शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
3
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
4
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
5
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
6
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
9
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
10
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
11
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
12
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
13
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
14
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
15
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
16
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
17
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
18
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
19
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
20
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे

पठार- स्वतः ला शोधणारी एक शॉर्टफिल्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:00 IST

आपण आपलं करिअर निवडतो, धावत सुटतो त्याच्यामागे. यश मिळवतो, कौतुकही होतं. पण ते सारं खरंच आपल्याला हवं असतं का? मुळात आपल्याला नेमकं काय हवं असतं? - शोधलंय कधी?

ठळक मुद्देप्रत्येकामध्ये दडून बसलेल्या ‘मी’च्या शोधाचं गांभीर्य आणि त्यासाठी हवी असलेली हिंमत निखिलेशची ही फिल्म देते.

- माधुरी पेठकर

 मोठय़ा शहरांमध्ये माणसं जगण्यासाठी जातात. राहतात. कोणी आवडीनं तर कोणी मजबुरीनं राहतात. माणसं आपल्या रोजच्या कामात गढून जातात. शहराच्या गतीसोबत पळता पळता स्वतर्‍चा हात मात्र सुटत जातो. कामानिमित्त एका विशिष्ट वेळेसाठी गर्दीचा भाग बनणं इतकं अंगवळणी पडतं की मग एकटेपणा नकोसा वाटू लागतो. एकटेपणात स्वतर्‍ची सोबत काटय़ासारखी बोचू लागते. अनेकातले एक होऊन जगताना डोकं कुरतडणारे प्रश्न पडत नाहीत. मात्र कधी निवांतक्षणी भेटलोच स्वतर्‍ला तर ‘काय चाललंय तुझं?’ या प्रश्नाचं आव्हान जीवघेणं वाटू लागतं. रोजची मरमर, धावपळ, घुसमट, असाह्यता बरी वाटते. पण स्वतर्‍च्या श्रेयस-प्रेयसाचा शोध मात्र भयानक वाटतो. मग हे असं स्वतर्‍ला टाळून गर्दीत हरवणं, स्वतर्‍चा शोध घेण्याच्या संधींना तुडवून पळत सुटणं यालाही आपल्यातला मी कंटाळतो आणि कधी ना कधी तो आपल्याला गाठतो. एकांताच्या लयीत आपल्याला शांत करत त्याला हवे ते टोकदार प्रश्न विचारतोच. कितीही खिन्न, उदास वाटलं तरी स्वतर्‍चा शोध घेण्यास हा मी भाग पाडतोच.  पण प्रश्न हाच आहे की या ‘मी’ला भेटायला वेळ आहे कोणाला? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी जी हिंमत लागते ती कुठून आणणार? त्या ‘मी’ला भेटण्याची हिंमत केलीय ती निखिलेश चित्रे लिखित-दिग्दर्शित  ‘पठार’ या शॉर्ट फिल्मनं आणि त्यातल्या दोन मित्रांनी.खरं तर ती दोघं खूप दिवसांनी एकमेकांना भेटलीत. एकमेकांशी निवांत गप्पा मारता याव्यात म्हणून शहरापासून दूर असणार्‍या एका सुंदरशा पठारावर ते जातात. त्या पठारावरचं  वातावरण, तिथली शांतता, एकांत यामुळे हे दोघेही मित्र मंत्रमुग्ध होऊन जातात. इतक्या दिवसांनंतर एकमेकांशी छान कनेक्ट होता यावं म्हणून पठारावर येतात खरं, पण त्या पठारावर एकमेकांपासून तुटत जातात. दोघंही एकमेकांशी बोलत असतात. पण एकमेकांबद्दल नाही, आपल्या मैत्रीबद्दल नाही, हरवलेल्या भूतकाळाबद्दल नाही, वर्तमान आणि भविष्याबद्दलही नाही. ही दोघं एकमेकांशी बोलतात ते ‘मी’बद्दल. या पठारावर या दोघांना स्वतर्‍तला मी भेटलेला असतो. यातला एक मित्र हा मुंबईत एका वृत्तवाहिनीत पत्रकार म्हणून काम करतोय, तर एक मित्र एमएसडब्ल्यू नंतर गावात जाऊन सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. या पठारावर त्यांना कळतं की आपण जे करतो आहोत ते आपलं श्रेयस आहे, प्रेयस नाही. पत्रकाराला वाटतं की अरे इतके र्वष आपण पत्रकारिता करत आहोत पण तरीही आपण काय केलं? तर त्याचं उत्तर शून्यच येतं. थोडय़ाशा माहितीवर सर्वज्ञ झाल्याचा आव आणतोय, थोडय़ाशा कौतुकानं आपली पाठ थोपटून घेतोय. अधाशासारख्या बातम्या देतोय, ग्लॅमरची खोटी झूल मिरवतोय. हे सगळं निर्थक आहे हे माहीत असूनही आपण तेच करतोय. आपण शांतपणे कधी स्वतर्‍च्या आवडीचं एखादं पुस्तक वाचलं नाही. एखादा सिनेमा जग विसरून पाहू शकलो नाही मग आपण केलं काय? मुंबईच्या गर्दीत हरवून गेलो. ते का? हा प्रश्न छळतो त्याला.दुसरा सामाजिक कार्यकर्ता मित्र. कामानिमित्त गावात राहतोय पण तरीही त्याला अपराध्यासारखं वाटतंय. गावात काम केल्यानंतर काहीच दिवसांनी त्याला मुंबईची आठवण बैचेन करते. त्याला शहरातले मल्टिप्लेक्स आणि गर्दी साद घालतात. शहरापासून लांब गावात राहूनही आपण काय मिळवलं? आपल्याला नेमकं हवं तरी काय आहे? आपला प्रवास असाच न संपणार्‍या रस्त्यावरचा आहे का? या प्रश्नांनी हा कार्यकर्ता मित्र अस्वस्थ होतो. हा  ‘मी’च्या शोधाचा प्रवास 25 मिनिटांचा प्रवास  ‘पठार’ या लघुपटात दिसतो. आणि आपणही त्या पठारावर स्वतर्‍ला शोधू लागतो. लेखक/दिग्दर्शक निखिलेशच्या मते, थोडय़ाफार फरकानं सगळ्यांचीच अवस्था या दोघांसारखीच असते. भवतालापासून विलग होऊन आपल्या अवकाशात डोकावण्याचे क्षण आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. अर्थात असे क्षण अनुभवण्याची संधी प्रत्येकालाच मिळते असं नाही. स्वतर्‍च्या शोधाची तीव्र आस असलेलेच हे करू शकतात. दहा वर्षापूर्वी सतीश तांबे यांच्या ‘राज्य राणीचं होतं’ या कथासंग्रहातली ‘पठरावर अमर’ नावाची कथा निखिलेशच्या वाचनात आली होती. त्यावेळेस ही कथा त्याला भावली. या कथेतला गोठवून टाकणार्‍या काळाचा मोह निखिलेशला तेव्हाच पडला होता. या कथेतली स्वतर्‍च्या शोधाची गोष्ट आणि मार्ग आपण शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सांगू शकतो या विश्वासावरच त्याने ‘पठार’ ही फिल्म तयार केली.  ‘पठार’ बघताना ‘मी’च्या शोधाचा ताण  आपल्याही मनावर दाटून आल्याशिवाय राहात नाही. प्रत्येकामध्ये दडून बसलेल्या ‘मी’च्या शोधाचं गांभीर्य आणि त्यासाठी हवी असलेली हिंमत निखिलेशची ही फिल्म देते.

ही फिल्म  या लिंकवर पाहता येईल.

https://www.youtube.com/watch?v=ksOpwvRnmwc