शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सुखन - गजलगप्पांच्या प्रयोगाची एक ऑनलाइन मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 15:24 IST

लॉकडाऊनमध्ये सुखनच्या तरुण कलाकारांनी ही मैफल ऑनलाइन रंगवली. त्या ऑनलाइन मैफलीविषयी.

ठळक मुद्देसुखन हा उर्दू गजल-गायकी यावर बेतलेला लोकप्रिय कार्यक्रम.

- नचिकेत देवस्थळी, कलाकार, सुखन

1) कोरोनाकाळात ‘सुखन’चा प्रयोग नेट नाटक रूपात करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? ती प्रत्यक्षात आणण्यातली आव्हानं काय-काय होती?

यापूर्वी ऑनलाइन प्रयोग करण्याची कधी वेळच आली नव्हती. आता मात्र ती गरज निर्माण झाली. दोनेक महिने आम्ही घरातच बसून होतो. अशावेळी जी खुमखुमी असते, की काहीतरी करू या.. त्यात  रेख्ता फाउण्डेशनने आम्हाला संधी दिली. रेख्ता ही खूप मोठी संस्था आहे. पुण्यात किंवा इतर ठिकाणी लाइव्ह परफॉर्म करतानाचा माहौल ऑनलाइनमध्ये नसणार हे माहीत होतंच. टाळ्या आणि प्रेक्षकांचे जिवंत भाव असलेले चेहरेही दिसणार नव्हतेच.अर्थात, तरी या ऑनलाइन मैफलीतही प्रतिसाद येतंच होता. फक्त तो आम्ही पाहू शकत नव्हतो. साहजिकच आमचा फोकस प्रतिसादाहून प्रतिक्रियांवर अधिक होता. मात्र हा अनुभव घेऊन पाहू असा विचार करून आम्ही ते केलं. नेहमी सुखन पाहणारे जे रसिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. ऑनलाइन प्रयोगात वाद्य नव्हती.मात्र रेख्ताचा तो व्हिडिओ पाहून आम्हाला अजूनही इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर प्रतिक्रिया मिळतात. त्यावेळी  जश्ने रेख्ताच्या फेसबुक पेजवर लाइव्ह असताना वीसेक हजार लोक पाहत होते. देशासह विदेशातूनही लोकांनी प्रयोग आवर्जून पाहिला. रेख्ताने स्ट्रीमलाइन अॅप वापरलं होतं. आमचा व्यवस्थापक कुशलनं सगळी तांत्रिक बाजू व्यवस्थित हाताळली.रेख्ताचा हा प्रयोग विनामूल्य होता. मात्र नव्या बदललेल्या काळात काय करता येईल याची चर्चा आम्ही एकमेकांशी करत असतो. त्यानुसार काहीतरी करूच. आता ऑनलाइन काही प्रयोग असे सुरू झालेत की जिथं तिकीट लावून लोकांना प्रयोग दाखवले जातात. पण तरीही आर्थिक नुकसान काय पूर्ण भरून निघणार नाही. नाटक-चित्रपट अशा दोन्ही आघाडय़ांवर परिस्थिती  फारशी उत्साहजनक नाही.

2) कलावंत म्हणून ऑनलाइन माध्यमाची ताकद आणि मर्यादा काय जाणवते? या ऑनलाइन मैफलीने तसा काही अनुभव दिला का?

त्याचं कसं आहे, लाइव्ह ऑडिअन्स नसतो ही एक ठळक मर्यादा जाणवतेच. आपण अगदीच भिंतीशी बोलतोय असं फिलिंग येतं. पण फायदा असा आहे, तुम्ही जास्त ऑडिअन्सर्पयत पोहोचता. एरवी  सुखन आम्ही जश्ने रेख्तामध्ये आजवर दोन वेळा केला. पण या महोत्सवाला येणारा एक ठरावीक ऑडिअन्स आहे, त्याच्यार्पयतच आम्ही पोहोचू शकायचो. आता ऑनलाइन रिच अनेकपटींनी वाढला. हे मला खूप महत्त्वाचं वाटलं.

3) ताणतणाव, असुरक्षितता अजूनच वाढलेल्या कोरोनाकाळात कलेचं अजूनच वाढलंय का?

कलेचं औचित्य या काळात काय यावर मी अजून विचार करतोच आहे. कला जाणता-अजाणता माणसांना जरा मानसिक-भावनिक शांतता मिळवून देतेय. मात्र कलेचा, कलेच्या नावावर केल्या जाणा:या प्रयोगांचा काही वेळा अतिरेक होतोय की काय असं वाटतं. कलेचा दर्जा राखला गेला पाहिजे हे प्रत्येकानं पहावं. व्यक्त होण्यासाठी माध्यम उपलब्ध आहे तर ते तारतम्य बाळगूनच वापरावं.लोकेट होऊ न शकणारी अशी एक भीती आपण अनुभवतो आहोत. असंख्य विविध प्रकारच्या असुरक्षित भावनांचीही मिळून एक भीती तयार झालीय. अशावेळी ताण घालवण्यासाठी म्हणून कलेचं मोल खूप आहे. शकत नाही लोकेट होऊ शकत नाही अशी ही भीती आहे.कलेच्या मागे एक ठरावीक विचार मात्र असलाच पाहिजे.हा काळ सगळ्यांसाठीच अवघड, विचित्र आणि गंभीर आहे. सगळ्यांनाच सतत घरात राहणं शक्य नाही; पण ती काळाची गरजही आहे असं चित्र दिसतंय. सगळ्यांनी जमेल तसं सकारात्मक राहून संयम बाळगला पाहिजे.

***

आम्ही  सुखन  ऑनलाइन माध्यमातून केला तो  स्ट्रीमयार्ड अॅपच्या माध्यमातून. रेख्ताच्या टीमने आम्हाला हे अॅप उपलब्ध करून दिलं. ऑनलाइन प्रयोगात टीममध्ये जितके कमी लोक असतील तितकं ते सोपं पडतं. चार कलाकार या प्रयोगात होते, ओम भूतकर, नचिकेत देवस्थळी, अभिजित ढेरे आणि जयदीप वैद्य. दोघे गात होते आणि दोघं काव्यवाचन करत होते, तर परफॉर्मन्सदरम्यान एकमेकांवर ओव्हरलॅप  झालं नाही पाहिजे आणि लॅग किंवा ब्रेकही नाही आला पाहिजे हे आव्हान असतं. कारण चौघे आपापल्या घरी बसून परफॉर्म करणार होते. कुठे कुठे दोन संवादांमध्ये खूप वेळ गेला तर मजा निघून जाते कारण आवश्यक तो पंच बसण्यासाठी टायमिंगला खूप महत्त्व असतं. कोण कधी कुठल्या विंडोत दिसावं ही काळजी सतत घ्यावी लागते. वाद्य या प्रयोगात नव्हती. पण सलग तीन दिवस एकेक तास आम्ही ऑनलाइन प्रयोगासाठी तालमी केल्या. त्यातून बराच सफाईदारपणा आणि समन्वय आणू शकलो. शिवाय ऑनलाइनमध्ये लाइव्ह व्हिडिओ एडिटिंगही केलं जातं. अनेकांच्या घरी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नीट नव्हती. तो प्रश्न प्रयोगापूर्वी सोडवला.ऑनलाइन माध्यमात विविध प्रयोग करायला बराच वाव आहे. सुबक आणि वाइडविंग्ज मीडियातर्फे  ओएमटी, ऑनलाइन माझं थिएटर हा उपक्रमही आम्ही सुनील बर्वे यांच्यासोबत मिळून करतोय. त्यात ऑनलाइन स्पर्धाचं आयोजन दर वीकेण्डला केलं जातं. - कुशल खोत, व्यवस्थापक, सुखन 

मुलाखत आणि शब्दांकन- शर्मिष्टा भोसले