शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बियांची राखी- पर्सनलाइज्ड राख्यांचा एक नवा ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 19:30 IST

तिला वाटलं, राखी बांधल्यावर काही दिवसांनी कच-यात जाते, त्यापेक्षा त्या राखीतच बी पेरलं तर? त्यातून तयार झाली एक अनोखी राखी..

- सायली जोशी-पटवर्धन

रक्षाबंधन तसं जवळ आलंय.  राखी पौर्णिमेला एकमेकांना काय भेट द्यायचं याचं प्लॅनिंगही एव्हाना सुरू झालं असेल. तसंही हे भावाबहिणीचं नातं आता दोस्तीसारखं असल्यानं गिफ्ट्सचाही खास विचार केला जातो.

आता तर इको फ्रेण्डली राखी, बांबूची, फुलांची, स्वत:च्या हातानं बनवलेली राखी, क्विलिंगच्या राख्या, असा नवा पर्सनलाइज्ड ट्रेण्ड सध्या चर्चेत आहे. उगीच गेलं बाजारात आणि आणली फुलाफुलांची राखी उचलून, प्लॅस्टिक नि कागदाची असं आता होत नाही. विशेषत: राखी स्पेशल आणि पर्सनल टचची असावी, असा प्रयत्न तरुण मुलंमुली करतातच.

तर अशाच या ट्रेण्डमध्ये एक भन्नाट आयडिया काही तरुण दोस्तांना सुचली. पलक कुसुमाकर आणि विनय भंडारी असं या दोस्तांचं नाव. पलक अवघ्या 20 वर्षांची आहे. मूळची इंदूरची. तिच्या सुपिक डोक्यातून आलेल्या कल्पनेनुसार तिने पर्यावरणपूरक राखी तयार केली. इतकेच नाही तर या राखीमध्ये झाडांच्या बिया घातल्या. ज्यामुळे रक्षाबंधनानंतर ती राखी वाया न जाता त्यातून एक झाड, रोप असं जिवंत चित्र आकारास येईल. या अनोख्या राखीचं नाव त्यांनी रिश्ता असं ठेवलंय.  

पलकला ही कल्पना कशी सुचली तर ती सांगते, अनेकदा राख्या काही दिवसांनी फेकल्याच जातात. बारावीपासून मी मृत्युंजय नावाच्या स्वयंसेवी संस्थेत काम करतेय. ही संस्था पाणी बचतीसाठी काम करते. संस्थेने इंदूरजवळचे एक खेडे दत्तकही घेतलं आहे. त्याठिकाणी लहान मुलांना शिक्षण मिळावे यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षलागवडीसारखे उपक्रम आम्ही राबवत असतो. त्यातूनच मग मला ही कल्पना सुचली. मुंबईत फजलानिया अकॅडमी ऑफ बिजनेस सायन्स महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला सामाजिक प्रकल्प करण्यास सांगण्यात आले. तेव्हा मागील अनेक दिवसांपासून डोक्यात असलेली बियांच्या राखीची संकल्पना राबविण्याचं मी ठरवले. सुरुवातीला मी आणि माझा मित्र असे दोघेच हे काम करत होतो. नंतर आम्हा मित्रमैत्रिणींची सहा जणांची टीम यावर काम करायला लागली.  कालांतराने ही संकल्पना सगळ्यांना इतकी भावली की केवळ एका व्हॉट्सअँप मेसेजवरून आम्हाला राख्यांसाठी तुफान मागणी यायला लागली. महाविद्यालयातही माझ्या वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी माझ्या प्रकल्पात सामील होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आणखी जोमाने काम सुरू केलं.’कशी आहे बियांची राखी या राखीचा बेस लोकरीचा असून, ही लोकर नंतर तुम्ही कोणतीही गोष्ट बांधण्यासाठी अगदी सहज करू शकता. यावर एका कापडामध्ये रोपांच्या बिया बांधून त्या लोकरीला योग्यपद्धतीने जोडण्यात आल्या आहेत. यामध्येही 3 वेगवेगळ्या रोपांचे पर्याय देण्यात आले आहेत. मधुमालती, झेंडू आणि तुळस या तीन रोपांच्या बियांचा वापर करण्यात आला आहे. तसेच इतर राख्यांप्रमाणे ही राखी बांधण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर न करता वर्तमानपत्रांचा वापर करण्यात आला आहे. माझ्या काकांचा फुलांचा व्यवसाय असल्याने त्यांच्या मदतीने मी इंदूरहून या बिया मागवल्या असे पलकने सांगितले.