'यु एव्हर शॉप ऑनलाइन?'
-असा प्रश्न तुम्हाला कुणी विचारलाच, (तोही इंग्रजीत)
तर तुम्ही काय म्हणाल किंवा काय वाटेल तुम्हाला? ‘हे आलं आणखी एक शहरी, पैसेवाल्यांचं फॅड?’
म्हणे ऑनलाइन खरेदी करता का?-न्नो व्वे!!
खरेदी म्हणजे मस्त मॉलमध्ये जायचं, हजार गोष्टी पहायच्या, टाइमपास करून, मनासारखा ड्रेस किंवा वस्तू विकत घ्यायची, खायचं-प्यायचं. शॉपिंगचं सेलिब्रेशन करायचं.
पण थांबा, जर तुम्हाला (अजूनही) असं काही वाटत असेल तर तुम्हाला माहितीच नाहीये की, सध्याचा शॉपिंगचा नवा जबरदस्त ट्रेण्ड नक्की काय आहे!
‘ऑनलाइन शॉपिंग’ हे प्रकरण तरुणच नाही तर टीनएजर मुलांमध्येही सध्या तुफान वेगानं पॉप्युलर होतंय. विशेष म्हणजे मेट्रो सिटीपुरता हा नवा ट्रेण्ड र्मयादित नाही, तर आज छोटी असली तरी वेगानं मोठी होत ‘मेट्रो’च होऊ घातलेल्या शहरांमधली मुलं ऑनलाइन शॉपिंग करण्यात जास्त आघाडीवर आहेत.असं कोण म्हणतं?
- टीसीएस म्हणजे टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने राष्ट्रीय स्तरावर केलेल्या सर्व्हेक्षणाची ही निरीक्षणं आहेत.हा सर्व्हे म्हणतो की, १२ ते १८ वयोगटातली १0 पैकी ६ मुलं आजच्या घडीला ऑनलाइन शॉपिंग करतात. आपल्या हातातला मोबाइल किंवा लॅपटॉप हेच खरेदीचं मुख्य साधन बनत जाईल.
असं असेल तर नक्की काय आहे, हा ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेण्ड? -जरा शोधून पाहूया!
- ऑक्सिजन टीम