शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

सुश्मिता, दादागिरी आणि जिंदगी

By admin | Updated: June 3, 2016 12:25 IST

ती मिस युनिव्हर्स झाली तेव्हा आमच्यापैकी अनेकजण जन्मलेही नव्हते, मग तरी सध्या तिची यंग गॅँगला का क्रेझ वाटतेय?

गेल्या आठवडय़ात सुश्मिता सेननं इन्स्टाग्रामवर आपले ‘हॉट’ फोटो टाकत एक कॅप्शन लिहिली. तिचा सारांश असा की, मी चाळीस वर्षाची झालेय, आणि हे ‘मोठं होणं’ मी कमावलेलं आहे, आणि एक दिवस जास्त किंवा एक दिवस कमी करणं माङया वयातून हे मला मान्य नाही.
जिथं बायका वय लपवतात तिथं सुश्मितानं कसं डॅशिंग स्टेटमेण्ट केलं हे सांगायला हे रामायण मी लिहित नाहीये. कारण ते फारच टिपिकल आणि गेल्या जमान्यातलं झालं. आता काही मुली आपलं वयबिय लपवत नाही. एज इज जस्ट अ नंबर हे आमच्या पिढीनं कधीच मान्य करून टाकलं आहे. 
आणि चाळिशीची सुश्मिता काही  यंग आयकॉन नाही, की तिच्याशी आम्ही रिलेट करावं. ती मिस युनिव्हर्स झाली तेव्हा आमच्यापैकी अनेकजण जन्मालाही आले नव्हते.
22 वर्षापूर्वीची ट्रेण्डसेटर, त्यामुळे आजच्या तरुण गॅँगनं पागल व्हावं असं काही नाही. 
मग तरीही इन्स्टाग्रामच्या तिच्या (हॉट होते म्हणून नव्हे फक्त) फोटोंनी आमच्या जगात का चर्चा व्हावी?
तर त्याचं कारण एकच की, ती ‘बोल्ड’ आहे, आणि जे मनात येईल ते करते. आणि कुणालाही खुलासेबिलासे न देता ठामपणो करते. ती म्हणाली ना अलीकडेच की, ‘ज्याच्याकडे मान वर करून पाहता येईल अशी कुणी व्यक्ती, माङयापेक्षा उंच असलेली भेटली तर करीनही लग्न !’
 हे असं मान वर करून जगणं जे तिच्याकडे आहे ना, त्याचं सॉलिड अप्रूप वाटतं आम्हालाही. ना ती बोलघेवडी आहे, ना अटेन्शन सिकर, ना वाचाळपणा करते, ना अतीच ग्यान देते. ती जमलं तर तिचं काम करते नाहीतर तिच्या जगात असते.
हे असं ‘बिइंग प्रॅक्टिकल’ जास्त महत्त्वाचं वाटतं आम्हाला. कुणी आपल्या आयुष्यात नाही म्हणून रडतबिडत बसत नाही. तिनं तिचं आयुष्य स्वत:च लीड केलं, खरं तर डिक्टेट केलं.
ही अशी लाइफमधली दादागिरी आपल्याला जमली पाहिजे असं वाटतं तिच्याकडे पाहून !
तेवढं जमलं तर अजून काय पाहिजे?
 
- अल्पना परदेशी