शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला गोड बोलता येत नाही? - मग करिअर खल्लास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:17 IST

आपलं काम हसतमुख चेहर्‍यानं, प्रेमानं करणं हे स्किल आहे, दुसर्‍याच्या भावना समजणं हे तर उत्तम कौशल्यच. ते नसेल तर नुस्त्या हुशारीला काय अर्थ?

ठळक मुद्देआयक्यूपेक्षा इक्यू मोजणं अवघड असेल, पण इक्यूचं महत्त्व वाढत आहे हे मोजणं अवघड नाही!!

डॉ. भुषण केळकर 

प्रॉजेक्ट ऑक्सिजन आणि नंतर प्रॉजेक्ट अ‍ॅरिस्टॉटलमध्ये आपण बघितलं की मानवी भावभावना समजणं आणि समवेदना (एम्पथी) असणं ही अत्यंत महत्त्वाची सॉफ्ट स्किल्स आहेत. कालच त्याची तोंडओळख झाली इकडे लंडनला आल्यावर!अमेरिका दौरा आटपून भारतात परतण्यापूर्वी काल लंडनला काही कामानिमित्त उतरलो आणि तेथील सुप्रसिद्ध टय़ूब म्हणजे अण्डरग्राउण्ड रेल्वेमधून 2 जड बॅग्ज घेऊन जायच्या होत्या. एका माणसाला अवघड होतं; पण माझ्याबरोबरच्या असणार्‍या एका मित्राला तिकीट नसताना प्लॅटफॉर्मर्पयत तिथल्या सुरक्षारक्षकाने येऊ दिलं आणि त्याला थँक्स म्हटल्यावर त्याचं उत्तर होतं की ‘त्यात काय विशेष, माझं कामच तुमचा प्रवास सुकर करण्याचं आहे’!गोष्ट छोटी आहे, पण मला वाटून गेलं की आपल्या देशाच्या इतिहासातला दुर्दैवी परकीय सत्तेचा कालखंड असला तरीही, ‘गोरा साहेब’ भारतावरच नाही तर जगावर राज्य करून गेला कारण बहुदा युद्ध साहित्याच्या हार्ड स्किल्सबरोबर, जाऊ तिथल्या जनतेची नस ओळखून त्याची बलस्थान अन् कमतरता ओळखून बरोबर सॉफ्ट स्किल्स वापरू शकला! आपल्याला असल्या कुठल्याही कृष्णकृत्यासाठी नको असली तरीही सॉफ्ट स्किल्स मात्र हवी आहेत, बरं का! असो!पुढे लेस्टर या गावी गेलो होतो. माझी एक मैत्रीण तिथे डॉक्टर आहे. तिनं सांगितलं की, 10-15 वर्षापूर्वी तेथील हॉस्पिटल्समध्ये दरवर्षी एकूण 20 मॉडय़ूल शिकवली जायची. त्यात 17 मॉडय़ूल ही वैद्यकीय ज्ञानाची आणि 3 ही सॉफ्ट स्किल्सची असायची. आता मात्र 15 सॉफ्ट स्किल्स आणि 5 ही वैद्यकीय ज्ञानाची आहेत!! त्यापुढे जाऊन तिनं जे सांगितलं त्यानं मी थक्क झालो.ती म्हणाली की नवीन डॉक्टर्स घेतले जाताना तेथील एनएचएस (नॅशनल हेल्थ सव्र्हिस) म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय सेवा या देशपातळीवरील व्यवस्थेत, तुमचे वैद्यकीय ज्ञान उत्तमच लागतं; परंतु जर नवीन डॉक्टरकडे इम्पॅथी नसेल वा कमी असेल तर त्यांना 1 वर्ष प्रोबेशनवर ठेवलं जातं.हे अमेरिका, इंग्लंडमध्ये घडतंय असं समजू नका! काही महिन्यांपूर्वी मी वाचलं होतं की ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल इंडिया’ थेट एमडी मधुसूदन गोपालन यांनी सांगितलं होतं की, विशेषतर्‍ कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत ज्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो त्यांना एम्पथी व इक्यू (भावनांक) कमी असेल तर त्यांचे मत ग्राह्य धरले जात नाही!या एम्पॅथी (समवेदना) व भावनांक या दोन गोष्टींबरोबरच, इंडियन हॉटेल्स, कंपनीमध्ये विनम्रता, मानवी मूल्यांची जाणीव असणे ही दोन सॉफ्ट स्किल्स पण महत्त्वाची आहेत, असं नमूद करण्यात आलंय.पूर्वी जे जीवघेणी स्पर्धा, एकमेकांच्यावर कुरघोडी करून सत्तासोपान चढण्याची अहमहमिका व इतरांना कमी लेखून जिंकण्याची ईर्षा हे अत्यंत आवश्यक समजलं जायचं; तिथंच आता सहकार्य याला अधिक महत्त्व येतय!ज्या गोष्टीला पूर्वी रुक्ष कॉर्पोरेट जगतात स्थान नगण्य होतं त्या म्हणजेच विनोदबुद्धी असण्याचंही महत्त्व वाढतं आहे!!2018-19 या वर्षात काही ज्या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये 110 लीडर्स निवडून गेले त्यात 70 टक्केमध्ये विनोदबुद्धी असणे, विनम्रता असणे आणि भावनांक चांगला असणे हे अत्यावश्यक होते, असा एक अहवाल सांगतो!या सगळ्यावरून हे नक्की सांगता येतं की आयक्यूपेक्षा इक्यू मोजणं अवघड असेल, पण इक्यूचं महत्त्व वाढत आहे हे मोजणं अवघड नाही!!