शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाटलं ते केलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 08:51 IST

विराटच्या लग्नाचे फोटो आणि जोक्स फॉरवर्ड करताय; पण त्याच्या यशाचा मंत्रही ऐकून घेतलेला बरा !

एवढा मोठा बॅट्समन तू, कितीजण तुला आदर्श मानतात, तुझा खेळ इन्स्पायर करतो त्यांना. तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना तू काय सांगशील?- नव्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं या प्रश्नाचा एक उत्तम यॉर्कर विराटला अलीकडेच एका कार्यक्रमात टाकला.विराटनं मात्र त्याच्यावरही सिक्सर ठोकला. तो जे म्हणाला ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे.‘तुम्ही जे करता, जेव्हा केव्हा करता, खेळता, परफॉर्म करता ते मनापासून करायला हवं. इतरांना दाखवायला, काही सिद्ध करायला काही करू नये. आपण जेन्यूइन असावं. जे वाटलं ते करून मोकळं व्हावं. तसं केलं नाही तर मग तुम्ही जे प्रिटेण्ड करता, त्यासाठी इतर लोकही कनेक्ट करू शकत नाहीत. आणि तुम्ही स्वत:ही स्वत:सारखं जगू शकत नाही. मी कधीच कुणाला कॉपी करत नाही. मी जसा आहे, तसा आहे. जे वाटलं ते करतो. पूर्वी लोकांना फार प्रॉब्लेम होते. लोक तक्रार करायचे, मी असाच वागतो, तसाच बोलतो वगैरे. पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. जे मनात आलं, ते केलं. मी स्वत:ला बदलायच्या भानगडीत पडलो नाही.मग मी स्वत:त बदल केले नाहीत का?

तर केले. पण जेव्हा मला वाटलं की, अमुक गोष्ट मी बदलायची गरज आहे, तेव्हाच मी ती बदलली. दुसºया कुणासाठी किंवा कुणी म्हणतोय, आपली टिंगल होतेय किंवा टीका होतेय म्हणून स्वत:ला बदललं नाही.सगळ्यांना या प्रक्रियेतून जावं लागतं. आयुष्यात मॅच्युअर होताना, मोठं होताना, वाढताना हे सारं घडतंच. घडावंच लागतं. पण ते करताना कायम हे लक्षातच ठेवायला हवं की स्वत:ला बदलण्याच्या प्रक्रियेत स्वत:ची ओळखच पुसून टाकू नये. कारण तुम्ही कुणा दुसºयासारखं व्हायचा प्रयत्न केला, तसं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न केला तर कधीच यश मिळत नाही. आणि इतरांना तुमच्यापासून प्रेरणा वगैरे मिळण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

या एका गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे की, जे आपल्याला वाटतं ते करून मोकळं व्हावं. त्यासाठी ढोर मेहनत करावी. आणि आपण जे करू ते प्रामाणिकपणे मन लावून करावं. मग यश कुठं जाईल !’-विराटचं लग्न, त्याचे ते सारे फोटो, जोक्स हे सारं व्हायरल करताना विराट हे जे म्हणतोय ते सक्सेस मंत्रही नजरेखालून घातलेले बरे !