शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

श्रुती कोतवाल -राष्ट्रीय विक्रम करणारी पुण्याची आइस स्केटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 06:00 IST

स्केटिंग करणारे भारतात कमी नाहीत, पण आइस स्केटिंग करत थेट कॅनडा गाठणारी आणि तिथं राष्ट्रीय विक्रम करणारी श्रुती कोतवाल आता ती वर्ल्डकप आणि विण्टर ऑलिम्पिकची तयारी करते आहे.

- रोहित नाईक

रोलर स्केटिंगच्या चाकावरून थेट आइस स्केटिंगच्या ब्लेडवर येण्यासाठी तिला मोठा संघर्ष करावा लागला. रोलर स्केटिंगमध्ये सहजपणे वावरणारी ती आइस स्केटिंगमध्ये मात्र अनेकदा धडपडली, बॅलन्स साधताना कित्येकदा तिला दुखापत झाली. मात्र तिचा निर्धार पक्का होता, डोळ्यांसमोर एकच लक्ष्य होतं. आइस स्केटिंग. त्यात कर्तबगारी गाजवणं आणि त्या मेहनतीच्या जोरावरच कॅनडामध्ये प्रशिक्षण घेत तिनं एक, दोन नाही तर तब्बल चार नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले.  पुण्याच्या श्रुती नितीन कोतवाल या तरुण स्केटरनं अशक्य वाटणारं एक स्वप्न जगून दाखविलं आहे.

खरंतर तिनं आयुष्यात कधीही आकाशातून पडणारा बर्फ पाहिलाही नव्हता. पुण्याच्या जेमतेम पडणा-या थंडीत ती वाढली. स्केटिंगची आवड होतीच. रोलर स्केटिंगमध्ये राष्ट्रीयस्तरावर तिनं अनेक पदकं जिंकली. मात्र आइस स्केटिंगचं आव्हान समोर होतं. ते तिनं स्वीकारलं आणि आता ती  वल्र्डकप आणि विंटर ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठय़ावर उभी आहे. 

श्रुतीकडे सध्या वल्र्ड आइस स्केटिंगचा भारतीय चेहरा म्हणून पाहिलं जात आहे. आजपर्यंत वल्र्डकप आइस स्केटिंगमध्ये भारतीय कुणी खेळलेला नाही. मात्र श्रुतीच्या मेहनतीला यश आलं तर लवकरच ती या स्पर्धेतही खेळताना दिसेल.ल

हानपणापासून रोलर स्केटिंग करणार्‍या र्शुतीने बालेवाडीत स्केटिंगचे धडे गिरवले. आई उमा कोतवाल स्वत: राष्ट्रीय ट्रॅक अँण्ड फिल्ड खेळाडू आहेत. श्रुती स्केटिंग करायला लागली, त्यात तिनं प्रावीण्य मिळवलं आणि अल्पावधीतच अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये छाप पाडली. रोलर स्केटिंगच्या विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर काहीतरी वेगळं  करण्यासाठी र्शुती आइस स्केटिंगकडे वळाली. 

पण चाकांवरून ब्लेडवर जाणं हा मोठा टप्पा होता. अवघडही. ती सांगते, ‘ बर्फावर स्केट करणं हा अत्यंत अवघड टास्क होता. कारण हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं. आइस स्केटिंगला सुरुवात करतानाच लक्षात आलं की रोलर स्केटिंगच्या तुलनेत आइस स्केटिंग खूप मोठा खेळ असून, याला जागतिक मान्यता आहे. रोलर स्केटिंगचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नाही. पण आइस स्केटिंग मात्र ऑलिम्पिकमध्ये खेळला जातो आणि मग ठरवलं आपण हा खेळ खेळायचा. 

आता रोलर स्केटिंगच्या अन्य  जागतिक स्पर्धेतही भारतीय संघ सहभागी होत आहे. पण हे मी खेळत असताना तशी शक्यता नव्हती. त्यामुळे मग मीच माझ्यासाठी मोठं आव्हान निवडलं.’ 

आव्हान फक्त स्केटचं नव्हतं, तर वातावरणाचंही होतं. आकाशातून पडणारा बर्फ बघितलेला नव्हता आणि अति थंड वातावरणात जिथं श्वास घेणंही त्रास होतो अशा ठिकाणी तिला स्पर्धेत उतरायचं होतं.  सुरुवातीचे काही दिवस श्वास कसा घ्यावा हे शिकण्यातच गेले. यानंतर खेळातील टेक्निक, ब्लेडवर उभं राहून बॅलेन्स साधणं अशा गोष्टी आल्या.  हे करत असताना ती अनेकदा धडपडलीही.  दुखापतीही झाल्या. हा खेळ आपण का शिकतोय, असाही विचार मनात यायचा. मात्र त्या निराशेवर मात करत तिनं जोमानं सराव सुरू केला. ज्या ओव्हल स्केटिंग रिंगमध्ये ती सराव करते त्या रिंगचं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा खूप गरम असतं. मात्र बाहेर प्रचंड गारठा. मात्र त्या वातावरणाशी जुळवून घेत आता त्या खेळातही ती प्रावीण्य मिळवत आहे. 

आइस स्केटिंगचे प्राथमिक धडे उत्तर भारतातून घेतल्यानंतर तीन वर्षांपूर्वी श्रुती जागतिक प्रशिक्षणासाठी कॅनडाला गेली.  तिच्या येण्यानं सर्वांनाच चकित केले कारण तिचा स्कीन कलर सर्वांपेक्षा वेगळा होता. आशियाई उष्ण देश त्यातही भारतीय त्यामुळे ही मुलगी आइस स्केटिंगमध्ये कितपत टिकेल? असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र श्रुतीनं आपल्या दमदार कामगिरीचा धडाका लावत सर्वांना चकित केलं. आज कॅनडामध्ये 500 मीटर, 1000 मीटर, 1500 मीटर आणि तीन हजार मीटरच्या राष्ट्रीय रेकॉर्ड्सची नोंद तिच्या नावावर आहे.अजून थोडा जोर लावला तर विंटर ऑलिम्पिक आता फार लांब नाही!

 

मदतीचे हात

या खेळाचे साहित्य खूप महाग असल्याने सहाजिकच श्रुतीलाही आर्थिक अडचण आलीच. कॅनडाला जाण्याआधी तिने र्जमनीत सराव केला. तिथे तिच्या कामगिरीने प्रभावित होऊन र्जमन अकॅडमीने साहित्य भेट म्हणून दिलं. यानंतर कॅनडामध्ये तिच्याकडे साहित्य जरी होते, तरी रेसिंग सूटवर नसलेल्या तिरंग्याची रुखरुख तिला होतीच. ही कमी पूर्ण केली कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांनी. श्रुतीच्या अनेक रेसेस पाहण्यासाठी उपस्थिती दर्शविलेल्या भारतीयांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी स्वत:हून मिळून काही रक्कम जमा केली आणि श्रुतीसाठी तिरंगा असलेला रेसिंग सूट बनवून घेतला. पारखी या मराठी कुटुंबाच्या पुढाकारानं हे शक्य झाल्याचं श्रुती आवर्जून सांगते.