शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

टेक्नॉलॉजी आणि तूर

By admin | Updated: June 8, 2017 12:25 IST

रस्त्यावर दूध ओतणारे, भाजीपाला फेकणारे,संपावर गेलेले रागावलेले तरुण शेतकरी हे चित्र विषण्ण करणारं आहे, हे खरंच! -

 

 
 
रस्त्यावर दूध ओतणारे, भाजीपाला फेकणारे,संपावर गेलेले  रागावलेले तरुण शेतकरी हे चित्र विषण्ण  करणारं आहे, हे खरंच! - पण बातम्यांमध्ये न दिसणारे आणखीही काही ‘तरुण’ आहेत. रस्त्यावर उतरण्यापेक्षा त्यांना प्रश्नाची उत्तरं शोधायची  उमेद आहे. छोटे-छोटे का असेना, मार्ग शोधण्याची तयारी आहे.- अशाच दोघांची भेट!!
 
शेतकऱ्यांचा संप.
त्यांचे प्रश्न, त्यांचे कर्ज.
कर्जापायी होणाऱ्या आत्महत्या.
निसर्गावर अवलंबून असलेली शेती आणि हतबल शेतकरी. 
शेतमालाला नसलेला भाव आणि कवडीमोल भावात विकावं लागणारं पीक..
या कहाणीत दुर्दैवानं नवीन काही नाही..
पिढ्यान्पिढ्या आपला शेतकरी हे सारं सोसतोय, भोगतोय.
शेतीला प्रतिष्ठा नाही, शेतीतल्या श्रमांना मोल नाही अशी विषण्ण अवस्था. या साऱ्यात समाजातही शेतीला दुय्यम स्थान. उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ शेती असं मानणारी आपली समाजव्यवस्था. आणि त्यातून शेतकरी नवरा नको गं बाई म्हणून हेटाळणी झाल्यानं निर्माण होणारे तरुण शेतकऱ्यांच्या लग्नाचे प्रश्न. त्यातले पेच. तरुण शेतकरी, त्यांचे प्रश्न, शेतीच्या वाटण्यांतून निर्माण होणारे, पाणी नसल्यानं नापिकीचे असे किती प्रश्न.
या प्रश्नांवर सध्या माध्यमांत, समाजमाध्यमांत रान पेटलं आहे. चर्चांचे रतीब घातले जात आहेत. 
पण उपाय काय हे कुणी सांगतंय का?
उपायांच्या दिशेनं जाणारी काही पाऊलं दिसताहेत का?
तेच शोधण्याचा प्रयत्न ‘आॅक्सिजन’ने केला.
त्यात सापडले पुण्यातलेच दोन मित्र.
अभिजित फालके.
मोहसिन शेख.
या दोघांनी केलेल्या प्रयत्नांत ‘आपण काहीतरी करून पाहू’ अशी एक उमेद दिसते.
अभिजित आयटीवाला. पुण्यात राहणारा, मूळचा विदर्भातला.
आयटीतलेच दोस्त-सहकारी यांच्या मदतीनं आणि आपल्या टेक्निकल ज्ञानाच्या हिमतीवर त्यानं ‘आपुलकी’ नावाची एक संस्था - खरंतर उपक्रम - सुरू केला. आणि २०११ पासून विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी ते अनेक लहानमोठे उपक्रम, कार्यशाला, संत्री महोत्सव असे बहुविध प्रयत्न करून पाहत आहेत.
मोहसिन आणि त्याच्या मित्रांनी सोशल मीडियाची मदत घेतली.
आणि तूरप्रश्न गंभीर झालेला असताना पुण्यात पहिला तूर महोत्सव भरवला.
मार्केटिंग केलं त्याचं तेही सोशल मीडियाच्याच मदतीनं.
अर्थात शेतीचे प्रश्न, शेतमाल विक्रीचे प्रश्न, त्यासाठी मिळणारा भाव हे सारे जटिल प्रश्न आहेत. त्याचं मार्केटिंग किंवा अवघड शेतीप्रश्नांची ही पाहा सोपी उत्तरं असं म्हणून या दोघा मित्रांना भेटू नये.
पण ठरवलं, प्रयत्न केले, नुस्ती कोरडी चर्चा करण्यापलीकडे जाऊन काही करायचं ठरवलं तर ते जमू शकतं, आणि तेही आपल्याच समाजात घडतं याचीही आपण नोंद घ्यावी. त्यातून जमलंच तर काही शिकावं. तरुण शेतकरी मित्रांनी अशा उपक्रमांची नोंद घेऊन आपल्याही कल्पनेला चालना द्यावी..
म्हणून आज ही अभिजित आणि मोहसिनची भेट..
 
सोशल मीडियावरून तूर विकणारे तरुण
सोशल मीडियावरचे काही दोस्त. त्यांना वाटलं शेतकऱ्यांच्या समस्येविषयी नुस्त्या पोस्ट टाकून आणि  कोरडी सहानुभूती व्यक्त करून काय होणार? आपणच काहीतरी करू. मग त्यांनी ठरवलं, पुण्यात तूरडाळ महोत्सव भरवण्याचं. खेड्यात जाऊन तूर विकत घेतली, बचतगटांच्या महिलांकडून डाळ बनवून घेतली, महोत्सवाचं मार्केटिंगही फेसबुकवरूनच केलं. आणि मग, पुढे?
सामाजिक चौकटीत जसा सोशल मीडिया अ‍ॅड झाला तसा आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा एकमेकांशी असलेला संपर्कमोठ्या प्रमाणात वाढला. म्हणायला जरी हे व्हर्च्युअल जग असलं तरी, जर तुम्ही याचा वापर विधायक पद्धतीने करत असाल तर इथेही तुम्हाला जिवाला जीव देणारी आणि तुमच्यावर मोक्कार प्रेम करणारी माणसं भेटतात. गेली ६-७ वर्षं झाली मी सोशल मीडिया वापरत आहे. या ६-७ वर्षांत अनेक चांगली माणसं मला इथे मिळाली. सोबतच समविचारी मित्रांची तर इथं खाणच सापडली असं म्हणावं लागेल. याचीच परिणती म्हणजे या सोशल मीडियावर आमचा खूप चांगला ग्रुप तयार झाला. इथं आमच्यात अनेक विषयांवर खलबते होतात. मत-मतांतरं मांडली जातात. ‘समाजाचं आपण काही देणं लागतो’ या भावनेनं आम्ही आमच्या परीने काही ना काही करायचा प्रयत्न इथं नेहमी करतो.
महिनाभरापूर्वी उस्मानाबादच्या काही शेतकऱ्यांनी पुण्यातील मार्केट यार्ड भागात एका कंपनीमध्ये तोडफोड केली. हा प्रकार तुरीच्या खरेदीवरून झाला होता. तूर खरेदी करून ही संबंधित कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे दिले नव्हते. म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी त्या कंपनीमध्ये तोडफोड केली होती. आमच्या ग्रुपवर हाच विषय तेव्हा चर्चेला होता. त्यानंतर आम्हाला एकूणच तूर, तुरीचा प्रश्न, यंदा झालेलं तुरीचं अमाप उत्पादन, केंद्र आणि राज्य सरकारच्या आवाहनाला भुललेला शेतकरी, राज्य सरकारने त्यावेळी अचानक बंद केलेली तूरखरेदी, राज्यात खरेदीविना पडून असलेली लाखो टन तूर, शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होत असलेली लूट, ५०५० रुपयांचा हमीभाव असताना केवळ गरजेपोटी ३२०० ते ३८०० च्या दरम्यान आपली तूर विकणारा शेतकरी, अशा अनेक प्रश्नांबद्दल आम्हाला माहिती झाली. एकूणच हा विषय गंभीर आहे आणि या विषयावर मग आपल्या सर्वांना मिळून काही करता येईल का या अनुषंगाने आमची चर्चा सुरू झाली.
पहिल्यांदा सोशल मीडियावरून नुसतं वेगवेगळ्या विषयांवर मत मांडण्यापेक्षा, यावेळी बळीराजासाठी रस्त्यावर उतरून काम करावं लागेल, हे आमच्या लक्षात आलं. सगळ्या अपेक्षा सरकारकडून करण्यापेक्षा आपणही मिळून काहीतरी प्रयत्न करूयात असा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला. त्यानंतर आमच्या काही कृषी क्षेत्रातील मित्रांनी आम्हाला हा प्रश्न अजून व्यवस्थित इस्कटून सांगितला. या मित्रांच्या म्हणण्यानुसार ५०५० रुपयांच्या हमीभावाने आपण तूर खरेदी करून आणि नंतर त्याची तूरडाळ बनवून बाजारात विकायचा आमचा निर्णय झाला. यासाठी आम्हाला एक बॅनर हवं होतं. तेव्हा मागच्या वर्षी दुष्काळात आम्ही शेतकरी बांधवांनाच मदत करण्यासाठी स्थापन केलेलं ‘शेतकरी सन्मान परिषद’ हे नाव धावून आलं. आत्ताही आम्ही या शेतकरी बांधवांच्याच सन्मानासाठी हा सगळा खटाटोप करत होतो. त्यांना आपल्याकडून ‘फूल ना फुलाची पाकळी’ या भावनेतूनच मदत करत होतो. म्हणून ‘शेतकरी सन्मान परिषद’ हे नाव सर्वार्थानं योग्यही होतं. आणि यातूनच ‘शेतकरी सन्मान परिषद आयोजित पहिला तूरडाळ महोत्सव’ या संकल्पनेचा जन्म झाला. 
एकदा असा महोत्सव करायचा म्हटल्यावर आमची संपूर्ण टीम कामाला लागली. आम्ही योग्य जागेच्या शोधात गुंतलो. जागा आमच्यासाठी सोयीची, त्याचवेळी ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी असावी, असा आमचा प्रयत्न होता. त्याचवेळी भोसरी येथील इंद्रायणीनगरचे आमचे मित्र इम्रान शेख आमच्या मदतीला धावून आले. भाऊने पहिला तूरडाळ महोत्सव त्यांच्याच भागात म्हणजेच इंद्रायणीनगरमध्येच करायचा हट्ट धरला. अनेक दिवसांपासून आम्ही सोबत असल्याने आणि सर्व टीमला इम्रान आणि त्यांच्या वडिलांची त्या भागात असलेली प्रतिष्ठा माहिती असल्याने आम्हीही आनंदाने तयार झालो. त्यासाठी आवश्यक असणारी जागा ही इम्रानभाऊने आम्हाला दाखवली. ती जागा प्रशस्त तर होतीच सोबतच तूरडाळ महोत्सवासाठी आम्हाला आवश्यक वाटणाऱ्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होत्या.
जागा निवडीचं हे एक मोठ्ठं काम पूर्ण झालं होतं. एकूणच आयोजनाच्या दृष्टीने हा एक मोठा हार्डल होता. इम्रानभार्इंच्या पुढाकाराने अगदी आरामात आम्ही तो पार केला. ७ मे २०१७ (रविवार) हा दिवस पहिल्या तूरडाळ महोत्सवासाठी आम्ही फायनल केला. फायनल केला खरा, पण आमच्याकडे नियोजनासाठी फक्त सात दिवस होते. त्यात इम्रान सोडले तर बाकी आम्ही सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे होतो. म्हणून काम करताना आम्हाला अडचणी येतच होत्या. सोशल मीडियावर आम्ही सर्वजण यात असल्याने प्रत्येकाला तिथं वेळ देता येत नव्हता. काही लोक आउट आॅफ पुणे होते. अशावेळी आम्ही जबाबदारी वाटून घेतली. आणि फुल एक्सलेटर करून कामाला लागलो.
असा काही महोत्सव होतोय, या आशयाची प्रेसनोटही आम्ही काढायचं टाळलं. कारण आमचं सोशल मीडियावरील नेटवर्कखूप स्ट्रॉँग झालं आहे याची आम्हाला खात्री होती. आम्ही या तूरडाळ महोत्सवाची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली तसा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मला अजूनही आठवतं की, या विषयावरच्या मी टाकलेल्या त्या पहिल्या पोस्टनंतर मला चार तासातच जवळपास ५०-५५ फोन कॉल आले. यातले अनेक फोन कॉल हे कौतुक करणारे, तर काही जबाबदारीची जाणीव करून देणारे होते.
यानंतरचा भाग मार्केटिंग कॅम्पेनचा होता. यासाठी आम्ही सोशल मीडियाची मदत घ्यायचं ठरवलं. काही पोस्टर्स, बॅनर्स डिझाइन केले गेले. आमच्या असलेल्या मोठ्या नेटवर्कचा फायदा आम्हाला अशा पोस्ट पडल्यानंतरच दिसू लागला. एक दिवसात तर आम्ही या पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल केल्या. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे फोन कॉल्स आम्हाला याची प्रचिती देत होत्या. या कॅम्पेनसाठी करण्यात आलेल्या जाहिराती याही शेतकरीकेंद्रितच होत्या. म्हणूनच या जाहिराती व्हॉट्सअ‍ॅपवर पाहून अनेक तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आम्हाला त्यांची तूर विकण्यासाठी संपर्कही केला. ही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची आणि आमचा उत्साह वाढवणारी होती.
यानंतरचा जो टप्पा होता तो या एकूणच कॅम्पेनचा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. 
तो म्हणजे तूर खरेदी. 
महोत्सव तीन दिवसांवर येऊनदेखील आम्हाला हवी तशी तूर मिळत नव्हती. हवी तशी म्हणजे सेम क्वालिटीची. परंतु यावेळी भूम तालुक्यातील आमचे मित्र डॉ. सूरज मोटे हे धावून आले. त्यांनी तूर खरेदीसंबंधी त्यांच्या शेजारील म्हणजे पखरूड या गावी बोलणं करून ठेवलं असल्याचं आणि तिथं तूर उपलब्ध असल्याचं आम्हाला कळवलं. डॉक्टरसाहेबांच्या मदतीमुळे तिथल्या शेतकऱ्यांकडून आम्ही एकूण चार टन तूर खरेदी केली. तिथल्याच ‘ग्रीन व्हिलेज’ महिला बचतगटाकडून आम्ही त्या तुरीच रूपांतर तूरडाळीत करून घेतलं. या सर्व व्यवहाराचे पैसे आम्ही त्यांना डाळ घेतानाच चुकते केले. ६ तारखेला रात्री उशिरा ट्रक तो माल घेऊन भोसरीकडे म्हणजेच महोत्सवाच्या ठिकाणाकडे पखरूडकडून रवाना झाला. पहाटे ३ च्या आसपास तो नियोजित ठिकाणी पोहचला.
मोठ्या प्रमाणात केलेल्या जाहिराती आणि सोशल मीडियावर मिळालेला मोठा रिस्पॉन्स, सर्वांची मेहनत या जिवावर आम्ही ७ तारखेला सकाळी ‘राज्यातील पहिला तूरडाळ महोत्सव’ घेण्यासाठी, तो पार पाडण्यासाठी सज्ज होतो. सकाळी प्रचंड दडपण मनावर जाणवत होतं. पण सर्व मित्रांची साथ आणि विश्वास मात्र आम्हाला हा महोत्सव यशस्वी होणारच, याची ग्वाही देत होते. मुळात तो यशस्वी होवो किंवा नाही होवो, याबाबतीत आम्हाला चिंता करायचं काही कारण नव्हतं. कारण प्रयत्न करत असल्याचं समाधान आम्हाला प्रचंड मोठं होतं. पण हा प्रयत्न यशस्वी झाला तर राज्यातील अनेक तरुण असा उपक्र म आयोजित करतील असं कुठूनतरी आतून वाटत होतं. जेणेकरून शेतकरी बांधवांना अजून जास्तीत जास्त मदत होईल. जसा जसा दिवस संपत आला तसा तसा आमच्यावरील ताण पूर्णत: निवळत गेला. शेकडो ज्ञात-अज्ञात हातांनी केलेली मदत, शेकडोंच्या संख्येने आलेले ग्राहक, नेटिझन्सचा पहिला तूरडाळ महोत्सव म्हणून न्यूज चॅनेल्सने घेतलेली दखल, सोशल मीडियावरील मित्रांची साथ, प्रत्यक्ष फिल्डवर राबलेल्या मित्रांची अपार मेहनत या साऱ्यामुळे हा महोत्सव प्रचंड यशस्वी झाला. दिवसभरात आम्ही तीन टनाच्या आसपास तूरडाळ विकली. 
सोशल मीडियातले आमचे मित्र वैभव कड यांनी दुबईतून आॅनलाइन १०० किलो तूरडाळ घेतली. मोरया जिमचे अध्यक्ष हेमंत थोरात यांनी आपला वाढदिवस तूरडाळ महोत्सवात येऊन साजरा केला आणि १०० किलो तूरडाळ अनाथाश्रमास दान दिली. पंजाब अ‍ॅण्ड सिंध बॅँकेच्या कर्मचाऱ्यांनी सरदार सरांच्या सोबतीने २५६ किलो तूरडाळ विकत घेतली. हे आणि असे अनेक अनुभव आहेत की ज्यांनी हा तूरडाळ महोत्सव खूप मेमोरेबल बनवला आमच्यासाठी. इथं खरेदी करायला आलेला प्रत्येक ग्राहक हा बळीराजाला मदत करायच्या दृष्टीने आला होता. परत जाताना तेच समाधान तो आपल्या चेहऱ्यावर घेऊन जात होता.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर मिळालेले समाधान शब्दांत सांगता येणार नाही. शेतकरी बांधवांप्रति कोरडी सहानुभूती दाखवण्यापेक्षा त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष केलेलं काम आम्हाला मोक्कार समाधान देत होतं. हे कॅम्पेन यशस्वी करून हे लक्षात आलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण विधायक कामंही खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तोच या उपक्रमाचा संदेश. यापुढेही आमचा हा ग्रुप मोठ्या प्रमाणावर असे तूरडाळ महोत्सव महाराष्ट्रभर आयोजित करायचा प्रयत्न करणार आहे. विश्वास आहे की तेही उपक्रम यशस्वीच होतील!
 
- मोहसीन आ. शेख idesignstudiopune@gmail.com