शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘थ्रील’ची निसरडी वाट

By admin | Updated: January 4, 2017 16:01 IST

पोलिसांकडची ‘सिक्रेट्स’ काय सांगतात?आई-वडिलांना धक्का बसेल असं मुला-मुलींचं ‘खाजगी आयुष्य’ आकाराला येतं आहे. त्यांचे मोबाईल, मेसेजिंग अ‍ॅप्सच्या विंडोज,शाळेची दप्तरं, कॉलेजच्या सॅक्स आणि मुख्य म्हणजे त्यांची मनं या सगळ्यात भलभलत्या गोष्टी साठवलेल्या असतात.

- मनीषा म्हात्रे

आई-वडिलांना धक्का बसेल असं मुला-मुलींचं ‘खाजगी आयुष्य’ आकाराला येतं आहे. त्यांचे मोबाईल, मेसेजिंग अ‍ॅप्सच्या विंडोज,शाळेची दप्तरं, कॉलेजच्या सॅक्स आणि मुख्य म्हणजे त्यांची मनं या सगळ्यात भलभलत्या गोष्टी साठवलेल्या असतात. 

 दिशा. १६ वर्षाची आहे. विक्रोळीत राहाते.आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर ती आई आणि आजीसोबत राहते. काम काम.. करणारी आई. आणि घर घर करणारी आजी. अशात आपण कुठे हे शोधणारी दिशा. मन स्थिर नाही. आपलं कोणी नाही असं वाटून आलेला एकटेपणा कायमचा सोबतीला आलेला. दिशा दहावी पास झाली आणि हातात स्मार्ट फोन आला.अचानक तिचं एकटेपण जणू संपलंच. कारण फोनने तिला दिलेली कनेक्टिव्हिटी. मैत्रिणींचे मित्र. त्यांचे मित्र तेही हीचे मित्र असा गुणाकार सुरू झाला. फ्रेण्डलिस्ट भराभर वाढत गेली. शेअरिंगला पूर आला. फेसबुकवर फोटोंचा जणू वर्षावच सुरु झाला. दिवसभर गुलुगुलु गप्पा सुरु. - आई-आजीला या कशाचाच पत्ता नव्हता.अचानक एके दिवशी दिशा घरातून गायब झाली. फोनही बंद. घाबरलेल्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठलं. मात्र ती काही सापडली नाही. रात्री उशिराने घरी परतली. रडत रडत घरी आलेल्या दिशाला पाहून कुटुंबियांच्या डोक्यात वादळ.काय झालं असेल?तिला जवळ घेऊन विचारलं, तेव्हा आई आणि आजीला दिशाने एक कहाणी सांगीतली- एक गाडी आली. त्यात काही मुलं होती. त्यांनी माझं अपहरण केलं. मला मारलं आणि माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी कशी बशी पळाले आणि घरी आले.- हे भयंकरच होतं. पुन्हा पोलीस ठाणं गाठलं. मुलीने सांगितलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. मात्र पोलीसांना पाहून भांबावलेल्या दिशाची बोलतीच बंद पडली. ती उलटसुलट उत्तरं द्यायला लागली. तपशीलाचा मेळ बसेना..शेवटी तिने खरं काय ते कबुल केलं.अपहरण वैगेरे काही झालेलं नव्हतं. दिशा तिच्या (नव्या) मित्रांबरोबर सिनेमाला गेली होती. तिथून अचानक शॉपिंगचा बेत ठरला. मग हॉटेलात जायचं ठरलं. या गंमतीजंमतीत बराच उशीर झाला. इतक्या उशीरा घररी गेल्यावर आई-आजीचा ओरडा बसेल, म्हणून मग ही अपहरणाची ‘स्टोरी’ तयार झाली.- मग पोलीसांनी तिचा मोबाईल चेक केला. तर त्यात पोर्न क्लीप्स आणि ‘तशा’ निरोपा-निरोपी’चे तपशील सापडले.- पोलीस अधिकारी संवेदनशील होते. त्यांनी दिशाच्या आई-आजीला थोडी कल्पना दिली. मुलीवर नीट लक्ष ठेवा, म्हणाले. दिशाचे कान उपटले.-हे असं कान उपटणं, आता पोलीसांच्या कामाचा एक महत्वाचा भाग बनला आहे.अशा संवेदनशील घटनांमध्ये आपल्याला पोलिसांचा सहभाग माध्यमांमध्ये दिसतो तो गुन्हा घडून गेल्यावर. बलात्कार, शारीरिक बळजोरीचा प्रयत्न, ब्लैकमेलिंग, छेडछाड अशा बातम्या हल्ली सततच पाहा-वाचायला मिळतात. मग पोलिसांकडे धरपकड, गुन्ह्यांची नोंद, तपास अशी कामं येतात.- पण त्याहीपेक्षा मोठं काम हल्ली पोलिसांच्या वाट्याला आलं आहे, ते या अशा ‘वाट चुकू घातलेल्या/चुकलेल्या मुला-मुलींना’ वळणावर आणण्याचा प्रयत्न करणं. त्यांना समज देणं. त्यांच्या आईवडिलांना जागं करणं!!फेसबुकवरून मैत्री झाली. व्हॉटसअ‍ॅपवर चॅटींग वाढलं, हाईक वरून दोघेही जवळ आले आणि सोशल मिडीयाच्या भावविश्वात गुंग झाले. ना कशाची फिकीर.. ना काळजी.. सोशल मिडीया आणि फक्त फ्रेंडस हेच आपलं विश्व समजून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाइक, जी चॅटच्या विळख्यात सापडलेली वयात येणारी मुलं, त्यांच्यातली शारीरिक गुंतागुंत, त्यापायी न कळणार्या धोक्यांना कवटाळत पुढे धावणारं त्यांचं बेलगाम आयुष्य... याचे गरगरून टाकणारे तपशील पोलीस अधिकार्यांशी बोलताना मिळतात.‘एक तरुण माझा पाठलाग करतोय, माझी छेड़ काढतोय’ अशी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात धडकलेल्या एका शाळकरी मुलीच्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पॉस्को आणि विनयभंगाची केस असल्याने पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून मुलाला अटक केली. मुलगाही अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली. तीन महिन्यानंतर मुलगा सुटून बाहेर आला... त्यानंतर आता तो मुलगा आणि तीच मुलगी मुलगी दोघेही गायब झाले आहेत. मुळात गेल्या तीन वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यातून मौज मजा झाल्यानंतर मुलगा दुसऱ्या मुलीकडे आकर्षित झाला. म्हणून त्याला धड़ा शिकविण्यासाठी मुलीने हे पोलिसांकडच्या तक्रारीचं पाऊल उचललं, असं खरं चित्र असल्याचं संबंधीत अधिकारी सांगतात. पुढे काही काळ उलटल्यावर दोघांनाही आपल्यातल्या प्रेमाचा पुन्हा नव्याने साक्षात्कार झाला म्हणून दोघं पुन्हा एकमेकांसोबत पसार झाले.कुटुंबियाना त्यांचे प्रेमसबंध मान्य नाहीत म्हणून दोन्हीकडची कुटुंबं पोलिसांच्या मागे आहेत. - ‘आता या परिस्थितीत काय करणार?’- असा प्रश्नच पोलिसांना पडला आहे.शिक्षण सोडून भलत्या वयात केवळ प्रेमाच्या (खरंतर अनावर शारीरिक आकर्षणाच्या) तात्कालिक उकळीपायी ‘गायब’ होणारी ही मुलं-मुली त्यांच्याही नकळत गंभीर अशा गुन्हेगारी विश्वात ओढली जाण्याची शक्यता वाढते असं पोलीस अधिकारी सांगतात. फेसबुकवर ओळख झाली, मग ‘त्याने’ बाहेर भेटायला बोलावलं, ‘ती’ गेली आणि नको ते घडलं... या तपशिलात थोडाफार बदल होत घडलेल्या घटना हल्ली रोज माध्यमात दिसतात. सोशल मीडिया साईट्सवरून झालेल्या ओळखी प्रत्यक्षातल्या परिचयात रुपांतरित होणं ही निसरडी वाट असू शकते, याची जाणिव या मुला-मुलींना नसते, असं नाही. पण ‘थ्रील’ नावाची कधी पूर्ण न होणारी ओढ या मुलांच्या विचारशक्तीवर सहज मात करताना दिसते.त्यातूनच भलत्या कुणाच्या आश्वासनावर विसंबून आईवडिलांना न सांगता थेट घर सोडून जाण्यासारखे प्रकार घडतात.‘याला उपाय काय?’- असं विचारलं तर अगदी अनुभवी, ज्येष्ठ पोलीस अधिकारीदेखील विचारात पडतात.- आणि चर्चा येते ती त्याच जुन्या उत्तरावर : विश्वास!आईवडील-शिक्षक आणि वाढत्या वयातली मुलं यांच्यातला विश्वास, संवाद, खुलेपणा या जुन्या गोष्टीच आजच्या नव्या काळात कधी नव्हत्या इतक्या महत्वपूर्ण आहेत, असं हे अधिकारी अक्षरश: विनवल्यासारखं सांगतात.आई-वडीलांबरोबर ‘ती’ सिक्रसी राहाणार नाही, अशी मुलांची खात्री असते अनेकदा. म्हणून शाळा-कॉलेजांनी या प्रकारच्या संवादासाठी पुढाकार घ्यायला हवा, असंही त्यांचं सांगणं आहे.

नक्की काय(काय) होतंय?पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या गप्पांमधून हाती लागलेले तपशील

1. आई-वडिलांना विश्वास ठेवणं कठीण व्हावं अशा वेगाने मुला-मुलींचं खाजगी आयुष्य त्यांच्या मोबाईल फोनमध्ये-मेसेजिंग अ‍ॅप्सवर आकार घेतं आहे.

2. स्वत:च्या ‘मोठं होण्या’चा संबंध ही मुलं मनमानी वागण्याशी लावू लागली आहेत. त्यासाठीचं नियोजन आई-वडिलांपासून गुप्तता राखून त्यांना करता येतं.

3. आठवी-नववीच्या वयातल्या मुला-मुलींच्या मोबाईल फोनमध्ये पोर्न क्लिप्स सापडणं, कुणाही त्रयस्थाला कळणार नाही अशा सांकेतिक भाषेत परस्परांशी बोलणारे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स असणं हे सातत्याने दिसतं.

4. शाळा-कॉलेजांमधल्या जागरूक शिक्षकांंकडे या ‘अशा’ घडामोडींची माहिती असते. त्यांना त्याविषयी काळजीही वाटते. पण या काळजीला प्रत्यक्ष कृतीचं रुप देणं अनेकदा अशक्य बनतं त्याची कारणं दोन : एकतर शाळा-कॉलेजचं व्यवस्थापन शक्यतो ‘भानगडी परस्पर मिटल्या तर उत्तम’ त्रयस्थ भूमिकेत असतं. हरकत घेणारे, अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी जागरूक असलेले शिक्षक बरेचदा एकटे पडतात. आणि दुसरं म्हणजे विद्याथर््यांच्या पालकांना काही सांगायला गेलं, तर ‘‘आमच्या मुलांवर तुम्ही संशय ठेवताच कसा?’- असा रागीट नकारच ऐकायला मिळतो. पालक सत्यस्थिती काय आहे, ते तपासून बघायलाही तयार नसतात.

5. शाळकरी आणि पुढे कॉलेजच्या वयातल्या मुलींचाही शारीरिक जवळिकीसाठी ‘पुढाकार’, ‘तयारी’ असणं, हा या प्रकारांना प्रोत्साहन/वाव देणारा विषय बनला आहे.

6. यामध्ये मुलींच्या शोषणाच्या घटना घडतात आणि त्यातून गंभीर स्वरुपाचे गुन्हे आकाराला येतात, हे तर दिसतंच... पण अल्पवयीन मुलगे या चक्रात अडकून आयुष्याची माती करून घेतात.

7. अनेकदा मुली सोयीने ‘अशी’ नाती जोडतात, त्यांचा फायदा असतो तोवर सगळं बिनबोभाट, सुरळीत चालू राहातं... पण मुलींच्या मनाविरुध्द काही घडलं, अगर परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाऊ लागली आहे, अशी शंका मुलीला आली, की ती ‘त्या’ मुलाचं नाव घेऊन मोकळी होते. आणि (विशेषत: कायदेशीर) परिणामांची जराही कल्पना नसलेला तो मुलगा अवघड अशा सापळ्यांमध्ये अडकत जातो.

(मनीषा लोकमतच्या मुंबई आवृत्तीमध्ये वार्ताहर म्हणून पोलीस बीट पाहाते)