शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

एका आर्किटेक्ट तरूणीला स्वत:चा शोध घ्यायला लावणा-या प्रवासाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 06:35 IST

आर्किटेक्ट झाले,मुंबईकर होतेच त्यामुळेसमोर संधीही होत्या;पण वाटायचं, मला जीवनात नक्की काय करायचंय? आजूबाजूला इतकं काही घडत असताना मी यात कुठं आहे? त्या प्रश्नांची उत्तरं हाच आता एक ‘शोध’ आहे !

-- जयश्री  कुलकर्णी 

आर्किटेक्ट झाले. मूळची मुंबईकर. त्यामुळे संधी भरपूर दिसत होत्या. मला आठवतंय जेव्हा लहानपणी घरी पाहुणे यायचे, तेव्हा एक टिपिकल प्रश्न विचारतात. मोठं झाल्यावर कोण होणार? मीही ठरलेली उत्तरं द्यायचे. पैसा, सुरक्षितता, सुबत्ता, प्रतिष्ठा हे सारं त्याला जोडलेलं असतंच. ते मनातही ठसत जातं.   

त्या प्रवासात मीही होतेच. मात्र पदवीच्या दुस-या वर्षाला असताना हुडकोच्या स्पर्धेत मी भाग घेतला होता. त्यासाठी  ‘नाइट शेल्टर फॉर होमलेस’ या विषयावर डिझाइन करायचं होतं. यादरम्यान आम्ही -याच साइट्स बघितल्या. मुंबईमध्ये तर बेघरांची संख्या प्रचंड. अशाच एका क्षेत्रभेटीला रात्री एकदीडच्या सुमारास साइट डॉक्युमेण्टेशनसाठी काळबादेवी भागात गेलो होतो. मेनरोडवरून एका गल्लीत शिरलो, बाजारगल्ली होती बहुतेक, अगदीच अरुंद! आणि तिथे असलेलं दृश्य पाहून अंगावर काटाच आला सर्रकन! रस्त्याच्या दोन्ही बाजूला अंधार्‍या रात्नी उघड्यावर, बोच-या थंडीत अक्षरश: प्रेतं ठेवल्यासारखी एकमेकाला चिकटून माणसं झोपली होती. इंचभरही जागा नव्हती. मला क्षणात माझ्या अंगावर असलेल्या स्वेटरचं ओझं वाटू लागलं. चार भिंतींच्या सुरक्षित वातावरणाच्या पलीकडे असं काहीतरी मी पहिल्यांदा पाहत होते. थंडीत अंगावर गरम कपडे नाहीत, डोक्यावर छप्पर नाही, पैशासाठी आपलं गाव, कुटुंब, आपल्या शेतजमिनी सोडून आलेले असंख्य गोरगरीब मुंबई शहरात होते, पण मलाच ते कधी दिसले नव्हते.‘झोपडपट्टी पुनर्विकास’साठी डिझाइन ब्रीफ करत असताना ‘बेरहमपाडा’ला साइट होती. तिथलं चित्नही थक्क करणारं होतं. रस्त्यांची रुंदी म्हणजे दोन माणसं जाऊ शकतील इतकी! दोन घरांमध्ये एका हाताएवढंही अंतर नाही. घराला एक खिडकी नाही; जिथे श्वास घेता येणार नाही अशा ठिकाणी 10-12 माणसं कोंबून भरलेली. जिथं दोन मिनिटं उभं राहून गुदमरायला होईल, अशा खोलीत ही माणसं आख्खं आयुष्य काढतात. एकीकडे आठ लेन, 16 लेनचे महामार्ग, उंचच उंच अपार्टमेंट्स आणि दुसरीकडे हे असं चित्र.

 

आपल्या समाजात काही अंतरावरच असलेल्या या विरोधाभासानं काही गंभीर प्रश्न मनात निर्माण केले. जीवनाकडे बघण्याच्या माझ्या ‘कल्पनां’ना जबरदस्त हादरा बसला.ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इंटर्नशिपसाठी कोल्हापूरला शिरीष वारी यांच्याकडे गेले होते. मुंबईत ‘एक्स्पोजर’ होतं, हातात डिग्री होती, कामाचा पुरेसा अनुभव मिळाला होता, पण काहीतरी कमी आहे असं नेहमी वाटत राहायचं. मनात प्रश्न यायचे की मला जीवनात नक्की काय करायचंय?  आजूबाजूला इतकं काही घडत असताना मी यात कुठे बसते? या प्रश्नांचं समाधान झाल्याशिवाय मी पुढे काय करणार याचं उत्तर मिळणार नव्हतं. शिरीष काकांनी तेव्हा मला ‘निर्माण’बद्दल सांगितलं. काही दिवसांनी डॉ. अभय बंग स्वत: रुईया कॉलेजला भाषणासाठी येणार होते. त्यांचं ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ हे पुस्तकही त्याच काळात वाचलेलं. त्यातून मी निर्माण शिबिरात आले. तिथं ब-याच प्रश्नांची उकल झाली, काही नव्याने प्रश्न पडले. सामाजिक समस्यांची कारणमिमांसा आणि गोष्टींकडे एका व्यापक दृष्टीतून बघू लागले. 

‘निर्माण’ शिबिरातून गेल्यानंतर मला  वयम’ या संस्थेविषयी माहिती मिळाली. ‘पुढे काय काम करू?’ हा प्रश्न दत्त बनून पुढे उभाच होता. म्हणून पुढील एक वर्ष मी ‘वयम’ संस्थेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ‘निर्माण’ने मला फेलोशिपही दिली - ‘कर के देखो’ फेलोशिप! मग त्यासाठी मी काम करायला जव्हारला गेले. जव्हारमधील अतिदुर्गम ‘खरपडपाडा’ गावातील ग्रामसभा. ग्रामसभेसाठी जायचं होतं. गावाला जायचा रस्ता कच्चा आणि  खड्डेच खड्डे. जाताना मध्ये एक नदी ओलांडून जावं लागतं. आम्ही डोंगर उतरलो, नदीकिनारी पोहोचलो तेव्हा गणपतदादा आमची वाटच पाहत होते. तिथेच नदी पार करण्यासाठी उघड्यावर कपडे बदलले. नदीला जोर होता. गणपतदादाने दोन जाडजूड काठय़ा बरोबर आणल्या होत्या. एक काठी एकमेकांच्या आधाराला आणि एक काठी पाण्यात स्वत:चा तोल सांभाळायला. मध्यापर्यंत आलो तेव्हा मी पाण्यात डोकं घालून डुबकी दिली. वर पाहिलं तर चारही बाजूने गर्द डोंगर, वर ‘अंबर की गेहेरी खाई’!एकमेकांना धरत धरत काठापर्यंत पोहोचलो. कपडे बदलले आणि  पुन्हा गावात जाण्यासाठी डोंगर चढायला लागलो. गाव अगदीच लहान 16  घरांचं. सगळेजण जमेपर्यंत गाव फिरत बसलो. गणपतदादांच्या घरीच ग्रामसभा होणार होती. गावातील म्हातारी, लहान, तरु ण अशी सर्व मंडळी जमली. एकमेकांना धरून अजिबात आवाजाची चढाओढ न करता सगळेजण शांतपणे आपली मतं मांडत होती. सगळंच अगदी सुसंगत आणि व्यवस्थित. सभा झाल्यावर प्रोसिडिंग लिहिली. सगळेजण ग्रामसभा होईपर्यंत थांबले होते. ग्रामसभा झाल्यावर लगेच ग्रामसभा कार्यालयाचा बॅनर लावायला घेतला. त्यात दुमत झालं, पण लगेचच तिढा सुटला. इतकी चटपटी वृत्ती, कामाबद्दल, गावाबद्दल आस्था मी यापूर्वी कुठल्याच गावामध्ये पाहिली नव्हती. लोकांवर कसलीच अनैसर्गिकतेची झालर नव्हती. ग्रामसभा कार्यालयाचा बॅनर लावायच्या वेळेस मी त्यांच्याच बरोबर थांबले होते. ‘लोकशाही’, ‘चळवळ’, ‘स्वशासन’ हे शब्द आत्तापर्यंत फक्त वाचलेले, ऐकलेले होते. पण त्यांचा सार त्यादिवशी, त्याक्षणी अनुभवला. गाव म्हणून एकत्न काम करण्याची प्रेरणा आणि चळवळीची ऊर्जा हे त्या दिवशीच्या  खरपडपाडा  ग्रामसभेत ठसठसून दिसत होत. मी त्यांचाच एक भाग बनले होते. माझ्यासाठी तो दिवस अनेक अर्थांनी क्रांतिकारी होता.हे सारं एरव्ही मला कुठं आणि कसं कळलं असतं?

 

 

गरजेपेक्षा कोण जास्त कशाला घेईल?एक दिवस ‘डोयापाडा’ या विक्र मगड तालुक्यातल्या गावामध्ये शहरातली काही तरुण गावाचं जंगल व्यवस्थापन, गावाचं नेतृत्व पाहायला अभ्यास दौर्‍यावर आली होती. कृष्णादादा गावाच्या संयुक्त वनव्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष होते. जंगल फिरत असताना त्यांना ओहोळ लागला. त्यात मुडा (मासे पकडण्यासाठी ठेवलेला सापळा) होता. कृष्णादादा सांगत होता, ‘‘या मुड्यात मासे अडकतात. रात्रभर ठेवला की दुस-या दिवशी मासे घेऊन जायचे’’. तरु ण मंडळींनी विचारलं, ‘‘अरे मग रात्री कोणी चोरले तर मासे?’’ हे ऐकून कृष्णादादाला हसूच फुटलं. तो म्हणाला ‘‘कोण कशाला चोरेल? आणि कोणी घेतलेच तर जेवढे लागतील तेवढेच घेऊन जाईल’’. गरजेपेक्षा जास्त घेऊ नये हे कुठल्या पुस्तकातून ही माणसं शिकली असतील? याचं उत्तर कुठल्या पुस्तकात नसून निसर्गातच आहे. हे लोक निसर्गाशी इतके एकरूप आहेत की स्वत:चीच काय चोरी करायची? असा विचार करत असतील. त्यादिवशी कोणीतरी गालफडात मारल्यासारखं वाटलं.

‘बिन बुका, या शिका’

मुलांच्या शिक्षणासाठी नवीन पद्धत वापरावी म्हणून  ‘बिन बुका, या शिका’ हा उपक्र म सुरु  झाला. त्याचे एक केंद्र आम्ही ‘धिडपाड्या’तल्या मुलांसाठी सुरू केलं. तिथल्या मुलांचं आणि माझं नातं अत्यंत खेळीमेळीचं. ‘बिन बुका, या शिका’चं स्वरूपसुद्धा बर्‍याच अंशी अनौपचारिकच होतं. सात महिने हे केंद्र चाललं; नंतर मुलं अनियमित व्हायला लागली. कंटाळा करायला लागली आणि एक दिवस मुलांनीच स्वत:हून सांगितलं, ‘ताई आपण थांबूया’. मला प्रचंड वाईट वाटलं, खूप त्रास झाला. पण त्यानंतर मी या झालेल्या घटनेकडे माझ्या वाटण्यापलीकडे जाऊन तटस्थपणे पाहू लागले. याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रश्न मीच स्वत:ला विचारले:‘या उपक्र माची गरज काय? मुलांना त्याची गरज वाटते का? मुलांची गरज मी कशी ओळखावी? त्यांना कशा प्रकारचं शिक्षण द्यावं? मला त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल? मुलं एखादी गोष्ट कशी शिकतात? शिक्षण म्हणजे काय? ते कसं घडतं? मी मुलांच्या भूमिकेतून पाहू शकते का?’या सर्व प्रश्नांचा शोध मी सध्या घेत आहे.

( निर्माण 7 )