शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

थोडासा प्यार हुआ है. थोडा है बाकी..

By admin | Updated: October 23, 2014 15:40 IST

आजही माझं हे ‘आय लव्ह यू’ म्हणणं तुला फॉर्मलिटीच वाटेल. पण हे खरंय की, हल्ली आपण दोघं एकमेकांना फार बोअर वाटू लागलोय,

आय लव्ह यू.
खरंच.
आय मनापासून लव्ह यू व्हेरी मच.
हे ऐकून तुला वाटेलही की,
आता हा काय याचा नवीन खुळचटपणा?
कशाला हे असलं कोरडं-ड्राय पार सुकून गेलेलं बटर?
एरव्ही तर सतत भांडत तर असतोस.
सतत काहींना काही खुसपट काढतोस,
‘ठेव ना फोन खाली. किती पकवशील आता.’
हे एकच पालूपद.
परवा संध्याकाळी एकदम भरून आलं.
भरमसाठ सुटला होता वारा.
तेव्हा तू मला 
 व्हॉट्स अॅपवर मेसेज टाकला होता.
‘दिन गुजर जाता है, कुछ लम्हे कटते नहीं.’
मी काय रिप्लाय पाठवला, आठवतं?
्रुॅ ु.ूँ्र’’.
अर्थात मीच असं करतो असं काही नाही, मी ही तुला असं सेण्टी मारलं की, तू ही त्याचा पुरता पापड करतेसच नेहमी . 
त्यामुळे आजही माझं हे ‘आय लव्ह यू’ म्हणणं तुला फॉर्मलिटीच वाटेल.
पण हे खरंय की, हल्ली आपण दोघं एकमेकांना फार बोअर वाटू लागलोय,
आणि आपलं रिलेशन?
ते तर महाबोअर झालंय.
आपण दोघंही फार चिडचिडे आणि भांडकुदळ व्हायला लागलोय.
 
******
आणि मी?
मी तर एकनंबरचा रद्दड, 
अनरोमॅण्टिक होत चाललोय.
एकेकाळी तुङया मागे मागे फिरायचो, 
तू ‘हो’ म्हणालीस तेव्हा
तर खुशी के मारे मरणारच होतो.
आठवतं, किती काळजी घ्यायचो 
आपण एकमेकांची,
केवढे ‘समजूतदार’ होतो तेव्हा,
आपल्याला न आवडणारी गोष्टही 
एकमेकांसाठी जीव तोडून करायचो,
तू न सांगताही 
तेव्हा ब:याच गोष्टी मला कळायच्या 
आणि मी न बोलताही माङया 
साध्या गोष्टीतून तू माझं मन ओळखायचीस,
कुठ गेलं ते सारं.
‘तुङयासाठी कायपण’ असं म्हणता म्हणता
आपण ‘माङयासाठी कायपण’ कर,
मी म्हणतो तेव्हा भेट, 
मी म्हणतो तेव्हा एसएमएस, 
व्हॉट्स अॅपवर भेट,
माझा मूड ओळख, मला छान छान म्हण,
असा असा हट्ट करायला लागलो आपण?
का? कधीपासून?
आणि त्यातून काय कमावलं?
ही नुस्ती भांडणं. नुस्ती उदासी 
आणि नुस्ता वैताग?
आणि आता बसलोय गात,
थोडासा प्यार हुआ था, कुछ नहीं बाकी.
 
******
प्यार जिंदगी बनाता है, बिगाडता नहीं
असले चिपकू डायलॉग मारायचो ना आपण, मग.?
आता  का इतकं भांडतो आपण?
सोडून का देत नाही.? 
कशाला हा एवढा मीपणा?
थोडी घेतली पड, 
घेतला थोडा कमीपणा स्वत:कडे तर असा काय 
इगोचा कोळसा होणार आहे?
आणि झाला त्याचा कोळसा 
तर काय बिघडलं एवढं!
 
******
आपण वागू ना हिंदी सिनेमावाल्यांसारखे,
होऊ थोडे उल्लू.
म्हणू तरी की, 
तूम दिन को दिन कहो तो दिन, रात को रात.
जरा होऊ ना सेण्टी,
कशाला एवढं प्रॅक्टिकलबिक्टिकल व्हायचं त्यापेक्षा खेळू ना थोडा खेळ, 
माङया मनातलं ओळख -
तुङया मनातलं ओळख सांगणारा,
दुस:याकडून काय हवं 
हे सांगणा:या अपेक्षांच्या डोंगरावरून मारू उडी,
त्यापेक्षा ‘अती’ होतंय असं वाटेर्पयत
 करु एकमेकांसाठी?
बोल कशी आयडिया आहे?
 
******
तू हसशील हे वाचून.
पण करुन पाहू असा ‘येडा रोमान्स?’
अब प्यार कियाच है, तो डरना क्या.?
‘इगो’ला मारु बुट्टी, 
आणि लव्ह करणा:यांची गट्टी.
सांग,  म्हणशील मला
‘हो’
पुन्हा एकदा.प्लीज.