शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रोमची पहिली महिला महापौर

By admin | Updated: June 23, 2016 17:32 IST

इटलीची राजधानी रोममध्ये मागच्या रविवारी एक इतिहास घडला. इतिहास घडवला तो व्हर्जिनिया राज्जी या ३८ वर्षीय महिलेनं. राजकारणात ३८ म्हणजे अगदी तरुण वय

- माधुरी पेठकर
इटलीची राजधानी रोममध्ये मागच्या रविवारी एक इतिहास घडला. इतिहास घडवला तो व्हर्जिनिया राज्जी  या ३८ वर्षीय महिलेनं. राजकारणात ३८ म्हणजे अगदी तरुण वय.  तर या तरूणीनं रविवारी रोम  शहराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
रोमच्या २८०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उमेदवार महापौर झाली आहे. वकील असलेल्या व्हर्जिनियासाठी हा विजय म्हणजे एका नव्या युगाची सुरूवात आहे. स्त्री-पुरूष समानता हा विषय बोलायला कितीही चांगला असू देत पण रोम सारख्या युरोपिअन देशातल्या शहरातसुद्धा बाईचा पुरूषांच्या बरोबरीनं राजकारणात प्रवेश हे  कालपर्यंत कल्पनेतलं स्वप्नचं होतं,  ते व्हर्जिनियाच्या रूपानं साकार झालं आहे.  व्हर्जिनियाच्या मते बदलाला सुरूवात झाली आहे. हा बदल खोलपर्यंत नक्कीच झिरपेल असा तिला विश्वासही आहे. 
अ‍ँटी एस्टाब्लिशमेंट पार्टी म्हणून ओळखल्या जाणाºया फाइव्ह स्टार मुव्हमेंट जिला ट5र या नावानंही ओळखलं जातं त्या पार्टीची व्हर्जिनियाा सदस्य होती. २०११ मध्ये अ‍ँन्ड्रिआ सेव्हरिनी या रेडिओ डायरेक्टर असलेल्या आपल्या नवºयाच्या निमित्तानं तिची या पक्षाक्षी ओळख झाली. तिचा नवरा या पक्षाचा खंदा समर्थक.  नंतर ती स्वत: या पक्षाची सदस्यही झाली. आणि पक्षानं महापौरपदाची उमेदवार म्हणून तिलाच उभं केलं. 
दृढ, निश्चयी आणि तपशीलाबाबत अत्यंत आग्रही असलेल्या  व्हर्जिनियानं प्रतिस्पर्धी पक्षाच्या तुलनेत तब्बल ६७.२ मते घेतली.  सध्याच्या रोमबद्दल विचार केला तर तिला चांगलं वाटत नाही. रोम कधीही ठरवून केलेल्या आणि संघटित गुन्ह्यांसाठी प्रसिध्द नव्हतं. पण गेल्या दोन तीन वर्षांपासून रोमचा सुसंस्कृत चेहेºयाला गुन्हेगारीचा, भ्रष्टाचाराचा लागलेला डाग इतर लागला आहे. त्याचा  व्हर्जिनियालाही छळतो आहे. आणि आपल्या महापौरपदाच्या काळात रोमला लागलेला हाच डाग तिला पुसायचा आहे. 
महापौर म्हणून आपल्या उमेदवारीचा प्रचार करताना तिच्या तोंडी फक्त एकच वाक्य होतं.  ‘ हे रोम मला राहण्यासाठी आणि जगण्यासाठी योग्य शहर बनवायचं आहे.’
रोममधली स्वच्छता टिकून राहण्यासाठी घरापासून शहरापर्यंतच्या स्वच्छतेचा तिला विचार करायचा आहे. कचºयाचं व्यवस्थापन  ते वाहतुकीचा प्रश्न अशा सर्वच प्रश्नांशी तिला दोन हात करायचे आहे. ट्राफिक हा रोममधला गंभीर होत गेलेला प्रश्न तो सोडवताना तिच्या डोळ्यासमोर जास्तीत जास्त रस्त्यांवर सायकल लेन बनवण्याचं उद्दिष्ट आहे.  आणि या सर्वांसोबतच व्हर्जिनियाला शहरात प्रत्येक क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचारही निपटून काढायचा आहे. 
टीकाकारांच्या, विरोधकांच्या मते व्हर्जिनियाकडे राजकारणातला अनुभव खूपच कमी आहे. पण या  टीकेकडे लक्ष न देता तिनं रोम शहराची महापौर म्हणून काम करण्याचं आव्हान स्वीकारालं आहे.