शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

ढेकर आणि ठुसकुल्या?

By admin | Updated: March 26, 2015 20:34 IST

ऑफिस काय आपलंच आहे; आपलं दुसरं घरच आहे; असं म्हणत किती सैल आणि बेताल वागायचं याला काही लिमिट? ऑफिसात कुणी असं वागलं तर हसू होणारच !

मृण्मयी सावंत
 
ऑफिस काय आपलंच आहे; आपलं दुसरं घरच आहे; असं म्हणत किती सैल आणि बेताल वागायचं  याला काही लिमिट? ऑफिसात कुणी असं वागलं तर हसू होणारच !
-----
आपण मुलाखतीला जातो, आणि मार ठसक्यात सांगतो की, सर मी पूर्ण मेहनत करीन, वाट्टेल तितका वेळ ऑफिसमध्ये थांबीन. खूप काम करीन!
होतंही तसंच! नोकरी मिळाली की, १२-१२, १४-१४ तास अनेकजणांना काम करावं लागतं. काहीजण तर फक्त झोपण्यापुरते घरी जातात. पुन्हा उजाडलं की, ऑफिसात!
अशी माणसं ऑफिसात हळूहळू इतकी सरावतात की, ऑफिस हे दुसरं घरच वाटू लागतं. आपली बसायची जागा, आपला जेवण्याचा ग्रुप, आपलं वागणं हे सारं घरच्याइतकं सैलसर होतं. आपण ऑफिसात आहोत, प्रोफेशनल जगात काम करतोय याचाही अनेकांना विसर पडतो.
जे आपल्याकडे होतं तेच आता जगाच्या कुठल्याही देशात होतं. अगदी अमेरिकतेही घडतं. अलीकडेच अमेरिकन ‘टाइम यूज’ नावाचा एक सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार अमेरिकन तरुण सरासरी ऑफिसात ९ तास घालवतात. आधीच मोकळंढाकळं वातावरण. त्यामुळे एकदम सैल-सहज वावरू लागतात.
मात्र, या वागण्याचं नियंत्रण इतकं सुटतं की, आपण ऑफिसात आहोत, आपण काही गोष्टी नीट करायला हव्यात, पर्सनली आपण कसे का वागेना कार्यालयात वागण्याचे काही संकेत असतात याचंही भान या तरुणांचं सुटतं!
आणि म्हणूनच त्यांच्या कार्यालयीन वर्तनाचा अभ्यास करून त्यांना वागण्या-बोलण्याचे काही ‘बेसिक’ संकेत सांगण्यात आले आहेत. म्हणणं एवढंच की, किमान इतपत गोष्टी तरी कराच!
त्या वाचल्या की वाटतं, आपल्यासारख्या मुळातच मॅनर्स-एटीकेट्स आणि सामाजिक संकेत याबाबत घोर अज्ञानी असलेल्या समाजात तर हे सारं कुणी सांगतच नाही! म्हणून ती सूत्रं. खास आपण लक्षात ठेवण्यासाठी!
काही सूत्रं जरा विचित्र वाटतील, पण जगभरात लोक ऑफिस एटीकेट्सचा किती गांभीर्यानं विचार करतात हे त्यातून नक्की कळेल!
 
१)  नॉक. नॉक
तुमची तुमच्या बॉसशी कितीही घसट असो, सहकार्‍यांशी मैत्री असो, नॉक केल्याशिवाय, वेळ आहे का, बोलू का, विचारल्याशिवाय त्यांच्या केबिन, क्युबिकलमध्ये शिरायचं नाही. ते जर म्हणाले की, नंतर बोलू तर ते ऑदरवाइज घेत गैरसमज करून घ्यायचे नाहीत.
 
२) डब्यात काय आणलंय?
आता हा काय प्रश्न झाला? आपल्याला जे आवडतं ते आणू डब्यात असं वाटतं अनेकांना पण तसं नाही. काही पदार्थांचे वास अत्यंत उग्र येतात, काही पदार्थ ऑफिसमध्ये शिष्टसंमत नसतात. मासे, कांद्याची पात, अगदी पॉपकॉर्नसुद्धा यांचे वास उग्र असतात. एसीमध्ये ते तसेच राहतात आणि अत्यंत घाण वास सुटतो. त्यामुळे असे पदार्थ ऑफिसात आणू नयेत.
 
३) स्पिकर फोन कशाला?
अनेकांना आधीच फोनवर मोठमोठय़ानं बोलायची सवय असते. त्यात आपण काम करतोय ते थांबू नये, म्हणून काहीजण स्पिकर फोन ऑन करून बोलतात. हसतात, गप्पा मारतात, असं कशाला त्यापेक्षा सरळ हेडसेट वापरा.
 
४) बसल्या बसल्या गप्पा
 अनेकांना बसल्या जागेवरून लांब बसलेल्या सहकारी मित्रांशी गप्पा मारायच्या असतात. ते मारतातही; मात्र त्यानं बाकीच्यांना डिस्टर्ब होतं, लोक तुम्हाला उल्लू समजतात. त्यामुळे गप्पा मारायच्याच असतील तर सरळ काम सोडा, उठा, आणि जवळ जाऊन बोला.
 
५) आवाज? - किती मोठा?
हळू बोला. किती मोठय़ानं तुम्ही बोलता याचा विचार करा, कामाचं बोलत असलात तरीही हळूच बोला.
 
६) नाक खुपसे
बर्‍याच लोकांना शेजारच्याच्या कम्प्युटरमध्ये डोकवायची सवय असते. नकळतही होतं त्यांचं. ते अत्यंत अशिष्ट मानलं जातं. ते पहिले थांबवा.
 
७) तुम्हाला गॅसेस झालेत का?
हा जरा अतीच पर्सनल प्रश्न. पण झाले असतील तर उगीच ठुसकुल्या सोडून सगळ्यांना त्रास देण्यापेक्षा सरळ वॉशरूममध्ये जा. काहीतरी औषध घ्या. ढेकरं देत बसू नका, त्यापेक्षा अँसिडीटीचं औषध घ्या. ढेकर आणि ठुसकुल्या, बॅड मॅनर्स!
 
( विशेष संदर्भ-बिझर्जनल्सडॉटकॉम)