शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षी जगणं होईल स्मार्ट

By admin | Updated: December 18, 2015 15:19 IST

तंत्रज्ञान आपल्या हातात आहेच, येत्या वर्षी ते अधिक फ्रेण्डली तर होईलच, पण आपण न सांगताही आपली काही कामं मुकाट आणि पटकन करून मोकळंही होईल!

- तंत्रज्ञानाचा प्रवास वेगवेगळ्या क्षेत्रत कुठल्या दिशेने होत आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होत आहे याचा आढावा गेले वर्षभर आपण या मालिकेत घेत आहोतच. आता हे वर्ष सरत आलं आणि नवीन वर्ष उंबरठय़ापाशी येऊन उभं आहे.
त्यामुळेच येत्या वर्षात म्हणजे 2016 मध्ये आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानात कोणकोणते बदल घडून येतील, याची एक झलक पाहू.
 
1. स्मार्टर मोबाइल अॅप्स
भारतात सध्या सोशल मीडिया, मेसेजिंग, गेम्स आणि  ई-कॉमर्स अॅप्स यांची सद्दी आहे. यापैकी ई-कॉमर्स सोडल्यास बाकी तिन्ही प्रकारचे अॅप्स पूर्णपणो व्हच्यरुअल जगाशी निगडित आहेत. यात फक्त एक स्मार्टफोन सॉफ्टवेअर यापलीकडे काही नाही. ई-कॉमर्स अॅप्समध्ये मात्र व्हच्यरुअलची सांगड भौतिक जगाशी, व्यवहारांशी घातली गेली आहे. 
2016 मध्ये व्हच्यरुअलची अशीच सांगड व्यवहारांशी किंवा हार्डवेअरशी घातलेले अनेक अॅप्स आपल्याला दिसतील. अॅप्सच्या पलीकडे जाऊन सेवा पुरवणं आणि अॅप म्हणजे अशा सेवा पुरवण्याचा फक्त एक मार्ग असे गणित असणा:या अनेक नवीन स्टार्टअप्सची संख्या वाढताना दिसेल. 
अशा प्रकारच्या अॅप्सचे एक उदाहरण म्हणजे गोकी (GoQii). गोकी एक स्मार्टवॉच-कम-हेल्थ डिव्हाइस आहे. हे घडय़ाळासारखं हातात घालायचं हेल्थ ट्रॅकर दिवसभरात तुम्ही किती चाललात, किती वेळ झोपलात यासारख्या बाबींची नोंद ठेवते. हा सगळा डेटा सेव्ह करण्यासाठी त्यांचे एक स्मार्टफोन अॅप आहे. या अॅपमध्ये तुम्ही हेल्थ ट्रॅकरचा सगळा डेटा ब्लुटूथ वापरून सिंक करू शकता. याशिवाय याला जोडून गोकीची एक मेंबरशिप सेवा आहे. यात तुमच्या हेल्थ प्रोफाईलनुसार आणि  ट्रॅक केलेल्या अॅक्टिव्हिटीनुसार वर्षभर तुम्हाला व्यायाम, आहार सल्लाही मिळू शकतो. अशा गोकीसारख्या प्रत्यक्ष सेवा पुरवणा:या अॅप्सची संख्या येत्या वर्षात हळूहळू वाढतच जाईल. 
 
2. स्मार्ट डिव्हाइसेस
आपला मोबाइल स्मार्ट झाला पण आपण वापरतो त्या अनेक गोष्टींमध्ये सुधारणांना पुष्कळ वाव आहे. या सुधारणा घडायची आणि त्या सुधारणा दैनंदिन जीवनात रूढ व्हायची गती येत्या वर्षात वाढलेली दिसेल. यात सर्वात जास्त बदल दिसेल तो आपल्या इडियट बॉक्समध्ये. क्रोमकास्ट, अॅपल टीव्ही, टिवे यासारखे साध्या टीव्हीला इंटरनेटशी जोडून त्यांचा बुद्धय़ांक थोडाफार वाढवणारे डिव्हाईसेस आताही भारतात आपण वापरू शकतो. टीव्हीमध्येच या सुविधा अंतर्भूत असणारे टीव्ही सेट पुढील काळात आपल्याला बघायला मिळतील. असाच बदल आपल्या कारमध्येही बघायला मिळेल. 
 
3. स्मार्ट होम्स
नळ सुरू राहिला आणि टाकी रिकामी झाली किंवा बाहेरगावी गेलो आणि सर्व लाईट्स सुरूच राहिले किंवा चावी घरात राहिली आणि  लॅच लागले यासारख्या गोष्टी आपल्या बाबतीत कधी ना कधी घडलेल्या असतात.
तंत्रज्ञानाच्या वापराने अशा सा:या गोष्टी टाळता येण्याजोग्या असतात. अॅपद्वारे नियंत्रित करता येणारे लॉक्स, लाईट्स, नळ या गोष्टी आता फार दूर नाहीत. त्याचप्रमाणो आपल्या फोनवर असणा:या ऑटो ब्राईटनेससारखी सुविधा असणारे लाईटबल्बदेखील आता बाजारात उपलब्ध आहेत. 
 
4. स्मार्ट लाइफ
 आपण राहतो ती गावं-शहरं, त्यातील वाहतूक, सार्वजनिक सेवा पुरवठा या सगळ्या गोष्टींची वाटचाल डिजिटल व्यवस्थेकडे होत आहे. शासनाचा स्मार्ट सिटीसारखा उपक्र म असो किंवा डिजिटल इंडियासारखा उपक्रम, खेटे मारणं, रांगेत उभं राहणं, साध्या साध्या कामांसाठी विलंब होणं या दुविधा प्रगत देशांप्रमाणोच भारतातही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. 
आपल्या व्यवहारात येऊ घातलेला आणखी एक महत्त्वाचा बदल आहे पैशांचा. याबाबतीत आपली वाटचाल कॅशलेस व्यवस्थेकडे सुरू आहे. यात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तर आहेतच; पण त्यापुढे जाऊन मोबाइल वॉलेट्स, अॅप-टू-अॅप मनी ट्रान्सफर, एनएफसी पेमेंट यासारख्या सुविधांमुळे आपले व्यवहार एकदम सोपे, सुटसुटीत आणि चुटकीसरशी होतील.
त्यामुळे तयार राहा, नव्या वर्षात नव्या टेक्नॉलॉजी सरप्राईजेसना !!
 
 (समाप्त)
 
 - गणेश कुलकर्णी 
ganesh@buzz140.com