शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

Sorry, wrong post

By admin | Updated: July 9, 2015 19:36 IST

‘माफ कर, चुकून टाकली ही पोस्ट’ असं म्हणणारा एक नवा ट्रेण्ड व्यक्तिगत आयुष्यात मनस्ताप, बदनामी आणि तडफड घेऊन आलाय!

 - निशांत महाजन

 
‘माफ कर, चुकून टाकली ही पोस्ट’ असं म्हणणारा एक नवा ट्रेण्ड 
व्यक्तिगत आयुष्यात मनस्ताप, बदनामी आणि तडफड घेऊन आलाय!
‘सॉरी, मला विसरून जा. यापुढे तुझा माझा काही संबंध नाही.’’ 
लगA ठरलेल्या त्याला भावी बायकोकडून असा मेसेज येतो. चक्कर येऊन तो पडणार, तेवढय़ात दुसरा मेसेज येतो.
‘सॉरी, इग्नोर, चुकून पाठवला तुला!’
आणि मग ‘तो’ डायरेक्ट हार्टअॅटॅकनेच जमिनीवर कोसळतो!
***
असा फॉरवर्ड मेसेज तुम्हाला आला असेलच, पीजे म्हणून हसत तुम्ही तो फॉरवर्डही केला असेल!
पण हे करताना तुमच्या एक गोष्ट लक्षातही आली नसेल की, आपण एका मोठय़ा ट्रेण्डचा भाग होतो आहे. त्या ट्रेण्डचं नाव आहे. ‘सॉरी, रॉँग पोस्ट’ किंवा ‘सॉरी, चुकून पोस्ट झालं!’
खरं सांगायचं तर ‘सॉरी’ म्हणत माफी मागत झाला किस्सा विसरून जाण्यार्पयत जेव्हा असतं ना मॅटर तोर्पयत गोष्टी सोप्या असतात.
पण सगळ्यांच्याच बाबतीत असं घडत नाही आणि मग ते ठरतात सोशल मीडियावरच्या नव्या बुलिंगचे बळी. त्याचं नाव आहे, ‘सॉरी, रॉँग पोस्ट’!
- सोशल बुलिंग हा एक शब्दप्रयोग तुमच्या कानावरून एव्हाना गेला असेलच.
त्याचा सोपा अर्थ म्हणजे सोशल मीडियावर केलं जाणारं रॅगिंग.
कॉलेजच्या रॅगिंगमधे प्रत्यक्ष रॅगिंग व्हायचं आता ते ऑनलाइन होतं. आणि इतकं होतं की, तुमची एक रॉँग पोस्ट तुमचं जगणं नको करू शकते!
***
सध्या हे सोशल मीडिया बुलिंग जोरात आहे. अनेकजण या बुलिंगचे शिकार होतात. काही ग्रुप व्हॉट्स अॅप, फेसबुकवर ठरवून एखाद्याला टार्गेट करतात. चेष्टा-टवाळी-टिंगल सुरूच असते. ती अनेकदा भांडणतंटे, वाद, मानापमान इथून थेट माफी मागण्यार्पयत आणि ऑनलाइन नाक घासण्यार्पयत जाऊन पोहचते.
हे सारं होतं कारण आपण ऑनलाइन काय पोस्ट करतो आहोत आणि इतरांना काय थरार्पयत जाऊन स्वत:वर कॉमेण्ट करण्याची, आपल्या आयुष्यात घुसण्याची संधी देतोय इथवर सुरू राहतं.
***
अनेकदा ही सुरुवात होते रॉँग पोस्टवरून. बरेच जण व्हॉट्स अॅपवर गमतीगमतीत हा ट्रेण्ड स्वत:च्याही नकळत सुरू करतात. म्हणजे काय तर पाचकळ-अश्लील फॉरवर्ड एखाद्या ग्रुपवर टाकायचा. आणि पुढच्याच मेसेजमधे एक डोळा मारण्याचा इमोजी टाकून म्हणायचं की, सॉरी रॉँग ग्रुप.
मग त्यावर चर्चा होते. सगळं अगदी यथेच्छ पातळी सोडून बोललं जातं.
आणि मग पुन्हा दुसरा कुणीतरी तसलीच पोस्ट टाकून, सॉरी रॉँग पोस्ट किंवा रॉँग ग्रुप म्हणून मोकळा होतो.
या सा:याची गंमत बाकीचे पाहतात.
मात्र पुढे पुढे त्यातून भांडणं, बदनामी, एकमेकांचे मेसेज परस्परांना कॉपीपेस्ट करून पाठवणं सुरू होतं आणि मग अकारण मनस्ताप वाटय़ाला येतो.
***
काहीजण तर आपलं सारं आयुष्यच चव्हाटय़ावर मांडायला निघतात. आपण जगतो तो प्रत्येक क्षण इतरांशी शेअर करतात. अगदी हनिमूनला गेलेले असतानाचे फोटोही शेअर करणारे हुश्शार काही कमी नाहीत.
स्वत:च्या व्यक्तिगत जगण्याची माहिती, फोटो टाकून काहीजण अटेन्शन मिळवण्याचा, चर्चेत राहण्याचा, आपलं आयुष्य किती हॅपनिंग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात हे खरं आहे;
मात्र अनेकदा त्या फोटोंचा गैरवापर होतो, जे आपल्याला म्हणायचंच नसतं, ते अर्थ काढून लोक मोकळे होतात.
आपल्या जगण्याची जाहीर चिरफाड होते. फुकट सल्ले मिळतात.
आणि मग शेवटी आपण का टाकली ही पोस्ट, हा फोटो असं वाटून पस्तावायला होतं. तोर्पयत सॉरी रॉँग पोस्ट म्हणायची वेळही निघून गेलेली असते.
***
हा रॉँग पोस्ट म्हण्याचा ट्रेण्ड सध्या इतका तेजीत आहे की सोशल मीडियावरचा वर्तन अभ्यास करणारे अनेकजण तर लोक कितीवेळा ‘रॉँग पोस्ट’ म्हणत आहेत याचा अभ्यास करतात. त्यातून माणसांची मानसिकता, त्यांच्यावर येणारा ताण, त्यांचं खुलेपण आणि त्यांच्या मानापमानाची नवी व्याख्या शोधली जाते आहे.
***
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, चुकून पोस्ट झालं म्हणता म्हणता अनेकदा ते व्हायरलही होतं आणि मग निव्वळ बदनामी आणि मनस्ताप वाटय़ाला येतो. त्यामुळे सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट टाकताना यासंदर्भात आपल्याला ‘सॉरी, रॉँग पोस्ट’ असं तर म्हणावं लागणार नाही ना, पस्तावा तर होणार नाही ना, याचा विचार केलेला बरा!