शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

टॅटूच्या बाह्या

By admin | Updated: July 7, 2016 12:49 IST

काळ्या-निळ्या रंगाच्या भरगच्च टॅटूची क्रेझ आजही तरुणाईत वाढतेच आहे. अंगावर टॅटू काढून घेणं नको वाटत असेल तर त्यावर सोप्पा आणि स्वस्त उपाय!

- सारिका पूरकर-गुजराथी
 
अंगावर टॅटू काढून घेणं नको वाटत असेल तर त्यावर सोप्पा आणि स्वस्त उपाय!
 
स्टायलिश दिसण्याचा एक नवाच फंडा
 
सैफअली खानचा करिनाच्या नावाचा टॅटू, दीपिका पदुकोनच्या मानेवरचा रणबीरच्या नावाचा टॅटू किंवा अक्षयकुमारच्या पाठीवरचा त्याचा मुलगा आरवच्या नावाचा टॅटू हे सारं मध्यंतरी बॉलिवूडमध्ये बरंच चर्चेत होतं. कलाकारांना पडलेली ही टॅटूची भुरळ तशी आता काही नवीन राहिलेली नाही.
खरं तर  रेस्टलर्स, त्यातही डब्ल्यूडब्ल्यूएफवाले, त्यांच्या बलदंड बाहूंवर अक्राळविक्राळ टॅटू सर्वप्रथम दिसले. नंतर मात्र टॅटूची क्रेझ पॉप गायक, कलाकारांर्पयत पोहोचली व त्यानंतर ती सर्वसामान्यांनीही आपलीशी केली. काळ्या-निळ्या रंगाच्या भरगच्च टॅटूची क्रेझ आजही तरुणाईत वाढतेच आहे. आपल्याकडे नवरात्रत टॅटू मेकिंगला जोर चढतो. तरुणाई गरब्यासाठी हातावर, पाठीवर हे टॅटू काढून घेते. नाजूक डिझाईन, नावांचे टॅटू तर आता सर्रास काढून घेतले जातात. तुङया नावाचं इनिशियल टॅटूनं गोंदलं असं न म्हणताही नावं टॅटू म्हणून गोंदली जातात हे खरंच आहे.
पण असं टॅटू काढून घेणं तेवढं सोपं नसतं. एकतर त्यासाठी हिंमत लागते आणि दुसरं म्हणजे एकदा टॅटू काढला की तो परमनण्ट राहतो. त्यामुळेही अनेकांना असा कायमस्वरूपी  टॅटू काढून घ्यायचा नसतो. अनेकांना टॅटू काढण्यासाठी वापरल्या जाणा:या सुयांची भीती वाटते ती वेगळीच! 
मात्र टॅटू तर आवडतोच, ते सारं स्टायलिश वाटतं. आपल्या हातावरही हवंसं वाटतं. मग करायचं काय? 
ही कोंडी फोडली आहे ती टॅटू स्लीव्हजने. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर टॅटूच्या रेडिमेड बाह्या आता बाजारात मिळतात.
खांद्यापासून हाताच्या मनगटार्पयत टॅटूची ही बाही फक्त अडकवायची. बस्स, अबरा का डबरा. मॅजिक.
टॅटू तुमच्या हातावर. हातभर टॅटूचं डिझाईन स्टाईल स्टेटमेंट म्हणून मस्त मिरवूनही घेता येतं.
 यंगिस्तानमध्ये सध्या टॅटू स्लीव्हज कमालीच्या हिट झाले आहेत. टॅटू हा जास्त करून हातावर काढला जातो. दंडापासून मनगटार्पयत टॅटू काढण्याच्या प्रकाराला स्लीव्हज टॅटू असे म्हणतात. असे हातभर टॅटू काढण्यासाठी हजारो रुपये, बराच वेळ खर्च करावा लागतो. रेडिमेड टॅटू स्लीव्हज या ऑप्शनने मात्र या सगळ्यावर फुली मारली आहे. शिवाय वेगवेगळे टॅटूही तुम्हाला अगदी रोज ट्राय करता येतात असेही म्हटले तरी चालेल. टॅटूचे अमुक  डिझाईन नाही आवडले, टाक बाही काढून आणि चढवा दुसरी. ती नाही तर तिसरी. इतकं सोप्पं आहे आता हे. टॅटू स्लीव्हजची ही कमाल आहे. टॅटू स्लीव्हजमुळे टॅटू अधिक कलरफूल, बोल्ड अॅण्ड ब्यूटिफूल झाले आहेत. 
टॅटूच्या बाह्या नेमक्या आहेत काय?
टॅटू स्लीव्हज किंवा टॅटूच्या बाह्या या नायलॉनच्या पारदर्शक कपडय़ांपासून तयार केल्या जातात. या कपडय़ावर टॅटूंचे असंख्य, नवनवीन डिझाईन्स रंग, शाईपासून चितारले, प्रिंट केले जातात. कापड पारदर्शक असल्यामुळे अंगावर चढवले तरी ते वेगळे कापड घातल्यासारखे दिसत नाही, तर उलट तुम्ही थेट हातावरच टॅटू काढल्याचा फील येतो, तो तसा दिसतोही. त्यातून भरपूर पर्याय टॅटू स्लीव्हजमध्ये उपलब्ध आहेत. फुल बाही म्हणजेच संपूर्ण हातभर, क्वार्टर बाही म्हणजेच आपण त्याला थ्री फोर्थ म्हणूयात आणि हाफ बाही म्हणजेच दंडापासून कोपरार्पयत. अशा साईजही या बाह्यांच्या मिळतात.  टॅटू स्लीव्हजचा डबल धमाका म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही सन प्रोटेक्टर म्हणूनही ते घालू शकता. पांढरे, स्कीन कलरचे प्लेन हॅण्ड ग्लोव्हज घालण्यापेक्षा हे असे कलरफुल पर्यायही यात उपलब्ध आहेत. 
डिझाईन्स कसं निवडाल?
टॅटू स्लीव्हज घालण्यासाठी तुम्हाला कसा लूक हवा आहे? हे आधी ठरवा. हा लूक व त्यासाठी कोणत्या स्लीव्हज सूट होतात, ते पाहा.
टॅटू स्लीव्हजची दुनिया म्हणजे अलीबाबाची गुहाच आहे. खुल जा सिमसिम म्हणताच हजारो पर्याय  उपलब्ध आहेत. त्यासाठी ऑनलाईन खरेदीचाही पर्याय आहे. लॉन इन करा, डिझाईन निवडा, ऑर्डर द्या व घरपोच मिळवा टॅटू स्लीव्हज. दोन, सहा, बारा टॅटू स्लीव्हजचे सेट 150 ते 250 रुपये जोडी किंवा 400 रुपयात सहा स्लीव्हज अशा अनेक किमतीत मिळतातज.
 टी शर्ट्स, स्लीव्हलेस टय़ुनिक यांच्यावर या बाह्या सुंदर दिसतात!
मुलींसाठी
 
- ड्रॅगन टॅटू स्लीव्हज
टॅटूमधील हे सर्वात लोकप्रिय डिझाईन म्हणून ओळखलं जातं. पूर्वी केवळ काळ्या शाईनं ते काढलं जायचं. टॅटू स्लीव्हजमध्ये मात्र ते विविध रंगांमध्ये काढून मिळतं. या टॅटूमुळे एक रांगडा, भारदस्त लूक मिळतो. म्हणूनच हे डिझाईन सहसा पुरुषांना सुट होतं.  मात्र उंच, धिप्पाड मुलींना ते चांगलं दिसतं.
 
- फ्लोरल टॅटू स्लीव्हज
हा ऑप्शन मुलींसाठी बोले तो झकास ! आकर्षक रंगांमधील फुलांची उधळण तुम्ही या स्लीव्हजमुळे तुमच्या हातांवर करून घेऊ शकता. लाल, गुलाबी, जांभळा अशा रंगात या स्लीव्हज उठून दिसतात. फुलं, पानं, फांद्या, फुलपाखरं या डिझाईन्समध्ये चितारली जातात. हे डिझाईन सहसा नाजूक नसतं तर मोठय़ा आकारातच असतं. 
- ट्रायबल टॅटू स्लीव्हज
अर्थातच गो ट्रॅडिशनल ! आपल्या देशभरात विविध लोकसंस्कृतीत आढळणा:या चित्रकलेचं प्रतिबिंबच या स्लीव्हजवर दिसतं. मेहंदी डिझाईन्स, वारली डिझाईन्स, मधुबनी, राजस्थानी चित्रकला याचा हा मेळ असतो. गर्ली लूकसाठी ट्रायबल टॅटू स्लीव्हज खूप  चांगला पर्याय आहे. पुरुषांसाठीही हा पर्याय सुटेबल होऊ शकतो, फक्त डिझाईन मोठं असायला हवं. नाजूक नको.
 
- जापनीज टॅटू स्लीव्हज
हादेखील पारंपरिक डिझाईन्सचाच पर्याय आहे. फक्त भारतातील नाही तर जापनीज संस्कृतीला हातावर रेखाटण्यासारखं ते आहे. हातात पंखा घेतलेली जपानी स्त्री हा मुलींसाठी टॅटू स्लीव्हजमधील एक सुंदर पर्याय आहे.
 
- कोई फिश
जापनीज डिझाईन्सचाच हा एक भाग. जपानमध्ये कोई माशाला महत्त्वाकांक्षा, भरभराटीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच कोई फिश टॅटू डिझाईनही खूप लोकप्रिय आहे.  समुद्राची निळाई व कोई माशाचा केशरी रंग टॅटू स्लीव्हजला उठावदार बनवतो.
मुलांसाठी
 
- ब्लॅक फुल स्लीव्ह टॅटू
या प्रकारात संपूर्ण डिझाईन काळ्या रंगात असते शिवाय डिझाईन मोठमोठय़ा आकारातील असते. त्यामुळे पौरुषत्वाचा गर्व त्यातून दिसून येतो.
 
- थ्री ग्रीक स्टॅच्यूज स्लीव्ह
ग्रीक संस्कृतीतील तीन व्यक्तिमत्त्वं, काळा व राखाडी रंगांचा वापर करून चितारले जातात.
 
- बर्ड टॅटू स्लीव्हज
आर्टिस्टिक लूक देणारा हा एक प्रकार मुलांसाठी हटके पर्याय ठरू शकतो. पक्षी, स्कल, जहाजे, घोडय़ावरील राजकुमार ही याच वंशावळीतील डिझाईन्स आहेत.
 
- धार्मिक 
अध्यात्म आणि फॅशन यांची सांगड असलेले हे डिझाईन म्हणता येईल. भारतीयांची श्रद्धास्थानं असलेले अनेक देव-देवतांचे चेहरे या टॅटू स्लीव्हजवर आढळतात.