शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

सोलापूर ते मुंबई व्हाया बिंधास उद्योग

By admin | Updated: July 3, 2014 18:30 IST

वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या, वादविवादाचे स्टेज हादरवलं, कॉलेज रिपोर्टर म्हणून काम केलं कॉलेजातलं इलेक्शन लढवलं,एनएसएसचे कॅम्प जागवले, शासकीय शाळांत शिकवलं आणि सायकल दामटत सगळं शहरं पिंजून काढलं.म्हणून तर कळलं जग नेमकं कसं चालतं-बोलतं ते.

- कॉलेजातल्या ‘उद्योगांनी’ काय शिकवलं?
 
सोलापूर सोडून आता जवळपास आठ वर्षं होत आली..विचार केला की  वाटतं, बापरे आठ वर्षं! पण इलेक्ट्रॉनिक मीडियासारख्या धावपळीच्या क्षेत्नात असल्यानं वेळ पटापट कसा गेला ते कळलंही नाही. अधूनमधून सोलापूरला जाणं होतं तेव्हा सात रस्त्याच्या चौकातली ती ऐसपैस दगडी इमारत पाहिली की एकदम बरं वाटतं, सोबत कुणी असलं की, मी त्या व्यक्तीलाही आवर्जून सांगते, हे माझं कॉलेज, इथं शिकले मी (मग भले त्या माणसाला इंटरेस्ट असो की नसो!)
कॉलेजची पाच वर्षं आठवतात तसे त्या पाच वर्षांत केलेले ‘उद्योग’ही आठवतात. वक्तृत्व स्पर्धांपासून ते निवडणूक लढवण्यापर्यंत आणि युथ फेस्टिव्हलच्या धिंगाण्यापासून ते सिनिअर्सना न बोलता दिलेल्या खुन्नसपर्यंत! पहिली दोन वर्षं तर कॉलेज काय असतं हेच जाणून घेण्यात गेली. पण याच तीन वर्षांत खर्‍या अर्थानं मला राज्यशास्त्न आणि समाजशास्त्नाची गोडी लागली. लोकशाही व्यवस्थेचं महत्त्व कळलं, आंबेडकरांचं मोठेपण कळायला लागण्याची सुरु वातही याच वर्षांमध्ये झाली. याचदरम्यान मी तेव्हाच्या  युवा सकाळ  साठी रिपोर्टिंंग सुरू केलं. सगळ्य़ांना बोलतं करणं थोडं- थोडं जमायला लागलं, लिहिण्याचा सराव सुरू झाला.
पण आम्ही खर्‍या अर्थानं मजा केली ती सिनिअर कॉलेजच्या तीन वर्षांत! त्याच वर्षात मस्त ग्रुप जमला, एकत्न फिरणं आणि कॉलेजला वाहून घेणं सुरू झालं. त्यातला सगळ्य़ात महत्त्वाचा टप्पा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस). माझ्या मते  ग्रामीण भाग काय असतो, तळागाळाच्या समस्या काय असतात हे समजून घ्यायचं असेल तर शहरी मुलांसाठी यापेक्षा दुसरा कुठलाच चांगला उपक्र म नसावा. आम्ही खर्‍या अर्थानं एनएसएस गाजवलं. गावभर हिंडून प्रभातफेर्‍या काढणं, न लाजता बेंबीच्या देठापासून ओरडत घोषणा देणं, श्रमदानात गाणी म्हणत म्हणत मातीची घमेली उचलणं, रस्ते झाडणं, असे सगळे उद्योग अगदी मनापासून केले. त्याचा परिणाम म्हणून एनएसएसचं नेतृत्व माझ्याकडे आलं. एनएसएसच्या दोन वर्षांंनी खूप समृद्ध केलं. दरवर्षी आमचा आडगावात १0 दिवसांचा कॅम्प असायचा. तिथंही जनजागृतीसाठी प्रभातफेर्‍या, पथनाट्य करणं, गाणी, श्रमदान आणि एकत्न स्वयंपाक असं सगळं चालू असायचं. १0 दिवस तिथंच राहून गावगाडा बघता यायचा, लोकांच्या अंधश्रद्धा, गरिबी काय असते हे दिसलं, मुलगाच हवा हा हट्ट किती टोकाचा असतो हे लक्षात यायला लागलं. अजूनही दलितांची वस्ती वेगळीच असते हेही जाणवलं. पण त्याचबरोबर त्या गरीब माणसांचा पाहुणचार, आदरातिथ्य हे सारं अनुभवूनही भारावून जायलाही झालं. या गावामध्ये मला गाडगेबाबांना मानणारे, दररोज फुकटात गाव झाडून देणारे हरितात्या भेटले, शिकणार्‍या पोरी म्हणून कौतुकानं जास्त साखरेचा चहा देणार्‍या खूप मावश्या भेटल्या..
त्या कॅम्पमधली सकाळ खूप सुंदर असायची. पहाटे उठायचं, चांदण्यांनी लगडलेलं आभाळ, थंडगार वारा, सर्वधर्मीय प्रार्थना आणि व्यायाम. तेव्हाच्या आदर्श रोमॅण्टिसिझमची ती शेवटची प्रार्थना 
साथ में खाए, साथ में सोए
साथ करे हम अच्छे काम 
जब तक सबका भला न होगा 
नही करेंगे हम आराम 
नंतर माझी एनएसएसच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठीही निवड झाली. त्या १0 दिवसांत आम्ही दिल्लीत महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. या शिबिरात भारताच्या वेगवेगळ्य़ा राज्यातून मुलं आली होती. या सगळ्य़ांशी इतकी चांगली मैत्री झालीये की, आज १0 वर्षांंनंतरही त्यातले आम्ही काही जण व्हॉट्स अँपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहोत.
याच दरम्यान मी न्यूजपेपर इन एज्युकेशन या उपक्रमातही काम करत होते. आठवड्यातून एक तास शहरातल्या गरीब भागातल्या शाळांमध्ये शिकवायचं असा तो उपक्रम. त्यात व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी आणि गणिताची भीती घालवणं, ओरिगामी, नागरिक म्हणून असलेले हक्क अधिकार, स्त्नी-पुरुष समानता असे अनेक विषय असायचे. यातून ६0 मुलांनी भरलेल्या वर्गाला नियंत्नणात ठेवणं म्हणजे काही खायचं काम नसतं हे कळलं, पण नंतर जमायला लागलं. पोरं अगदी आतुरतेनं त्या तासाची वाट बघायचे, कॉलेज संपवून सायकल मारत मी दूरच्या भागातील त्या शाळेत शिकवायला जायचे. मुलांशी मस्त गट्टी झाली होती.
त्याशिवाय दुसरीकडे मी आणि माझी मैत्नीण प्रियांका बडवे एकही वक्तृत्व, निबंध आणि वादविवाद स्पर्धा सोडायचो नाहीत. किंबहुना आम्ही स्पर्धेत असलो की बाकीच्यांना खात्नी असायची आपलं किमान एक बक्षीस हुकलं. स्पर्धेची तयारीही जोरदार व्हायची. वाचन, नोट्स काढणं, प्राध्यापकांना पिडणं. आमचे ऋतुराज बुवा सर आणि गीतांजली जोशी मॅडम मात्न न कंटाळता मार्गदर्शन करायच्या. आमची इतकी गट्टी जमली की जोशीमॅडमच्या तर आम्ही कुटुंबातलेच बनून गेलो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी विद्यापीठ प्रतिनिधी पदाची निवडणूक लढवण्याची खुमखुमी आली. झालं असं की युथ फेस्टिव्हलमध्ये बाकीचे युआर पैसे खातात किंवा नको तितका पैसा उधळला जातो, अशी मला शंका यायची. मग सिस्टीम बदलनी है, तो आओ, खुद उतरो और सिस्टीम बदलो वगैरे डोक्यात होतं. मग झालं, लढवली निवडणूक- प्रचार, सगळ्य़ांना भेटणं, मत देण्याची विनंती करणं वगैरे दोस्त लोकांच्या मदतीनं पार पाडलं. आणि मग निवडणूक जिंकली, मग ती इडली-डोसा आणि कॉफीची पार्टी, युथ फेस्टिव्हल ची रात्नी ९-१0 वाजेपर्यंंत कॉलेजात थांबून तयारी असं सगळं शिस्तीत पार पाडलं. भरपूर बक्षिसं जिंकून आणली, ठरवल्याप्रमाणे प्रत्येक रुपया  प्रामाणिकपणे वापरला. तेव्हा यु आर म्हणून विद्यापीठाकडून मिळालेला ब्लेझर अजून माझ्या घरच्या कपाटात आहे आणि तो पाहिला की सगळं आठवतं.
त्यानंतर पुण्यात पत्नकारितेसाठी दाखल झाले. शिकायचं तर रानडेलाच असं पूर्वीच ठरवलेलं. किंवा या सगळ्य़ाचा एकत्रित परिणाम म्हणून मी पत्नकारितेत आले म्हणा किंवा पत्नकारितेत यायचा निर्णय घेतल्यानं या सगळ्य़ा अनुभवाचा खूप उपयोग झाला असं म्हणा. मुळात या सगळ्य़ा गोष्टींची आवड असणं हीच पत्नकारितेची मुख्य अट असते. त्यात वाचनामुळे पाया पक्का झालेला, हात लिहिता होताच त्याचा फायदा झाला,  बोलण्याची, बोलतं करण्याची कला अवगत झाल्यानं पत्रकारितेच्या क्षेत्रात पाय रोवणं सोपं झालं. प्रत्येक कामातून, प्रत्येक नोकरीतून शिकत राहायचं हे ठरवलेलं असल्यानं कामात आजही मजा येतेय. पण हे मजेत सगळ्या अनुभवांना भिडणं शिकवलं ते कॉलेजच्या काळातल्या ‘उद्योगां’नीच.!
 
- स्नेहल बनसोडे (अभ्यासू पत्रकार असलेली स्नेहल,‘आयबीएन लोकमत’ वृत्तवाहिनीमध्ये  असिस्टण्ट एडिटर आहे.)