शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस बहाणे

By admin | Updated: July 7, 2016 13:15 IST

ट्रेकबिक आपल्याला जमत नाही, आणि पाऊस कविताही काही होत नाहीत, म्हणून आपण पाऊस एन्जॉयच करू शकत नाही, असं कोण म्हणतं? फुकटातही मस्त पाऊस एन्जॉय करता येतो.

- चिन्मय लेले

ट्रेकबिक आपल्याला जमत नाही,
आणि पाऊस कविताही काही होत नाहीत,
म्हणून आपण पाऊस एन्जॉयच करू शकत नाही,
असं कोण म्हणतं?
फुकटातही मस्त पाऊस एन्जॉय करता येतो.
रोमॅण्टिकही होता येतंच, क्या समझे?
जो समझे, उनके लिए एक खास फर्माईश
 
जे आपले आपण ओळखायचे नि भिजायचे मनसोक्त!
 
पाऊस सुरू झाला की, दोन प्रकारच्या माणसांना फार भाव येतो.
त्यांच्या गॅँग तर इतक्या फुशारक्या मारतात की, त्यांच्यासमोर आपण म्हणजे एकदम कंडम, भुक्कड, भकास वाटू लागतो. ते इतके फुदकतात या दिवसात, असे काही रोमॅण्टिक होतात की आपल्याला वाटतं बाप रे, आपण म्हणजे नुस्ती चिखलाची राबडीच की काय? आपल्याला काय वाटतंच नाही तसं रोमॅण्टिक यांच्यासारखं!
तर दोस्तांनो, इतके दिवसांच्या व्यक्तिगत अभ्यासावरून आणि निरीक्षणावरून हे लिहितोय की, ‘त्या’ दोन प्रकारच्या पोरांशी टक्कर घेऊ नका. त्यांचं त्यांना रोमॅण्टिक होऊ द्या, काय फोटोबिटो टाकून एकमेकांनाच सॉलीड म्हणू द्या.
आपण पतली गलीसे निकलनेका आणि आपला पाऊस एकदम कॉमन मॅनसारखा एन्जॉय करनेका?
उसमें भी बहुत मजा है, हे मी माङया आणि माङया दोनतीनच मित्रंच्या अत्यंतिक व्यक्तिगत अनुभवातून सांगूच शकतो.
तर ती दोन प्रकारची माणसं कोण?
एक म्हणजे पाऊसवेडे ट्रेकिंगवाले.
ते बिचारे भरपावसात कुठं कुठं डोंगरमाथ्यावर जातात. (आपली सकाळ दुपारी होते, त्यात पावसाचं पाण्याचं कुठं बाहेर जायचं म्हणून आपण घरात बसणार!) तर त्यांची बरोबरी आणि तो पावसाचा रोमान्स आपल्याला काही झेपणारा नाही. मला आणि माझ्याया दोस्तांना तरी नाहीच झेपत!!
दुसरे म्हणजे कवी. 
पाऊस पडणार म्हटलं की अनेकांना कविता होतात. काय ते शब्द, काय ते वर्णन, कसली ती तरलता. (आपल्याला कुणाला चार ओळींचा एसएमएस लिहून पाठवायचा तरी पोटात गोळा येतो, आपल्याला कुठल्य कविता व्हायच्या?) त्या तरलतेचा रोमान्स अपने बस की बात नही. त्यामुळे या गटातही आपला प्रवेश होणं अशक्यच!
मग आम्ही कुठल्या गटातले?
- मोठय़ा गटातले!
आमच्यासारखे शेकडो नाही हजारो असतात.
आणि त्या माङयासारख्यांसाठी पाऊस एन्जॉय करण्याच्या या काही स्वानुभवावर आधारित टिप्स.
यातही रोमान्स आहे, मजा आहे, थ्रील आहे पण आपल्याला झेपेल असा!
आमची ही यादी वाचा, तुम्हाला पण वाटेल या मोठय़ा गटात पण काय रोमॅण्टिक पाऊस पडतो यार!
चलो, फिर भिगे उस बडे रोमॅण्टिक बारीश में, जो अपुनके स्टाइल की है!!
 
 
पाऊस एन्जॉय करण्याचे सामान्य उपाय
 
1) एक हमॉक गच्चीवर
सिनेमात नाही का भरपावसात हिरो हिरॉईन्स झुल्यावर बसून गाणीबिणी गातात. आता तेवढा रोमान्स नाही शक्य. पण एक हमॉक आपल्या गच्चीत नाहीतर गॅलरीत लावून टाकायला काय हरकत आहे? रस्त्यावर पन्नास-शंभर रुपयांना मिळतात ते नायलॉनचे हमॉक. मस्त लावून टाकायचे. आणि भर पावसात पडून राहायचं त्यात भिजत. घरबसल्या फुकट पाऊस रोमान्स.
 
2) टपरीवर तिनात दोन चहा-भजी
कुणी काहीही म्हणो, आपला खिसा कडकाच असतो. आपल्याला काय पावसात महागडी कॉफी परवडत नाहीच. मग काय एका बाइकवर दोघातिघांनी नेहमीच्या चहाच्या टपरीवर जायचं. चहा मारायचा, भजी हाणायची. फार झालं तर वडे, पाववडे, मूगभजी, मिसळ असं बजेट वाढवत न्यायचं. आणि त्या टपरीवर उभ्या उभ्या पावसात भिजत हे सारं हाणायचं. आपापल्या पोटाचा अंदाज घेऊन!
3) कॉलेजचा कट्टा-पावसात भुट्टा
बाकी काही नको ना, आरामशीर फॉम्यरुला घ्या. बसून राहायचं कॉलेजच्या कट्टय़ावर पावसात भिजत. गप्पा मारत. तास दोन तास. फुकट पाऊस एन्जॉय करायचा. फारच भूकबिक लागली तर शेंगदाणो, फुटाणो, भुट्टा म्हणजेच मक्याचं कणीस हे सारं खायचं. 
4) चिखलात फुटबॉल-क्रिकेट
रविवारी दुपारी अकरा वाजता सकाळ झाली की नास्ता आणि बोलणी एकदाच खाऊन घ्यायची आणि घराबाहेर पडायचं. आणि मस्त गल्लीतल्या दोस्तांसह फुटबॉल आणि क्रिकेट खेळायचं चिखलात. भर पावसात. यापेक्षा भारी रोमान्स काय असेल दुसरा, नाही का?
 
5) रिमझिम वॉक
आता तुम्ही प्रेमात पडले असाल किंवा नसाल, म्हणजेच नुस्तं आवडत असेल कुणी तर हा सेफ रस्ता. पावसात रिमझिम वॉक. चालत जायचं फर्लांगभर. छत्री न उघडताच. म्हणजे कसं बोलणंही होतं आणि पावसाच्या आठवणीही साचतात ‘तिच्या’ डोक्यात!
6) पावसाची गाणी ऐको रे
हे तर सगळ्यात सोपं. मस्त पलंगावर झोपून घ्यावं. तोंडावरून पांघरूण घ्यावं गुरगुटून. कानात हेडफोन घालावा आणि पावसाची गाणी ऐकत दिवसभर नुस्तं पडून राहावं. पाऊसच पाऊस!
7) लॉँग ड्राइव्ह
हे तसं सोफिस्टिकेटेड. पण आपल्याकडे कुठची आली कार? मग आपापल्याच बाइकवर निघायचं आणि सुटायचं. पण खरं सांगतो, त्या पाण्यात, खड्डय़ात गाडी बंद पडली की मग ती ढकलत नेण्यात जी पावसाळी मजा आहे ना, ती एन्जॉय करण्यातही पाऊस भेटतोच. 
 
8) पावसाळी पिकनिक
घरच्यांना विसरायचं नाही. सगळ्यांसोबत गावाजवळच्या मंदिरात, टेकडीवर, एखादी पावसाळी ट्रीप काढायची. घरूनच डबे न्यायचे. मस्त वनभोजन करायचं. अंताक्षरी खेळायची. पोरगं अजून वाया गेलेलं नाही हे सिद्ध करायला ही एक ट्रीप पुरते.
9) आता हायजिनचं काय?
प्रश्न आहेच. तर ज्यानं त्यानं आपापलं डोकं वापरत हा प्रश्न सोडवावा. 
जे जसं झेपेल तसं पाहावं. काळजी घ्यावीच.
मी आणि माझे मित्र खातो कधीमधी पावसात भजी, मग दुस:या दिवशी झालेला पश्चातापही करतो सहन, नाईलाज असतोच!
 
10) पाऊस मनातला
आता हे शेवटचं सांगतो. पाऊस आपल्या मनात असतो. आपण भिजतो तसं मन भिजू द्यायला हवं. किरकिर बंद. फक्त हसायचं, जगायचं उमेदीनं. पाऊस दुसरा काय असतो?