शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेअरिंग @ हॉटस्पॉट मोड

By admin | Updated: July 2, 2015 15:02 IST

यारीदोस्तीतलं शेअरिंग वाढवणारा एक नवा फंडा नेट शेअरिंग. जो नेट शेअर करतो तोच सच्च दोस्त असंही लोक उद्या म्हणू लागतील, असा हा नवा फंडा!

 अनिल भापकर

यारीदोस्तीतलं शेअरिंग वाढवणारा एक नवा फंडा नेट शेअरिंग. जो नेट शेअर करतो तोच सच्च दोस्त असंही लोक उद्या म्हणू लागतील, असा हा नवा फंडा!
--------------------
‘दोस्ती मे सब चलता है’ म्हणत एकेकाळी मित्र एकमेकांच्या वस्तू शेअर करत असत. मग ते अगदी पेन ,पेन्सिल पासुन ते कॅंटीन मधील कटिंग असो कि आपल्या रुममेटच्या  कपडय़ांपासुन ते वही-पुस्तकांपर्यंत. सर्व काही बिनदिक्कत शेअर केलं जायचं. मात्र आताच्या हायटेक जमान्यात मित्रंच्या शेअरिंगच्या कल्पना थोडय़ा बदलल्या आहेत. 
 हल्ली नियमीत ऐकू येणारे संवाद म्हणजे  यार मेरे लॅपटॉप पे नेट नही चल रहा है, जरा तेरा स्मार्टफोन वायफाय हॉटस्पॉट मोड पर डाल मुङो तेरा नेट शेअर करना है!  समोरचा मित्र सुद्धा त्याच्या स्मार्टफोनवर काही तरी सेटिंग करतो आणि चल ले ये पासवर्ड डाल और कर ईंटरनेट अक्सेस असे म्हणतो. लॅपटॉपवर  वायफाय सर्च करुन मित्रने दिलेला पासवर्ड टाकुन इंटरनेटचा वापर करुन े महत्वाचं काम केलं जातं. 
पण हे वायफाय हॉटस्पॉट तंत्रज्ञान आहे तरी काय की ज्यामुळे हे इंटरनेट शेअरिंग अगदी सोपे झालंय!
अॅण्ड्राईड स्मार्टफोनवर ईंटरनेट शेअर (टिथरिंग)करण्याच्या तीन वेगळ्यावेगळ्या पध्यती आहेत.युएसबी टिथरिंग,वाय-फाय टिथरिंग आणि तिसरी पद्धत म्हणजे ब्लुटुथ टिथरिंग. त्यासा:याची इथं माहिती देतोय, एखाद्या जाणकार मित्रची मदत घेऊन हे सारं स्वत:च्या मोबाईलनं एकदा करुन पहा. 
त्यात अवघड काही नाही, अनेकांना उगीच आपल्याला ते जमणार नाही असं वाटतं. पण त्यात क्लिष्ट आणि न जमण्यासारखं काहीच नाही!
 
1.युएसबी टिथरिंग-
युएसबी टिथरिंग हा अॅण्ड्राईड स्मार्टफोनचा वापर करुन इंटरनेट शेअर करण्याचा सगळ्यात सोपा आणि फास्ट इंटरनेट स्पीड देणारा प्रकार आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी डाऊन होण्याची अजिबात शक्यता नसते कारण ज्या लॅपटॉपला किंवा पिसिला स्मार्टफोन जोडता त्यावेळी तुमचा स्मार्टफोनसुद्धा चाजिर्ंग होत असतो. डायरेक्ट कनेक्शन असल्यामुळे इंटरनेटचा स्पीड सुद्धा चांगला मिळतो. मात्र यामध्ये तुम्ही एकाच डिव्हाईस सोबत इंटरनेट शेअर करु शकता. यासाठी तुम्हाला युसबी डेटा केबल च्या सहाय्याने तुमचा स्मार्टफोन लॅपटॉपला जोडावा लागेल.त्यानंतर अॅण्ड्राईड स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जाऊन वायरलेस आणि नेटवर्क मध्ये मोअर सेटिंग मध्ये जावे लागते. नंतर टिथरिंग आणि पोर्टेबल हॉटस्पॉट वर टॅप करावं लागतं.यामध्ये युएसबी टिथरिंग ला सिलेक्ट केलं की लॅपटॉप वर इंटरनेट सुरु.
 
2.वाय-फाय टिथरिंग
इंटरनेट स्पीडच्या बाबतीत वाय-फाय टिथरिंग दुस:या क्रमांकावर येतं. याचा इंटरनेट स्पीड युएसबी टिथरिंग पेक्षा थोडा कमी असतो. वाय-फाय टिथरिंग या इंटरनेट शेअरिंग प्रकारामध्ये तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त लवकर डाऊन होते. मात्र वाय-फाय टिथरिंगचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे या इंटरनेट शेअरिंग प्रकारामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त डिव्हाईसवर इंटरनेट वापरु शकता. यासाठी तुम्हाला अॅण्ड्राईड स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जाऊन वायरलेस आणि नेटवर्क मध्ये मोअर सेटिंग मध्ये जावे लागेल.नंतर टिथरिंग आणि पोर्टेबल हॉटस्पॉट वर टॅप करावे लागेल . आता हेच नेटवर्क  आणि पासवर्ड वापरुन तुम्ही इतर डिव्हाईसवर इंटरनेट वापरु शकता.
 
3.ब्लुटुथ टिथरिंग
हा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत सगळ्यात स्लो प्रकार आहे.मात्र यामध्ये सुद्धा तुमच्या स्मार्टफोन ची बॅटरी खुप कमी वापरली जाते.शिवाय ब्लुटुथ टिथरिंग वापरुन जुन्या डिव्हाईसवर इंटरनेट वापरु शकता. ही गाणी किंवा पिर शेअरिंगची सगळ्यात जुनी पद्धत. अर्थात अजूनही ही पद्धत काम करतेच.