शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल्स डे आला कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:37 IST

जगभर बाजारपेठेनं व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करायला सुरुवात केली. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होऊ लागली म्हणून मग चीनमधल्या अत्यंत परंपरागत समाजात हे ‘एकटं’ असणं साजरं होऊ लागलं.

ठळक मुद्देबाजारपेठ तरुण मुलांना नवीन सण देते आणि नव्या तरुण चेहर्‍यानं हे दिवस साजरे होतात याचं हा दिवस एक उत्तम उदाहरण आहे.

- निशांत महाजन

सिंगल्स डे, त्याला ‘बेअर स्टिक्स हॉलिडे’ असंही म्हणतात. 1993 साली चिनच्या नानजिंग विद्यापीठात तरुण विद्याथ्र्यानी आपलं ‘सिंगल’ असणं साजरं करावं म्हणून हा दिवस साजरा होऊन लागला. 11/11 असं म्हणत 11 नोव्हेंबर हा दिवस निवडला गेला कारण चिनी पद्धतीनं लिहिलं तर ही लिखावट ‘अनअ‍ॅटॅच्ड’ या अर्थाच्या ‘न गुंतलेल्या’ भावना दर्शवते. खरं तर जगभर बाजारपेठेनं व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करायला सुरुवात केली. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होऊ लागली म्हणून मग चीनमधल्या अत्यंत परंपरागत समाजात हे ‘एकटं’ असणं साजरं होऊ लागलं. चीनमधल्या मध्यमवर्गीय आणि मध्यममार्गी तारुण्यानं हा दिवस सहज स्वीकारला आणि साजरा करणं सुरू केलं.

सिंगल्स डे आणि शॉपिंगमुळातच हा डे बाजारपेठेभोवती गुंफण्यात आला. त्यात अलीबाबा या कंपनीचे सहसंस्थापक जॅक मा यांना ही आयडिया आवडली. त्यांनी 2009 मध्ये हा सिंगल्स डे त्यासाठी स्वीकारला आणि सिंगल असलेल्या मुलामुलींना खरेदीच्या ऑफर देत हा दिवस साजरं करण्याला बाजारपेठेशी जोडून टाकलं. पुढे सगळ्याच ऑनलाइन-ऑफलाइन कंपन्यांनी या डेशी स्वतर्‍ला जोडून घेण्याचा प्रय} केला.

सिंगल असण्याचं सेलिब्रेशनमुळात जगभर प्रेमात पडणं, परस्परांना भेटी देणं, फिरायला जाणं, शॉपिंग करणंच सेलिब्रेट होतं. त्यावेळी आपण सिंगल आहोत, एकेकटे आहोत म्हणत तरुण मुलंमुली झुरतात. त्यांनाही साजरं करण्याचं आणि आपलं सिंगलपण अभिमानानं मिरवण्याचं, मित्रमैत्रिणींसह मस्त सेलिब्रेशन करण्याचं निमित्त या डेनं दिलं. आता चीनसह अनेक देशांत सिंगल असलेले तरुण हा दिवस साजरा करू लागलेत. बाजारपेठ तरुण मुलांना नवीन सण देते आणि नव्या तरुण चेहर्‍यानं हे दिवस साजरे होतात याचं हा दिवस एक उत्तम उदाहरण आहे.