शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

शो ऑफ ? करिअरला घातक ठरू शकतो. सावधान.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 07:20 IST

आपल्याला आपला ब्रॅण्ड घडवायचा आहे. तो घडवताना तो उथळ करायचा की, अत्यंत सिन्सिअर आणि नेमका प्रामाणिक हे आपल्याला ठरवायला हवं.

ठळक मुद्दे अति करण्याच्या नादात आपण आपली बदनामी करत नाही, आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू गमवत नाही?

-नितांत महाजन

हल्ली आपण सगळेच स्वतर्‍विषयीच बोलतो. सोशल मीडियात तर फारच बोलतो. सतत माझं कसं भारी चाललेलं आहे ते सांगतो. स्वतर्‍विषयी बोलणं आणि चमकोगिरी करणं यात फरक आहे. सतत मी-माझं-माझ्यामुळे करत राहिलं तर इतरांना उबग येतोच; पण त्यामुळे आपली सोशल मीडियातली इमेज बदलते. बिघडते.एक लक्षात ठेवायला हवं की आपणच आपला ब्रॅण्ड आहोत. आपल्याला आपला ब्रॅण्ड घडवायचा आहे. तो घडवताना तो उथळ करायचा की, अत्यंत सिन्सिअर आणि नेमका प्रामाणिक हे आपल्याला ठरवायला हवं.  आपण आपलं स्वतर्‍चं ब्रॅण्डिंग करणं काही चूक नाही. ब्रॅण्डिंग करण्यात काही गैर नाही. आपण चांगलं काम करतो तर ते काम लोकांर्पयत, आपल्या क्षेत्रातील माणसांर्पयत पोहचणं, आपली एक उत्तम ओळख अर्थात इमेज बनवणं हे सारं नव्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. ते करायलाच हवं.आणि आपण केलं नाही तर ते आपल्यासाठी कोण करणार? मात्र अति करण्याच्या नादात आपण आपली बदनामी करत नाही, आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू गमवत नाही, याकडे लक्ष हवं. लोक आपली टिंगल करतात की आपलं कौतुक यापलीकडे जाऊन आपल्याला कसं जोखतात याकडे लक्ष द्यायला हवं.

1) सोशल मीडिया फ्रेण्ड्सत्यांना आवरा, आपली टिंगल करणारे, आपल्या कामाचा आदर नसणारे, वाट्टेल ते बरळणारे, अतिच राजकारण बोलणारे सगळे बाहेर काढा.2) सोशल मीडियात मत मांडाल. एखादी कमेण्ट कराल तर ते अभ्यास करून लिहा. राजकारणावर टिपणी करण्याच्या नादात आपण आपल्या पायावर कुर्‍हाड मारतोय का हे पहा. 3) जे लिहाल ते कायमचं आहे, त्यामुळे वाट्टेल ते पोस्ट करू नका. 4) आपले पर्सनल फोटो, पाटर्य़ातले फोटो, नातेसंबंध याचं प्रदर्शन अजिबात करू नका. आपलं प्रोफेशनल प्रोफाइल आहे हे लक्षात ठेवा. 5) कुणाशीही भांडू नका. ज्ञान देऊ नका. आपल्या कामावरची टीका पचवा.