- गीतांजली गोंधळे
पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार आपल्याकडे सोन्याच्या दागिन्यांवर अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे. कोणताही दागिना घडवायचा म्हटले की सोन्याचाच विचार सर्वप्रथम केला जातो. यामुळेच दागिने घडवणारे कारागीरदेखील सोन्याचे विविध दागिने करण्यात प्रावीण्य मिळवलेले दिसतात. पण लहानपणापासूनच मला सोन्यापेक्षा चांदीच्या दागिन्यांची लकाकी जास्त आकर्षित करायची. याच आवडीतून मला माझा व्यवसाय मिळाला.
दोन वर्षापूर्वी मी निराश होऊन माङया नव:याला म्हटलं, ‘खरेदीला गेल्यावर मनासारखा एकही चांदीचा दागिना मिळत नाही. आता मीच चांदीचे दागिने घडवायला सुरुवात करते.’ नाराज झाल्यावर, रागात असताना अनेकदा आपण काही गोष्टी बोलून जातो. नवरा म्हणाला, ‘हा थॉट चांगला आहे. तू खरंच काहीतरी केलं पाहिजे.’ तिथून माङया ज्वेलरी मेकिंगच्या प्रवासाची सुरुवात झाली.
ज्वेलरी मेकिंगमधे येण्याआधी दहा वर्षे मी अॅडव्हर्टायङिांग फिल्डमध्ये काम करत होते. त्या फिल्डमध्ये क्रिएटिव्ह काम करत असूनही साचलेपणा आला होता. ज्वेलरी मेंकिगचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले तेव्हा मी गोव्यात राहत होते. माङो माहेर मालेगावचे. तिथे राहणा:या माङया भावाला आणि अजून एका मित्रला मी ज्वेलरी मेकिंगच्या व्यवसायाविषयी सांगितले. त्यांनी मला योग्य निर्णय घेतल्याचे सांगितले. यानंतर मी मालेगावला जाऊन तिथल्या काही सराफांचं मार्गदर्शन घेतलं.
चांदीचे दागिने घडवण्याचा व्यवसाय सुरू झाला. पहिल्या प्रदर्शनाच्या वेळी मी फक्त 13 कानातले डिझाइन्स तयार केली होती. त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर मी मुंबईला राहायला आले.
निसर्ग, आदिवासींचे दागिने यांची मला आवड आहे. यामुळे आधीपासूनच मी याकडे बारकाईने लक्ष देऊन अनेक गोष्टी शिकले होते. त्याच गोष्टी आता मला दागिने घडवताना कामी येतात. परंपरेनुसार आलेल्या दागिन्यांना एक वेगळा टच देऊन मी दागिने घडवायला सुरुवात केली.
कुयरी, पोपट, मोर हे आकार दागिन्यांमध्ये आधीपासून वापरले जातात. जुन्या दागिन्यांचा पगडा माङयावर अजूनही असल्यामुळे माङया दागिन्यांमध्ये हे आकार वापरते. आत्तार्पयत मी कानातले, अंगठी, जोडवी, गळ्यातली पेंडट, पैंजण असे प्रकार करते.
कसे घडवतात दागिने?
दागिने घडवताना एकतर आधुनिक पद्धतीप्रमाणो हाताने स्केच काढून स्फॉटवेअरवर डिझाइन तयार करते. यानंतर थ्रीडी प्रिंट काढून त्याच्या आधारे मोल्ड घडवला जातो, तर पारंपरिक पद्धतीत जस्त किंवा पितळाच्या पत्र्यावर छिन्नी आणि हातोडा वापरून मोल्ड तयार केला जातो. या पद्धतीत केलेल्या दागिन्यांना एक वेगळाच लूक असतो. यात केलेले फिनिशिंग हे दागिन्यांना वेगळा लूक देते. एक दागिना घडताना किमान 15 जणांच्या हाताखालून जातो.