शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

इथं संघर्ष अटळ आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:56 IST

पुण्यात आलो. फसलो, फसवलो गेलो, पण मागे हटलो नाही.

ठळक मुद्देनवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. चांगलं-वाईट कळतं, दिसतं, अनुभवायला येतं.

- महेश रणमाळे

मी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोर्‍हाळे या छोटय़ाशा गावचा. परिस्थिती खूपच हालाखीची. जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आईबाबांसोबत गहू विकायला जायचो, नाशिकला. रस्त्यावर उभं राहून गहू विकायचो, रात्री तिथंच झोपायचो. अशा परिस्थितीत शिकलो. दहावी झालो.वडिलांना वाटायचं, मुलगा मोठा झाला. हाताशी आला. पण आईला वाटायचं मुलानं शिकावं. आपल्यासारखी वेळ त्याच्यावर यायला नको. तिनं मला अहमदनगरला मामाकडे शिकायला पाठवलं. मामाच्या गावी, हॉस्टेलवर राहून डिप्लोमा पूर्ण केला. तिथं आजीनं व मोठय़ा मामानं मला फार जीव लावला. नंतर मी लोणीला जाऊन इंजिनिअरिंग केलं. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर झालो. इकडे बहिणीच्या लग्नासाठी वडिलांना होतं ते शेतही विकावं लागलं.इंजिनिअर झाल्यावर मी पुण्यात आलो नोकरीच्या शोधात. 2008 साल. सगळीकडे जागतिक मंदीची चर्चा. खूप प्रयत्न करून एक जॉब मिळाला. पुढं लग्न झालं. बरं चाललं होतं. त्याच काळात एका मित्रानं सांगितलं तुला विदेशात नोकरी मिळवून देतो. खूप आशेला लावलं. इण्टरव्ह्यूपण अरेंज करून दिला. निवड झाली. मी हातातला जॉब सोडला. आणि मग कळलं की, तो मित्रच खोटा होता. त्यानं मला फसवलं होतं. फार वाईट वाटलं; पण पुन्हा नोकरीच्या शोधात प्रयत्न केले. वाईट दिवस असे अनुभव देऊन गेले. आता मी एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत उत्तम पदावर काम करतो. कामानिमित्त विदेश दौरापण करून आलो. आता पुण्यात स्थिरावलोय. पुण्यासारख्या शहरात आपलं घर व्हावं हे स्वप्न मनात आहे. पूर्वी एकटा होतो आता या संघर्षात माझी पत्नी अर्चना उत्तम साथ देते आहे.मी हा लेख लिहिला कारण माझा अनुभव म्हणतो की, नवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. चांगलं-वाईट कळतं, दिसतं, अनुभवायला येतं.  आपल्याला भेटणारे सगळेच लोक चांगले असतात असं नाही. त्यात आपण एका छोटय़ा खेडय़ातून आलेलो असतो. साधे असतो. त्याचा लोक फायदा घेतात. कुठलाही निर्णय घेणं ही परीक्षा आहे. आता मी एकच सांगतो, कुठलाही निर्णय मोठय़ा शहरात विचारपूर्वक घ्या. मोठय़ा शहरात कोण फसवणूक करेल सांगता येत नाही. आणि तसं झालं तरी आपण आपला संघर्ष आणि मेहनत सोडायची नाही.