शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

R U @ Risk?

By admin | Updated: November 27, 2014 22:01 IST

इंटरनेटचा अतिवापर हा शहरी प्रॉब्लम आहे आणि आपल्याकडची पोरं नेटपायी अजून तरी काही एवढी ‘पागल’ झालेली नाहीत, असा एक सूर कट्टय़ावरच्या चर्चेत कायम असतो.

 इंटरनेटचा अतिवापर हा शहरी प्रॉब्लम आहे आणि आपल्याकडची पोरं नेटपायी अजून तरी काही एवढी ‘पागल’ झालेली नाहीत, असा एक सूर कट्टय़ावरच्या चर्चेत कायम असतो.

आणि अशी चर्चा करतानाही ‘व्हॉट्स अँप’वर लेटेस्ट फॉरवर्ड काय यावर ‘ए मला कर ना, फॉरवर्ड’ म्हणून  बडबड सुरुच असते. त्यामुळे आपल्याला वाटतो त्यापेक्षा हा प्रश्न जास्त गंभीर आहे हे मान्य करूनच टाकायला हवं. अर्थात आपण नाही मान्य केलं तरी काही फरक पडत नाही, कारण मांजरानं डोळे बंद करून दूध प्यालं तरी जगाला दिसतातच त्याचे प्रताप !
तसेच आपले प्रताप ‘ट्विन्स, टीन्स अँण्ड टेक्नॉलॉजी २0१४’ या सर्वेत नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. इंटरनेट सिक्युरिटी फर्म असलेल्या टउआी ने प्रसिद्ध केलेला हा अभ्यास इण्टेल सिक्युरिटी या आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असलेल्या कंपनीचीच ही एक शाखा म्हणा हवं तर !
त्यांनी अमेरिका, र्जमनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलियासह भारतातल्या तरुणांच्या ऑनलाइन वर्तनाचा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासातून त्यांच्या हाती लागलेले तपशील धक्कादायक आहेत. मुख्य म्हणजे केवळ तरुण नव्हे, तर ज्यांना ते ट्विन्स म्हणतात अशा १0 ते १२ वयोगटातल्या मुलांच्याही ऑनलाइन असण्याचा त्यांनी अभ्यास केला आणि तो अपेक्षेप्रमाणेच धक्कादायकच आहे.
सध्या वयाच्या विशीत असलेल्या ५२ टक्के तरुणांनी शाळेत असतानाच सोशल मीडियावर अकाउण्ट्स उघडले होते, तर १0 ते १२ वर्षांची ५७ टक्के मुलं ही शाळेत असतानाच आपापल्या फोनवरुन ऑनलाइन असतात आणि सोशल मीडिया वापरतात असं हा अभ्यास म्हणतो. ही आकडेवारी म्हणजे नुस्ती एक झलक आहे. अजून बराच तपशील या अभ्यासात आहेच.
टउआी सायबरम इंडिया संस्थेच्या आनंदिता मिश्रा म्हणतात, ‘या सर्व्हेतून मुलांच्या ऑनलाइन वर्तनाचे अनेक पॅटर्न कळतात हे खरंय, मात्र त्यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट दिसतेय की, पालकांना हे व्हच्यरुअल जग आपल्या मुलांइतकं माहितीच नाही. पालकांनी तातडीनं आपल्या मुलांच्या हातातले फोन कसे वापरायचे हे त्यांच्याइतकं तरी किमान शिकून घ्यायला पाहिजेत. नाहीतर त्या भल्यामोठय़ा आभासी जगात ही मुलं हरवतील किंवा सायबर बुलिंग म्हणजेच ऑनलाइन जगात धमक्या देण्यापासून, त्यांना बळी पडण्यापर्यंत वाहवत जातील.’
विशेष म्हणजे हा सर्व्हे आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो. ज्याला ते म्हणतात ‘रिस्की बिहेव्हिअर’.
किमान ५0 टक्के भारतीय तरुण ऑनलाइन जगात भेटणार्‍या, अनोळखी व्यक्तींना प्रत्यक्षात जाऊन भेटतात. त्या जगात माणसं जशी बोलतात-वागतात तशीच ती प्रत्यक्षातही असतात असा समज अनेकजण करून घेतात. जगातल्या कुठल्याही देशापेक्षा भारतात अशा ‘अनोळखी’ भेटींचं प्रमाण जास्त आहे. अशा भेटींतून शारीरिक मानसिक धोका पोहचू शकतो याकडेही सर्रास दुर्लक्ष केलं जातं! हातातले फोन, टॅब, इंटरनेटचा कम्प्युटरवरचा वापर हे सारं जर आपल्या ‘तरुण’ जगण्यात अनिवार्यच होत चाललं असेल तर त्यातले धोके काय आहेत याचा आरसाच हा सर्व्हे दाखवतो. 
म्हणून तो अभ्यास आपण वाचून, काही धोक्याचे सिग्नल्स एकदा नीट पाहून घेतलेले बरे.!
- चिन्मय लेले
 
इंटरनेट वापरणार्‍या भारतातील निम्म्या म्हणजे ५0 टक्के मुलांनी सायबर बुलिंगचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजेच त्यांना ऑनलाइन असताना धमक्या मिळणं, ब्लॅकमेल करणं, मानसिक त्रास होणं अशा गोष्टी घडलेल्या आहेत.
 
आपण पोस्ट केलेल्या फोटोला भरपूर लाईक्स और कमेण्ट्स आल्या तर आपण इम्पॉर्टण्ट किंवा पॉप्युलर आहोत असं ७२%  मुलांना वाटतं.
 
आपण काय एवढे महत्वाचे आहोत का, आपलं फेक प्रोफाईल कोण कशाला तयार करेल, आपल्याला काहीच धोका नाही असं ५५% मुलांना वाटतं. आणि ५१ % मुलांना तर वाटतं की, ऑनलाईन प्रायव्हसी वगैरे अशी काही गरजच नसते.
 
 
 
५२ टक्के टीनएर्जस तर शाळेत असतानाच फेसबुक, व्हॉट्स अँप, स्नॅपचॅट, टम्बलर, टिंडरसारखी अकाउण्ट्स उघडून वापरतात.
 
३६ % मुलांनी तर स्वत:ही सायबर बुलिंग केलेलं आहे.
 
७0 % मुलं आपला पर्सनल ईमेल, घरचा फोन नंबर, मोबाइल नंबर, पत्ता ऑनलाइन पोस्ट करतात.
 
एका आठवड्यात ७0 % मुलं ५ तासांपेक्षा जास्तकाळ ऑनलाइन असतात. ४१% डेस्कटॉप, ३६% लॅपटॉप, तर २७ % स्मार्टफोन्सवरुन इंटरनेटचा वापर करतात.
 
आपण ऑनलाइन जगात जसे वागतो-बोलतो त्याचा आपला ‘आयडेण्टिटी’वर नक्की परिणाम होतो असं ८0 टक्के मुलांना वाटतं.
 
६३% मुलं अशी आहेत जी त्यांची जीपीएस सर्व्हिस कधीही बंद करत नाहीत. ते कुठ आहेत, काय करतात, हे कुणालाही ‘ठिकाण’ म्हणजे लोकेशनसह सहज दिसतं आणि ते डेंजरस आहे.
 
९३% मुलं फेसबुक वापरतात. ते सर्वाधिक पॉप्युलर आहे. ८७% युट्यूबरवर व्हिडिओ पाहतात. पाठवतात. ७९% व्हॉट्स अँपला चिकटलेले असतात.
 
इंटरनेट वापरणार्‍या आणि सोशल नेटवíकंग साईट्सवर अपडेट राहणार्‍या ९२ टक्के जणांनी ऑनलाइन (थ्रीलपोटी म्हणा किंवा अजाणतेपणी) काहीतरी ‘रिस्की’ उद्योग कधी ना कधी केलेला आहेच. आणि रिस्क म्हणजे फोन-पत्ता, पोस्ट करण्यापासून ‘काहीही’.
 
आपल्याला रोजच्या जगण्यात कुणी भाव देत नाही, पण ऑनलाइन-आभासी जगात त्यांना मान मिळतो. लोक त्यांना ते जसे आहेत तसे सहज स्वीकारतात. असं ६६%  मुलांना वाटतं.