शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
3
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
4
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
5
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
6
मोहम्मद सिराजने लावला पिंपल पॅच? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, असं होतं त्वचेचं संरक्षण
7
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
8
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
9
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
10
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
11
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
12
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
13
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
14
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
15
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
16
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
17
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
18
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
19
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
20
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!

जिसको जो चाहे वो लेलो !

By admin | Updated: October 13, 2016 20:33 IST

शंकराचार्यांच्या गावात भेटलेला सेक्युलॅरिझम अन् काश्मिरात भेटलेली नफरत याचा अर्थ नेमका कसा लावायचा?

शंकराचार्यांच्या गावात भेटलेला सेक्युलॅरिझमअन् काश्मिरात भेटलेली नफरत याचा अर्थ नेमका कसा लावायचा? ‘माना तो सब भगवान है’. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या गावात त्या मुलींनी नोंदविलेलं मत विसरता येणार नाही. स्वरूपानंद साऱ्या जगाला सांगत सुटलेत, ‘साईबाबा देव नाही’. त्यावरून त्यांनी केवढं मोठं राजकारण पेटविलं. पण त्यांच्या गावातील गोंड समाजाच्या आदिवासी मुली मला सांगत होत्या, ‘हम नही मानते गुरुजीकी बाणी. हम साईबाबा को भगवान मानते है.’‘मेरा देश बदल रहा है’ अशी जाहिरात सध्या रोज कानीकपाळी आदळतेय. हा इंडिया बदलतोय म्हणजे नक्की काय होतयं हे मी शंकराचार्यांच्या दिघोरी (मध्य प्रदेश) या गावात पाहत होतो. कोणाला देव मानायचं आणि कोणाला मानायचं नाही याचे सर्टिफिकेट शंकराचार्य वाटत सुटलेत. पण त्यांच्या गावातील आदिवासी मुलींनी ‘माना तो सब भगवान हैै’ असं सांगून शंकराचार्यांनी देवांना बहाल केलेल्या डिग्य्रा बाद ठरविल्या. शंकराचार्यांच्या गावातच असा ‘सेक्युलर’ इंडिया भेटला. गोंड समाजाच्या या आदिवासी मुली बी.एस्सी. करत होत्या. बदलता देश जगाला दाखवायचाच असेल तर यापेक्षा दुसरं चांगलं उदाहरण सापडणार नाही असं वाटून गेलंच..‘जुना रस्ता खूप म्हातारा होऊन वारला व त्याची जागा आता एका डांबरट रस्त्याने घेतली आहे. गावकऱ्यांच्या अंगावरच्या कपड्यांप्रमाणे आता गावचे रस्तेही बदलत चाललेत’असं पु. ल. देशपांडेंनी एके ठिकाणी म्हटलंय. एनएच ४४ ने प्रवास करताना रस्त्यांचा हा डांबरटपणा जाणवत होता. रस्त्यांनी जुने अंगडेटोपडे फेकाटून रामदेवबाबांच्या पतंजलीची जीन्स घातलीय जणू. आपले रस्तेही मेकअप करून मार्केटिंगसाठी उभे आहेत असं जाणवलं. तेही कॉर्पोरेट होताहेत. गाव अन् प्रदेश बदलला की रस्त्यांचा स्वभाव बदलतो म्हणतात. तसे या राष्ट्रीय महामार्गाचे ठिकठिकाणी बदलणारे स्वभाव दिसले. त्याच्यावर गरिबी-श्रीमंती, जात-धर्म, प्रांत, बदलत्या भाषा, बदलती संस्कृती, आंतरभारती, छोटी टपरी ते मोठ्ठा मॉल, रोटी ते पराठा, सायकल ते कंटेनर, शेतकऱ्यांपासून ते अदानी-अंबानींपर्यंत सगळे भेटले. जिसको जो चाहे वो लेलो ! 

आपले रस्ते हेच आता बदलत्या इंडियाचा सर्वात मोठा डिस्प्ले बोर्ड आहेत. जाहिरातींचं सगळ्यात मोठ्ठं मार्केट या हायवेवर भेटलं. गरीब दिसून चालणार नाही. या नव्या जगासोबत इंटरनेच्या फोर-जी स्पीडनं पळावं लागेल हे हा रस्ताही आम्हाला सांगत होता. 

आजवर रस्त्याने भरपूर फिरलो. पण ही भटकंती हा देश पाहण्यासाठी होती. देश समजून घेण्यासाठी होती. पण हा बदलता देश समजून घेणं हे आव्हान आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात ‘गाय को राष्ट्रीय पशू बनाओ’ ही घोषवाक्य वाचायला मिळाली. त्याचवेळी गायी सांभाळणं परवडत नाही म्हणून हजारो गायी थेट महामार्गावर सोडून दिल्याचंही दिसलं. बेटी बचाओची हाक देणारा हरियाणा मुलींना हॉकीचं दमदार प्रशिक्षण देताना भेटला. नवा इंडिया असा घोषणा अन् विरोधाभासांनी भरलाय. 

या सगळ्या प्रवासात काश्मीरनं मनं हेलावून टाकलं. अनलिमिटेड इंडियाचे बोर्ड झळकावणारा हा देश काश्मिरात गेल्यावर नॉट रिचेबल झाला. संपूर्ण प्रवासात आमचं इंटरनेट चालू होतं. काश्मिरात गेल्यावर मात्र ते बंद पडलं. काश्मिरात हिंसाचार उसळल्याने सरकारने ते बंद केलं होतं. शंकराचार्यांच्या गावात भेटलेला सेक्युलॅरिझम अन् काश्मिरात भेटलेली ही नफरत याचा अर्थ नेमका कसा लावायचा? 

या प्रवासात दिल्लीत भेटलेल्या बिजवाडा विल्सन यांचं एक वाक्यही सतत आठवतं. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या कामाबद्दल विल्सन यांना यावर्षी मॅगसेसे अवॉर्ड मिळालं. विल्सन यांनी आम्हाला एक प्रश्न केला.. ‘भाषा क्लीन इंडियाकी चल रही है. लेकीन इस देश के जाती व्यवस्थाने कई लोगोंको सालोसाल मलीन किया है उसका क्या? वो साफसफाई कौन करेगा?’

एक नक्की...हे सारे विरोधाभास पाहतानाही एनएच ४४ हा हायवे, उम्मीद का हायवे वाटला. सुपरस्पीडने तो लोकांच्या जगण्यात स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा पोहचवतो आहे.. सोपी नाही ही वेगवान घोडदौड नुस्ती समजून घेणंही.- सुधीर लंके (लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत.)

sdudhir.lanke@lokmat.com