शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

रन फास्टर रन

By admin | Updated: February 8, 2017 15:45 IST

रनिंग.काय आहे? नुस्ता एक पळण्याचा फुकट व्यायाम. ते तर आहेच, पण जगभरात सध्या ‘रनिंग इज कूल’ हा नवाच ट्रेण्ड तरुण पायांत मूळ धरतो आहे. सोशल रन, रनिंग अ‍ॅप ते रन गॅजेटपर्यंतची इंडस्ट्रीही मग या तरुण रनर्सच्या मागे धावत सुटली आहे...

- चिन्मय लेले
 

 

सोशल मीडिया काय करेल, याचा या काळात काही नेम उरलेला नाही...आता कुणाला वाटलं होतं का, रनिंगला सोशल मीडियानं बरे दिवस येतील. तरुण जन्ता एकदम पळतच सुटेल या नव्या फॅडच्या मागे. पण तसं होताना दिसतं आहे. सोशल मीडियात सध्या रनिंग ही एक एकदम कूल गोष्ट आहे आणि पळण्याच्या या व्यायामासाठी हा सोशल मीडियाच अत्यंत प्रोत्साहन देत आहे.अनेकजण रोज पळतात, त्यांचं नेटवर्किंग होतं, काहीजण आपले फोटो टाकतात. काहीजण सतत ही ना ती मॅरेथॉन पळत असतात. त्याचेही फोटो सोशल मीडियात शेअर करतात.आणि म्हणूनच रनिंगची क्रेझ या सोशल मीडियानं वाढीस लावलेली आहे. आणि तरुण मुलांच्या जगात तर फुकट ते पौष्टिक या न्यायानं एक चांगल्या बुटांची गुंतवणूक सोडली तर बिनपैशाचा हा स्टायलिश व्यायाम हवाहवासा वाटणंही साहजिक आहे.म्हणून सध्या रनिंग हा नवा कूल फंडा आहे. त्याला टेक्नॉलॉजीचं बळही मिळतं आहे आणि स्टायलिश लूकचंही.त्याच ट्रेण्डमधले हे काही भन्नाट टप्पे...१) सोशल रनहा प्रकार फार भन्नाट आहे. म्हणजे हे जे नवे नवे ‘पळू’ असतात त्यांना प्रेरणा कोण देतं आहे तर सोशल मीडिया. म्हणजे सोशल मीडियात आपलं कौतुक व्हावं, आपल्या फोटोंचे, फिटनेस फ्रिकचे चर्चे व्हावेत म्हणून या प्रकारातले अनेकजण पळायला सुरुवात करतात. काहीजण तर आपापल्या पळण्याचे व्हिडीओही टाकतात आणि त्यातून आपली एक खास इमेज तयार करण्याचा प्रयत्न करतात.२) बेअरफूट रनर्सआता आपल्या मिलिंद सोमणने हा बेअरफूट म्हणजेच अनवाणी पळण्याचा प्रकार लोकप्रिय केलेला आहे. पण सध्या तरुण पळणाऱ्या दुनियेत हे असं अनवाणी पळणंही हीट आहे. त्याचे फायदे तर आहेतच म्हणतात, पण पुन्हा आपण काहीतरी खास वेगळं करतो, ही भावनाच या अनवाणी पळणाऱ्यांना पळायची किक देते.३) अ‍ॅप है तो...अ‍ॅप हे प्रकरण विलक्षण भारी. मुद्दा काय तर नुस्तं पळून उपयोग नाही. आपण नेमके किती पळालो, काय वेगानं पळालो, किती कॅलरी जळाल्या, इतरांपेक्षा आपलं रेकॉर्ड नेमकं कसं आहे, आपलं सातत्य काय या साऱ्याचा अचूक डेटा हे अ‍ॅप देतात. आणि ते एकप्रकारे चटक लावतात रोज पळायची. त्याला म्हणतात ‘डिजिटल रन डॉक्युमेण्टशन’. त्यामुळे पळणाऱ्यांची संख्या वाढवण्यात या अ‍ॅप्सचाही हातभार आहेच.४) रनिंगवाला स्टाइलपळताना घालायचे वेगळे कपडे, त्याची खरेदी, त्यातली स्टाइल, फॅशन स्टेटमेण्ट यासाऱ्यांविषयी पूर्वी कुणी बोललं असतं तर लोकांनी त्याला वेड्यात काढलं असतं. पण आता ते ही बदललं आहे. रनिंग अपिरल नावाची कपड्यांची मोठी रेंज बाजारपेठेत उपलब्ध आहे. ते कपडे घालणं हेदेखील ट्रेण्डी आहे. त्यामुळे नुस्तं पळणं नाही तर पळतानाचे स्टायलिश कपडे, दिसणंही आता महत्त्वाचं ठरतं आहे.५) रनिंग शूजही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. नुस्तं पळून उपयोग नाही. चांगले शूज नसले आणि पळत सुटलं तर पायांना, गुडघ्यांना इजा होण्याचं भय असतंच. त्यामुळे उत्तम बूट ही एक महत्त्वाची गरज. शूज बनवणारे तमाम ब्रॅण्ड आता स्पेशल रनिंग शूज घेऊन बाजारात उतरलेले आहे. आणि त्या रनिंग शूजमध्येही अनेक प्रकार उपलब्ध आहेत. स्पेशल ट्रेल शूज, विण्टर रनिंग शूज, बेअरफूट रनिंग शूज, कॉम्पिटिशन शूज अशा प्रकारात हे रनिंग शूज मिळतात. आणि आॅनलाइनही हे सारे प्रकार मिळत असल्यानं आता पळणाऱ्यांना पायांची काळजीही उरलेली नाही. स्टाइल भी, कम्फर्ट भी असा हा मामला आहे.६) रनिंग गॅजेटहा प्रकार अजून आपल्याकडे फार चलतीत नसला तरी जगभरातले रनर्स या रनिंग गॅजेटच्या प्रेमात आहे. हायटेक हेअर ब्रॅण्ड, रिस्ट ब्रॅण्ड, अ‍ॅँकल ब्रॅण्ड, रनिंग वॉच हे सारं अत्यंत लोकप्रिय होत आहे. काही फिटनेस ट्रॅकरही लोक वापरतात आणि या गॅजेटची टेकफॅशन म्हणूनही मागणी वाढत चालली आहे.रनर्स इव्हेण्टचानवा थाटमॅरेथॉन तर जगभर सर्रास होतात.त्यात अनेक हौशी लोक भाग घेतात. ती पूर्ण करतात. अमुक-तमुक मॅरेथॉनला जायचंच म्हणून भलेभले तयारी करतात.हे सारं तसं काही आता नवीन उरलेलं नाही.आता नवीन ट्रेण्ड आहे तो रनिंग इव्हेण्टचा.म्हणजे काय तर युरोपात आता हे रनिंग इव्हेण्ट प्रचलित होत आहेत. अमुक-तमुक रन, हे नावानं, एखाद्या घटनेनं आखले जातात. पार पडतात. आणि नुस्ते हौशीच नाही तर रनिंग या नव्या इंडस्ट्रीतलेच अनेक ब्रॅण्ड्स त्या इव्हेण्टमध्ये उतरतात. शूज ते गॅजेट अनेक गोष्टी त्यादृष्टीनं डेव्हलप केल्या जातात. त्यातून महिलांसाठी वेगळे रन, त्यांच्यासाठीचे वेगळे ट्रेण्ड्स, तरुणांसाठीचे वेगळे रनर्स अपिल सुरू होतात.आणि या इव्हेण्ट्सची चर्चा होते, त्यातून बाजारपेठ नवीन आकारही घेते. युरोपनंतर अमेरिकेतही आता या लाइफस्टाइल रनची चलती आहे. आपल्यापासूनही हे सारं फार लांब नाही. तेव्हा पळत असाल तर आपण एका नव्या ट्रेण्डचा भाग आहोत असं समजायला आणि ते समजून मजबूत पळायला हरकत नाही.
lelechinu@gmail.com