शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

टिकटॉक ; बंदीने प्रश्न सुटतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 07:20 IST

आता भारतात टिकटॉक हे अ‍ॅप डाउनलोड करता येणार नसलं, तरी ज्यांनी आधीच डाउनलोड केलेलं आहे, त्यांचा वापर सुरूच राहील. सॉफ्ट पोर्न ते ईल व्हिडीओ ते नाजूक अवयवांचे प्रदर्शन ते लाइक्सची दीवानी जन्ता हे सारं चालूच राहील. आणि ते सारं टिकटॉकपुरतं मर्यादित नाही, तर आज हे अ‍ॅप तर उद्या ते, हे चक्र भयंकर आहे.

ठळक मुद्देटिकटॉकचे सध्या 50 कोटींहून अधिक यूजर्स आहेत. साधारण तिसरी-चौथीपासून हे अ‍ॅप वापरायला आता अनेकांची सुरुवात होते.

-    मुक्ता चैतन्य

औरंगाबादमधील एकोणीस वर्षाच्या विष्णुप्रियाने तिचा व्हिडीओ टिकटॉकवर टाकला आणि एका रात्रीत  ती स्टार झाली. पहिल्या दहा दिवसात 2 करोडहून अधिक लाइक्स तिच्या गाण्याच्या व्हिडीओ क्लिपला मिळाले. कालर्पयत जगाला माहीत नसलेली विष्णुप्रिया नायर एका रात्नीत टिकटॉक सेलिब्रिटी बनली. सोशल मीडियाची ही ताकद अमान्य न करताच त्याची दुसरी बाजूही ठळकपणे लक्षात घेतली पाहिजे. एकीकडे विष्णुप्रियाचं यश आपल्या सगळ्यांना दिसतंय, तर दुसरीकडे पंधरा वर्षाच्या मुंबईतल्या एक मुलीने टिकटॉक व्हिडीओ बनवू दिला नाही म्हणून मागच्याच वर्षी आत्महत्या केली होती. सोशल मीडिया हे असं दुधारी माध्यम आहे. त्याचे फायदे असले तरी तोटे अधिक आहेत. विशेषतर्‍ टीनएजर्सच्या बाबतीत. मद्रास उच्च न्यायालयाने टिकटॉक अ‍ॅप पोर्नोग्राफीला उत्तजेन देत असल्याचा ठपका ठेवत त्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आता हे अ‍ॅप भारतात डाउनलोड करता येणार नाही. गुगल प्लेवरून टिकटॉक हटवण्यात आलं आहे. अर्थात, ज्यांनी आधीच ते डाउनलोड करून ठेवलं आहे, त्यांच्या मोबाइलमध्ये ते आहेच; पण मुद्दा फक्त टिकटॉकचा नाहीये. किंवा त्यावर बंदी घालण्यापुरता नाहीये. कारण आज टिकटॉकने लोकांना वेड लावलं होतं, उद्या अजून काही असेल. मुद्दा आहे तो सजग वापराचा आणि स्मार्टफोन्समध्ये सहज उपलब्ध असलेल्या पोर्नोग्राफीचा. 

या काही महत्त्वाच्या गोष्टी..

1. टीकटॉक अ‍ॅप 12 वर्षापुढील कुणीही वापरू शकतं. अर्थात, असं असलं तरीही साधारण आठ वर्षापासूनची मुलं हे सोशल मीडिया अ‍ॅप वापरताना दिसतात. तरुण-तरु णींमध्येही या अ‍ॅपची आणि व्हिडीओजची प्रचंड क्रे झ दिसते. टिकटॉकचं व्यसनच होतं कारण इथे पोस्ट केलेल्या व्हिडीओजना पुरेसे लाइक्स मिळाले नाहीत की अनेक तरु ण-तरु णी निराश होऊ लागतात. त्यांना फोमोची बाधा होते असं लक्षात येतं. हे इथंच थांबत नाही. आपल्याला सगळ्यांनी सतत बघितलं पाहिजे आणि वाहवा केली पाहिजे ही गरज कणाकणाने तीव्र होत जाते हेही नक्कीच. सोबत मी काही स्क्र ीनशॉट्स दिले आहेत. ते बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की स्वतर्‍ची निराशा, अस्वस्थता घालवण्यासाठी अनेक लोक या अ‍ॅपकडे वळालेत. निराशा घालवण्यासाठी योग्य मदत घेण्यापेक्षा टिकटॉकचा वापर ते करू लागले. 

2. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, निराशा घालवण्यासाठी किंवा अस्वस्थता कमी करण्यासाठी ज्या अ‍ॅपचा वापर होतो, तेच अ‍ॅप निराशा आणि अस्वस्थता वाढवत आहे हे अनेकांच्या लक्षातही आलं नाही. आपल्याला लोकांनी चांगलं म्हटलं तर निराशा जाणार असं वाटत असतानाच त्याच लोकांनी जर आपल्यावर टीका केली, दुर्लक्ष केलं किंवा अपेक्षित लाइक्स मिळाले नाहीत तर आपण पुन्हा निराशा येणार हे अनेकांच्या लक्षातही आलं नाही. आशा-निराशेचा भयंकर मोठा झुला त्यांनी स्वतर्‍च बांधून घेतला. ही माणसं स्वतर्‍च्या भावनांचा विचित्न खेळ टिकटॉक किंवा तत्सम अ‍ॅपच्या माध्यमातून खेळात असतात आणि त्यातून भावनांची किती प्रचंड नासधूस होते याचा विचार मात्न क्वचितच होताना दिसतो. 

3. या अ‍ॅपवर भारतात बंदी घालण्यामागचं मद्रास उच्च न्यायालयाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं पोर्नोग्राफी. जे अगदीच खरं आहे. सॉफ्ट पॉर्न कंटेण्ट या अ‍ॅपवर सहज उपलब्ध होता. अनेक व्हिडीओत सामान्य (म्हणजे अगदी चारचौघांसारखेच, आपल्या आजूबाजूचेही) तरुण-तरुणी स्वतर्‍चे उत्तान, आकर्षक, सेन्शुअस आणि सॉफ्ट पोर्नकडे झुकणारे व्हिडीओ टाकत असत. हे व्हिडीओ टाकण्याला आणि बघण्याला वयाची कुठलीही चौकट नाही. त्यामुळे लहान लहान मुला-मुलींचे अतिशय अश्लील हातवारे करणारे नाच इथे अनेकदा बघायला मिळत. तरु ण-तरु णींचे स्वतर्‍च्या खासगी अवयवांना (काहीवेळा झाकलेले आणि काहीवेळा नग्नही) दाखवणारे, हाताळणारे व्हिडीओ यात होते. लैंगिक भावना चाळवणार्‍या व्हिडीओंचं प्रमाण प्रचंड. आणि मुख्य म्हणजे हे व्हिडीओ करणारे सगळेच 18 र्वष किंवा अधिक वयाचे म्हणजे सज्ञान असतातच असं नाही. हा सगळा सॉफ्ट पॉर्न कंटेण्ट बारा वर्ष किंवा त्याही खालची मुलं हे सहज बघू शकतात. ते स्वतर्‍चेही असे व्हिडीओज टाकू शकतात. 

4. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सॉफ्ट पोर्नचा हा प्रकार फक्त टिकटॉकवर आहे अशातला भाग नाही. हाच प्रकार शेअरचॅट या अस्सल देशी सोशल मीडिया अ‍ॅपवरही बघायला मिळतो. यावर तर नॉनव्हेज अशी कॅटेगरी आहे ज्या अंतर्गत सेक्स एज्युकेशन आणि 18+ असे थेट ऑप्शन आहे. ज्यामध्ये अश्लील जोक्सपासून पॉर्न क्लिप्सर्पयत सगळ्या गोष्टी उघड उघड उपलब्ध आहेत. सॉफ्ट पोर्न तर आहेतच, शिवाय हार्ड पोर्न क्लिप्स इथे सर्रास बघायला मिळतात. बर वापरकर्ता खरंच 18 वर्षे अधिक वयाचा आहे का, हे तपासण्याची कुठलीही व्यवस्था नाही. मग टिकटॉकवर जशी बंदी आणली तशी शेअरचॅटवर आणणार का? की शेअरचॅट देसी आहे म्हणून त्याला सूट मिळणार? 

5. यू-टय़ूबवर तर पोर्न कंटेण्ट उपलब्ध असतो. वापरकर्ता तो बघायला गेला तर यू-टय़ूब ‘आपण 18+ आहात का?’ असं आपल्याला विचारलंही जातं. मात्र एखाद्या 10/12 वर्षाच्या मुलाने किंवा मुलीने (मुळात गुगल सेवेसाठी खातं उघडताना वयात घोळ केलेला असेल) ओके केलं की यू-टय़ूबच्या दुनियेतलं सगळं पोर्न त्या मुलासाठी किंवा मुलीसाठी उपलब्ध होतं. त्यामुळे मुद्दा फक्त टिकटॉकचा नाहीये. आता इंटरनेटवर 18+ कंटेण्ट बघायला, कंटेण्ट शेअर करायला वयाचं बंधन नाही. नाही म्हणायला शेअरचॅट या अ‍ॅपवर पॉलिसी म्हणून त्यांनी स्क्र ीनशॉट्स काढण्यावर बंदी घातलेली आहे; पण तरीही पॉर्न कंटेण्ट बघण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी गुप्ततेची आता खरंच गरज उरलेली नाही इतकं हे सगळं या आणि अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विखुरलेलं आहे.

6. या सार्‍यात एक महत्त्वाचं म्हणजे एकदा ऑनलाइन ते कायमचं ऑनलाइन हे विसरून चालणार नाही.म्हणजेच या कुठल्याही अ‍ॅपवर/साइट्सवर एकदा गेलेला मजकूर कुठल्याही परिस्थितीत काढून टाकता येत नाही. आपल्या खात्यातून तो गेला तरी अ‍ॅप/साइटच्या सव्र्हरवर तो असतोच. शिवाय एक महत्त्वाचा आक्षेप असा या सर्वच अ‍ॅप्सवर घेतला जातो तो म्हणजे यूजर्सची वैयक्तिक माहिती त्यांनी अ‍ॅपवर दिलेली नसली तरी ती माहिती अनोळखी लोकांनाही सहज मिळवता येते. अर्थात, या आक्षेपाच्या सत्यतेबद्दल अजून तपशील उपलब्ध नसले तरी केंब्रिज अनॅलिटिकानंतर ऑनलाइन यूजर्सची माहिती त्यांच्या नकळत कुणीही वापरत हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे या अ‍ॅप्सवरून यूजर्सची माहिती चोरण्याचे प्रकार होतच नसतील असं काही आपण ठामपणे सांगू शकत नाही.7. त्यामुळेच या अ‍ॅपवर आपण काय आणि कशासाठी शेअर करतोय याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. त्याचं व्यसन आपल्याला लागणार नाही हे बघितलं पाहिजे. आपल्या सुख-दुर्‍खाशी इथे मिळणारे लाइक्स जोडले जाणार नाहीत हे बघितलं पाहिजे.आज टिकटॉक आहे,  शेअरचॅट आहे, उद्या दुसरं एखाद अ‍ॅप असेल. हे न संपणारं आहे. आपल्या भावना, आपला वेळ, बुद्धी आणि विचार कशासाठी वापरायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे.

****

टिकटॉक नेमकं आहे काय?

* हे एक चायनीज व्हिडीओ शेअरिंग सोशल मीडिया अ‍ॅप आहे. ज्यावर तुम्ही कुणीही 15 सेकंदाचे व्हिडीओ पोस्ट करू शकतं.* टिकटॉक दोन वर्षापूर्वी सुरू झालं असलं तरी आजच्या घडीला ते ट्विटर, स्नॅपचॅटपेक्षाही अधिक प्रसिद्ध आहे आणि त्याचे यूजर्स जगभर झपाटय़ाने वाढत आहेत.* इथं गाणं कोणतंही वापरता येतं, व्हीडीओ दिसतात; पण आपला आवाज नसतो. * टिकटॉकचे सध्या 50 कोटींहून अधिक यूजर्स आहेत. साधारण तिसरी-चौथीपासून हे अ‍ॅप वापरायला आता अनेकांची सुरुवात होते.* ज्यांनी हे अ‍ॅप आधीच डाउनलोड केलं आहे, त्यांच्याकडे ते आहेच, त्याचा वापर सुरूच राहणार आहे. आता नव्यानं भारतात हे अ‍ॅप डाउनलोड करता येणार नाही, एवढंच. 

( लेखिका मुक्त पत्रकार आणि सोशल मीडीया अभ्यासक आहेत.)