शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्राइप्स : फॅशनच्या नव्या रेघा आखताय ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 13:37 IST

काळ्या-पांढर्‍या, निळ्या पट्टय़ापट्टय़ांचा, रेघांचा शर्ट पुरुषांनीच घालायचा हे कुणी ठरवलं?

ठळक मुद्देएखादा स्ट्राइप्स शर्ट, पलाझो, स्कर्ट आपल्याकडे नक्कीच असायला हरकत नाही. आपल्या उंची आणि बांध्याला शोभतील असे स्ट्राइप्स निवडून घातले तर नक्की फ्रेश लूक मिळेल.

- श्रुती साठे 

काही रंग हे स्त्रियांनीच वापरावेत तर काही प्रिण्ट्स हे पुरुषांनीच वापरावेत असा कित्येक वर्षाचा पायंडा! पण आपले बॉलिवूड स्टार, सेलिब्रिटी, नामांकित डिझायनर्स वेगवेगळे प्रयोग करून आपल्या समोर आणतात. पुरुषांनी गुलाबी रंगाचा शर्ट, टी -शर्ट वापरणं आतार्पयत टाळलं जायचं, पण हल्ली खूप पुरुष सेलिब्रिटी गुलाबी रंग वापरताना दिसतात. तीच कहाणी स्ट्राइप्सची आहे! पांढर्‍यावर काळे, निळे स्ट्राइप्स म्हणजे पुरुषांचा फॉर्मल शर्ट असं साधं सरळ समीकरण होतं! आता जेव्हा आपल्या आवडत्या तारका स्ट्राइप्समध्ये अतिशय कम्फर्टेबल दिसतात तेव्हा वाटतं  का बरं हे प्रिण्ट आपण वापरलं नाही? 

आपली मराठमोळी भूमी पेडणेकर पिन स्ट्राइप्स को-ऑर्डिनेटमध्ये अतिशय खुलून दिसली. गडद निळ्यावर पांढर्‍या पिन स्ट्राइप्स ही रंगसंगती सुरेखच दिसते. फॉर्मल जॅकेट आणि मिनी स्कर्ट हे सारख्याच प्रिण्टचे आणि त्याला कॉण्ट्रास्ट सॅण्डल्स ही रंगसंगती हटके होती.  मिस वल्र्ड मानुषी छिल्लर एका वेगळ्याच को-ऑर्डिनेटमध्ये दिसली. क्रि म आणि खाकीची रंगसंगती असलेले स्ट्राइप्स आणि त्यावर केलेली एम्ब्रॉयडरी केलेले को-ऑर्डिनेट. भारी होता लूक. फुल स्लिव्हज जॅकेट स्टाइल स्ट्राइप्स टॉप आणि त्याच रंगसंगतीची पॅण्ट हा तिनं केलेला एक प्रयोग म्हणावा लागेल. अर्थात सोशल मीडियावर लोकांनी तिच्या या लूकला फारशी पसंती दिली नाही.    इकडे श्रद्धा कपूरने स्ट्राइप्स एकदम साध्या पद्धतीने वापरून आपल्याला एक ‘डे लूक’साठीचा पर्याय दिला. पांढरा टॅँक टॉप आणि लाइट निळ्या आणि पांढर्‍या स्ट्राइप्सचा पलाझो एकदम कूल लूक देऊन गेला. पलाझोला असलेली गुडघ्यार्पयतची स्लिट आणि त्यावर वापरलेले पांढरे स्नीकर्स कॅज्युअल लूक उत्तम देतात.एखादा स्ट्राइप्स शर्ट, पलाझो, स्कर्ट आपल्याकडे नक्कीच असायला हरकत नाही. आपल्या उंची आणि बांध्याला शोभतील असे स्ट्राइप्स निवडून घातले तर नक्की फ्रेश लूक मिळेल.