शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

साशा ओबामा आणि आपण!

By admin | Updated: August 18, 2016 15:54 IST

मुक्काम अमेरिका. मार्थाज् विनयार्ड येथील प्रसिद्ध ‘नॅन्सीज्’ रेस्ट्रा.. तिथे निळी टोपी घातलेली एक तरुण मुलगी आॅर्डर घेतेय.. कॅश काउंटर सांभाळतेय.. आलेल्या लोकांशी बोलतेय... आणि सगळे आश्चर्याने थक्क होऊन पाहाताहेत!

मुक्काम अमेरिका. मार्थाज् विनयार्ड येथील प्रसिद्ध ‘नॅन्सीज्’ रेस्ट्रा.. तिथे निळी टोपी घातलेली एक तरुण मुलगी आॅर्डर घेतेय.. कॅश काउंटर सांभाळतेय.. आलेल्या लोकांशी बोलतेय... आणि सगळे आश्चर्याने थक्क होऊन पाहाताहेत!- आता यात कसलं एवढं आश्चर्य? अमेरिकेत असे समर जॉब्ज करतातच की मुलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करून पैसे कमावतात. त्यातून आपलं शिक्षण चालू ठेवतात. य निळ्या टोपीवाल्या मुलीत काय असं वेगळं असावं की ‘ती’ समर जॉब करतेय याच्या बातम्या जगभरातल्या माध्यमांनी छापाव्यात?- एक साधी गोष्ट!या मुलीचं नाव. साशा ओबामा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची धाकटी मुलगी! इतर अमेरिकन मुलामुलींप्रमाणेच तिनेही यंदाच्या सुट्टीत समर जॉब सुरू केला आहे. बघा शेजारच्या फोटोत. वाटतंय का, कामात गढलेली ही मुलगी चक्क ओबामांची मुलगी आहे!पण हो. ती या जगातल्या सर्वात शक्तीमान व्यक्तीची मुलगी आहे आणि समर जॉब करतेय!शिकताशिकता बाहेरच्या जगाचा अनुभव यावा याकरता करायचे समर जॉब्ज ही पश्चिमी संस्कृती. उन्हाळ्याच्या सुट्यांत घरीच वेळ दडवण्यापेक्षा अमेरिका आणि युरोपमध्ये कित्येक विद्यार्थी हॉटेल, रिसॉर्ट्स, टेकअवे सेंटर्स अशा अनेक ठिकाणी डिलिव्हरी बॉय/गर्ल म्हणून काम करतात. कॅश काउंटर्स सांभाळतात. इंटर्नशीप म्हणा किंवा समर जॉब, दोन पैसे मिळवण्या बरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असते आणि या अनुभवाचा हिशेब या मुलांच्या शैक्षणिक गुणपत्रिकेतसुध्दा केला जातो.अर्थात ‘समर जॉब’ असलं स्पेशल नावबिव नसलं तरी ‘कमवा आणि शिका’ ही योजना आपल्याकडेही रुजवली ती भाऊराव पाटील यांच्यासारख्या कर्मवीरांनी! आपल्याकडेही मुलांनी कमवून आपल्या शिक्षणाला, कुटुंबाला हातभार लावला... पण हे झालं / होतं ते प्रामुख्याने गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये. बहुदा नाईलाज म्हणून!- पण आता आपल्याकडेही शिकताशिकता कमवायला, जगाचा अनुभव घ्यायला बाहेर पडण्याची संस्कृती रुजते आहे. अपरिहार्यतेशी झुंजणार्या तरुणांबरोबरच सुखवस्तू कुटुंबातील ‘लाडले’ही घाम गाळू लागले आहेत.भेटा अशाच दोन मित्रांना...