शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच म्हणतं, 18 पूण्रे होण्यापूर्वी करा लग्न.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:41 IST

सोमालियन मुलींचा बळी

ठळक मुद्देयूएनचा अहवाल सांगतो की, सोमाली मुलींवर सशस्र गट हल्ले करतात

- कलीम अजीम

सोमालियात नव्या वादग्रस्त कायद्यामुळे दोन गट पडले आहेत. मुलीच्या लग्नाचं वय कमी करण्यासंबंधीचा हा कायदा आहे. युनिसेफच्या आकडेवारीनुसार बालविवाहाच्या बाबतीत हा देश जगभरात दहाव्या क्र मांकावर आहे. अशा स्थितीत मुलीच्या लग्नाचं वय अधिकृतरीत्या कमी केल्याने नव्या व गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.ऑगस्टमध्ये सोमाली संसदेने एक वादग्रस्त विधेयक मांडले.  सेक्सयुअल इंटरकोर्स रिलेटेड क्र ाइम बिल असं याचं नाव. विधेयक म्हणतेय, 18 वर्षाच्या खालील मुलींचा विवाह आता गुन्हा मानला जाणार नाही.मुलीला पाळी आली की आता पालक तिचं लग्न लावून टाकतात. त्यातून त्रस वाढतो, मात्र आता सरकारच या विवाहांना मान्यता देते आहे.विशेष म्हणजे सोमालिया देशाने 2क्14 साली एका चार्टरवर सह्या केल्या आहेत, ज्याद्वारे त्याला 2क्2क् र्पयत बालविवाहांची संख्या कमी करायची आहे.यासंदर्भात समाजसेवी संघटना, संस्था व सरकार दरबारी प्रयत्न सुरू असताना हे विधेयक आणले गेले आहे.विधेयकाचं समर्थन करत सरकारी पक्ष म्हणतो, नव्या कायद्यामुळे देशातील महिलांविरोधातले लैंगिक गुन्हे कमी होतील. कमी वयात मुलींचं लग्न केल्यास त्या सुरक्षित राहतील.महिला संघटना आणि युवकांनी सरकारचा विरोध करत विधेयक मागे घेण्यासाठी मोहीम राबवली आहे.मीडिया रिपोर्टचा आधार घेतल्यास असं दिसतं की इथं अजूनही प्राचीन टोळी समुदायातली मध्ययुगीन मानसिकतेचं वर्चस्व आहे. मुलीचं लवकर लग्न करणो सोमाली संस्कृतीचा भाग आहे. सोमाली देशात एक म्हण प्रसिद्ध आहे, तिचा अर्थ असा होतो की, मुलीनं एकतर लग्न केलं पाहिजे किंवा कबरीत गेलं पाहिजे.

आणि मुलींना लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागू नये, ज्यांचं प्रमाण मोठं आहे, म्हणून पालकही मुलींचं लग्न लावून टाकतात.यूएनचा अहवाल सांगतो की, सोमाली मुलींवर सशस्र गट हल्ले करतात. त्यांना लढाऊ मुलांशी लग्न करण्यास भाग पाडले जाते. सक्तीच्या लग्नाच्या भीतीने अनेक शरणार्थी कुटुंबांनी सोमालिया सोडल्याची आकडेवारी प्रकाशित झाली आहे.

( कलीम मुक्त पत्रकार आहे.)