हेच खरं आणि सर्वोच्च क्रिकेट आहे. बाकी सर्व प्रेक्षकांसाठी व टीआरपीसाठी केलेले बदल आहेत. पण कसोटी क्रिकेट जोपासायचं असेल तर दिवसरात्र कसोटी सामने आयोजित करणं आजच्या काळाची गरज आहे; पण रात्री लाल-ब्राउन बॉल खेळाडूंना दिसणं कठीण असल्याने गुलाबी बॉलचा वापर सुरू झाला आहे. याशिवाय पारंपरिकरीत्या दिवसा खेळल्या जाणाऱ्या काही सामन्यांतदेखील गुलाबी बॉलचा वापर होतोय.

गुलाबी बॉल कसा, किती स्विंग आणि सीम होतो यावर अजून चर्चा व निष्कर्ष काढणं सुरू आहे. भारतात प्रथम २०१६ मध्ये दुलिप ट्रॉफीमध्ये पिंक बॉलचा उपयोग केला गेला. याच मालिकेत प्रथमच दिवसरात्र कसोटी सामना खेळला गेला. या सर्व बदलांमुळे सर्वोत्तम क्रिकेट असलेल्या टेस्ट क्रिकेटमध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होईल, असं वाटतं. मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने जबरदस्त खेळ करत कसोटी मालिका जिंकली होती. यावेळी मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत आहे. शिवाय विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून भारतात परत येणार आहे, उर्वरित मालिकेसाठी तो उपलब्ध नसणार. यामुळे भारताला ही कसोटी मालिका अवघड जाणार यात शंका नाही; पण रोहित शर्माला हा ऑस्ट्रेलिया दौरा सुवर्णसंधी ठरू शकते.

ऑस्ट्रेलियातील मोठ्या हिरव्या ग्राउंडच्या, निळ्या आकाशाच्या व रात्री फ्लड लाइट्सच्या चकचकाटाच्या पार्श्वभूमीवर गुलाबी बॉलमध्ये कसोटी क्रिकेट रंजक ठरणार यात शंका नाही. पुरुषांच्या अस्सल कसोटी जगात, खेळात गुलाबी रंग बदल ठरतोय आणि बदल घडवतोय. इट्स टाइम टू गो पिंक.

(अभिजित ब्लॉगर आहे.)

abhijeetpanse.flute@gmail.com