शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

SCCN शाश्वत विकासासाठीचा कॅम्पस कट्टा

By admin | Updated: June 1, 2017 11:21 IST

निसर्गाप्रती आपली जबाबदारी निभावणं म्हणजे फक्त झाडं लावणं अगर व्यक्तिगत जगण्याच्या पध्दतीत बदल करणं एवढंच नव्हे!

अखिलेश पाटील
 
निसर्गाप्रती आपली जबाबदारी निभावणं म्हणजे फक्त झाडं लावणं अगर व्यक्तिगत जगण्याच्या पध्दतीत बदल करणं एवढंच नव्हे! - आपला देश, देशातली शहरं केव्हा ‘स्मार्ट’ आणि निसर्गस्नेही होतील,तेव्हा होवोत; पण आपल्या कॉलेजचा कॅम्पस आपण सगळे मिळून ‘स्मार्ट’ आणि ‘हिरवा’ करू शकतो का? - तर हो! त्यासाठी येत्या जागतिक पर्यावरण दिनी - म्हणजे 5 जूनला पुण्यात सुरू होतो आहे एक नवा प्रकल्प! - त्याची ही खबर! 
 
"कॉलेज कॅम्पस" हा कॉलेज अनुभवलेल्या किंवा अनुभवणाऱ्या प्रत्येकाच्याच अतिशय जिव्हाळ्याचा आणि आपलेपणाचा असा विषय. आयुष्यातील महत्त्वाची ३ ते ४ वर्षं या परिसरात जातात. त्या कालावधीत तर हा कॅम्पस म्हणजे अभ्यास, मित्र, शिक्षक, खेळ, अभ्यासेतर इतर उपक्रम अशा असंख्य घटकांनी व्यापलेलं असं दुसरं जगच असतं. कॅम्पसमध्ये- मग त्या वर्गामधल्या असोत वा बाहेरच्या - केलेल्या गोष्टींचा भविष्यात निश्चितपणे थेट परिणाम जाणवतो. ... मग असा हा "कॉलेज कॅम्पस" जर नव्या "डीजीटल" तंत्रज्ञानाने युक्त असेल तर...? वीज, पाणी यांसारख्या मुलभूत पण अत्यावश्यक गोष्टींच्या वापराचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करणारा असेल तर...? आधुनिक तरीही पर्यावरणपुरक असा, "स्मार्ट" असेल तर... ? आणि हा "स्मार्ट कॅम्पस" जर प्रामुख्याने तेथील विद्यार्थी व शिक्षक यांच्या आणि जगभरातील इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी व शिक्षक "यांच्या वैचारिक देवाणघेवाणीतून घडणार असेल तर.....? - वाचायला अतिशय स्वप्नवत वाटत असलेली ही कल्पना सत्यात उतरते आहे. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमाचे (यूएनइपी) माजी संचालक आणि TERRE Policy Centre चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने जगभरातील शैक्षणिक संस्थांना स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्क (Smart Campus Cloud Network ) किंवा SCCN अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून जोडण्याचे काम सुरू केले आहे. भविष्यात "स्मार्ट सिटी" सारख्या प्रकल्पांना घडवण्यासाठी तरुणाईला तयार करणे आणि शाश्वत विकासाची सुरूवात त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसपासून करण्यास त्यांना उद्युक्त करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. देश-विदेशातील विविध शैक्षणिक संस्था रउउठच्या माध्यमातून जोडल्या जात आहेत. येत्या ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पुण्याच्या "महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी"चा कोथरूड येथील कॅम्पस SCCN जोडला जाईल. स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्क (Smart Campus Clod Network) नावात दर्शवल्याप्रमाणेच "क्लाऊड"ची म्हणजेच माहिती इंटरनेटवर जतन करण्याची सुविधा प्रदान करते. मात्र यामध्ये जतन होणारी माहिती आहे ती संबंंधित शैक्षणिक संस्थेच्या वीज, पाणी यांसारख्या गोष्टींच्या नियमित वापरासंबंधीची. क्लाऊड वरील या माहितीच्या आधारे त्या संस्थेला आपल्या वापराच्या नियमित नोंदी ठेवणं आणि त्या अभ्यासून योग्य उपाययोजनांद्वारे एकूण कार्यक्षमता वाढवणं, वीज आणि इतर गोष्टींच्या वापरावर काटेकोर नियंत्रण ठेऊन निसर्गस्नेही असणं शक्य होतं. याबरोबरच या उपक्रमाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे "नेटवर्किंग". SCCN शी जोडल्या गेलेल्या जगभरातील प्रत्येक शैक्षणिक संस्थेला आपल्याबरोबरच इतरांच्या देखील पाणी, वीज आदींच्या वापरासंदर्भातल्या नोंदी क्लाऊडवर पाहता येतात. तुलना करता येते. इतर संस्था त्यांच्या कॅम्पसमध्ये वीज, पाणी याबाबतची कार्यक्षमता वाढवण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेणं शक्य होतं. वैचारिक देवाणघेवाण होण्यासाठी आणि शाश्वत विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक अशा संवादासाठी एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम SCCN द्वारे करण्याचा बेत आहे. या सगळ्यात एक महत्त्वाची बाब अशी की भविष्यात याचा सर्व सहभागी घटकांना फायदाच होणार आहे. विद्यार्थ्यांना एका मोठ्या व्यासपीठावर स्वत:ला पारखण्याची आणि सिध्द करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शैक्षणिक संस्थांना अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात टाळून त्याचा इतर गरजेच्या जागी उपयोग करता येणार आहे आणि या सर्वांच्या बरोाबरीने शाश्वत विकासाचं ध्येयही साध्य होणार आहे. राष्ट्रीय पातळीवर धोरणांची अंमलब्जावणी करणं हे काम खूप किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यात सर्वसमावेशकता नाही त्यामुळेच लोकांमध्ये अनेकदा अशा कार्याक्रमांच्या बाबतीत एक उदासीनता दिसून येते. पण इथे मात्र तसं नाही. "कॅम्पस" हा तुलनेने अतिशय लहान घटक असल्याने अंमलबजावणीची प्रक्रिया सुटसुटीत आहे आणि त्याच्या दिमतीलाा प्रत्यक्ष सहभागामुळे लाभलेला तरूणाईचा सळसळता उत्साह आहे. इतरांपेक्षा या उपक्रमाचं हेच सर्वात मोठ्ठं वेगळेपण आहे. "स्मार्ट होणं" ही भावना बदलत्या काळाबरोबर स्वत:ला अद्ययावत ठेवण्याशी निगडीत आहे आणि त्यामुळेच ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. SCCN च्या मदतीने या प्रक्रियेच्या दिशेने, शाश्वत विकासाची ध्येयपूर्ती करण्यासाठी पहिलं आश्वासक पाऊला उचललं जाईल अशी अपेक्षा आहे. किती आणि कसं पुढे जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी इतकी वर्षं पुस्तकांच्या पानात अडकलेली आणि मार्कांपुरती मर्यादित राहिलेली"पर्यावरणा"विषयीची निष्ठा, या निमित्ताने वर्गाच्या चार खोल्यांचा परीघ ओलांडून कॅम्पस पर्यंत प्रात्यक्षिकांसाठी पोहचेल एवढं निश्चीत. 
 
तारुण्य आणि पर्यावरण
"शैक्षणिक संस्थांचे कॅम्पस पर्यावरणस्नेही व्हावेत, अशा सर्वांना परस्परांशी संवादाची, एकमेकांच्या प्रयोगशीलतेतून शिकण्याची संधी मिळावी; हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांची महत्वाची भूमिका असेल. माहितीच्या नोंदी अभ्यासणे, त्यावर योग्य विचारविनिमय करून उपाय शोधणे, मग शिक्षक, संस्था-प्रशासन यांच्या मदतीने त्याची अंमलबजावणी करणे, जगभरातील इतर संस्था, त्यांच्याकडे होत असलेले उपक्रम यांंची माहिती ठेवणे या सर्व पातळ्यांवर विद्यार्थ्यांचा विशेष सक्रीय सहभाग अपेक्षित आहे. 
आज अनेक देशांमध्ये स्मार्ट सिटी घडवण्याचे प्रकल्प सुरू आहेत मात्र त्यांची व्याप्ती मोठी आहे. त्यांच्यासाठी लागणारा कालावधी खूप मोठा आहे. त्यामुळेच २०१५ साली संयुक्त राष्ट्रात मान्य करण्यात आलेली शाश्वत विकासाची १७ ध्येये, २०३० पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने "कॉलेज कॅम्पस"या तुलनेने छोट्या घटकाला मध्यवर्ती ठेवून एक छोटं पण महत्वाचं पाऊल आम्ही उचलतो आहोत. 
अर्थात हे सर्व घडवण्याचं काम विद्यार्थी, शिक्षक आणि एकूणच शैक्षणिक संस्थेचंच असणार आहे. यात SCCN ची भूमिका ही केवळ सर्वांना एक समान व्यासपीठ देण्याची, माहितीच्या देखरेखीची आणि क्वचित प्रसंगी मार्गदर्शकाची असेल "
- डॉ. राजेंद्र शेंडे,
अध्यक्ष, तेर पॉलिसी सेंटर
संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमाचे (यूएनइपी) माजी संचालक 
 
तुम्हाला सहभागी व्हायचं आहे?
SCCN उपक्रमाबद्दलच्या माहितीसाठी संकेतस्थळ :  : www. sccnhub.com
स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्कबरोबरच तेर पॉलिसी सेंटरतर्फे देशव्यापी आॅलिम्पियाडही आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठीच्या संपर्कासाठी ई-पत्ता : 
terrepolicycentre@gmail.com 
 
 ( अखिलेश इंजिनियर असून सध्या पुणे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागात प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे)