अमृता दुर्वे
फेसबुकवर आपण शेअर करत असलेले आपले फोटो छान, हटके दिसावेत असं सगळ्यांनाच वाटतं. म्हणून मग काहीजण आता हौशीनं इन्स्ट्राग्राम वापरतात. पण इन्स्टाग्राम वापरून सगळ्या फोटोंना तेच तेच इफेक्ट्स येतात. पण असं एक अँप आहे जे तुमच्या फोटोंना एक भन्नाट मेकओव्हर देईल. त्याचं नाव आहे VSCO CAM
या अँपमधला कॅमेरा वापरून तुम्ही फोटो क्लिक करू शकता आणि एडिटही करू शकता. या इन कॅमेरा अँपमध्ये तुम्हाला मॅन्युअल फोकस, शटर स्पीड, व्हाइट बॅलन्स आणि एक्स्पोजरचे बरेच ऑप्शन्स मिळतील.
यातून क्लिक केलेले फोटोज तुम्हाला गॅलरीमध्ये दिसतील किंवा मग तुम्ही तुमच्या डिफॉल्ट कॅमेर्यानं काढलेले फोटोही तुम्हाला गॅलरीतून अपलोड करता येतील. पेंट ब्रशवर टॅप केलं की फोटो एडिट करता येतील. या अँपमधलं पेंट ब्रश वापरून फिल्टर्स निवडा. स्क्रू ड्रायव्हरवर क्लिक केलं, की त्या त्या फिल्टरचे आणखीन कण्ट्रोल्स मिळतील. तिसर्या पर्यायानं ‘अनडू’ही करता येईल.
इतर कोणत्याही अँप्सपेक्षा VSCO चे इफेक्ट्स भन्नाट आहेत आणि त्यातून तुमच्या फोटोंना भन्नाट लूकही देता येऊ शकेल. शिवाय फोटोला तुम्ही कलर टिण्टही देऊ शकाल. असे सारे प्रयोग करून तुम्ही फोटो सेव्ह केले की ते तुमच्या फोटो गॅलरीत दिसू लागतील. इन्स्टाग्रामसारखेच यावरही तुम्ही इतरांचे फोटो पाहू शकता. ट्राय करून पहा. डाउनलोड हे अँप फ्री डाउनलोड करता येतं.
http://vsco.co/vscocam या वेबसाइटवर जाऊन तुम्ही हे अँप डाउनलोड करू शकता.